महाराष्ट्राला विचारवंताचे वरदान लाभले आहे. संगीत क्ष्रेत्रात ही परंपरा पं.भातखंडेनी सुरु केली. पुढे दि.ब. देवधर , कुमारजी , पु.ल. असे अश्या अनेकांनी संगीता बरोबर संगीताचे विचार पुढे नेले. डॉ. अशोक रानडे त्याच परंपरेचा विचारवंत होता. हया जुलै महिन्यात त्यांच्या निधनाला एक वर्ष होते आहे. त्यानिमित्त त्यांचे स्मरण.
आपल्या जवळजवळ पाउणशे वर्षाच्या आयुष्यात डॉ.६० वर्षे संगीता क्षेत्राशी निगडीत होते. स्वतः गजाननबुवा जोश्यांचे शिष्य होतेच पण त्याही पेक्षा ते संगीतावरचे अधिकारी व्यक्तिमत्व होते. त्यांचा व्यासंग “संगीताचा” होता आणि तो भारतीय शास्त्रीय संगीता इतकाच लोकसंगीताचा ही होता.
भारतीय शास्त्रीय संगीत हा एक विशाल महासागर आहे. सामान्य माणूस मात्र हया संगीतापासून थोडा अलिप्त आहे. हे संगीत समजायला थोडे अवघड आहे असा एक गैर समज आहे आणि तो वाढवण्यात खुद्द गायाकांनीच हातभार लावला आहे. राजस्थानी , पंजाबी येथील बोलीभाषेतीत चिजांचा अर्थ खुद्द गावायालाच माहित नसतो तर तो त्या गीतामाधला भाव श्रोत्यांपर्यंत कसा पोहोचवणार ? डॉ. रानडयानी हया कामी अथक परिश्रम घेतले. अनेक चीजा संग्रहित केल्या त्याचा अर्थ सांगितला. हया संदर्भात त्यांची पुस्तके प्रसिद्ध झाली ( संगीताचे सौंदर्य शास्त्र , लोकसंगीत शास्त्र ). अनेक गायक, रसिकांना ह्याचा फायदा झाला.
मुंबई –पुण्यामाधला संगीता वरचे चिंतत , चर्चा हया गेल्या अनेक डॉ. रानड्यांच्या शिवाय पूर्ण झाल्याच नाहीत. ते अतिशय चांगले वक्ते होते. त्यांच्या लिखाणा प्रमाणेच त्यांची भाषणेही विद्वत्ता आणि विनोद यांनी यथेच्च भरलेली असत.
voice culture चे महत्व त्यांनी अनेक कलावंताना पटवले. त्यांच्या कार्य शाळेचा लाभ गायक , नट , वृत्तनिवेदकानी घेतला. अनेकांना आपल्या आवाजावर किती आमूलाग्र संस्करण होवू शकते ह्याची कल्पनाही नव्हती ती आली !
मुंबई विद्यापीठाच्या संगीत विभागाचे ते पहिले प्रमुख होते. त्यांच्या मधल्या रसिकतेला संशोधक , वक्ता , लेखक , शिक्षक , प्रशासक अशा अनेक पैलूंचा स्पर्श होता. त्यामुळेच ते भारताबाहेरच्या अनेक विध्यापिठाशी जोडले गेले होते.
डॉ.रानडे हे त्यांच्या शिष्या बरोबर अनेक संगीत साधकांचे प्रेरणास्थान होते. त्यांच्या ज्ञानाचे भांडार सगळ्यांना सदैव उघडे होते.
देवी अहिल्या होळकर हया चित्रपटाला त्यांनी संगीत दिले.अहिल्याबाईंचे कर्तुत्व सांगणारी कथा , शबाना व सदाशिव अमरापुरकारांचा समर्थ अभिनय ही हया चित्रापाठाची वैशिष्ट्ये आहेतच व त्याला सुयोग्य असे डॉ. रानड्यांचे संगीत आहे. कलापिनी-ताईंच्या आवजातीत नर्मदा अष्टक व प्रल्हाद शिंदे ह्यांचा आवाजामधले लोकसंगीत ह्यांचा त्यांनी सुरेख वापर केला आहे.
त्यांच्या निधानंतर अनेक नाही, सर्वच वृत्त पत्रांनी मृत्यु लेख , आठवणी छापल्या होत्या. अनेक दिग्गजांनी त्यांना शब्द-स्वरांची श्रद्धांजली वाहिली. आज एक वर्षांनतर माझ्या भावना एवढयाच आहेत की “ त्यांच्या जाण्याने शास्त्रीय संगीत सोपे करून सांगणारे “गाईड” हरवले आहे.
त्यांच्या भाषणाचा एक नमुना देत आहे.
http://www.youtube.com/watch?v=dR-I78vd2bM
प्रतिक्रिया
2 Jul 2012 - 6:17 am | अर्धवटराव
__/\__
अर्धवटराव
2 Jul 2012 - 8:19 am | पैसा
आणि गाण्याबद्दलचे लेख सुरू केल्याबद्दल धन्यवाद! असेच आणखी लेख येऊ द्यात!
2 Jul 2012 - 10:38 am | चौकटराजा
ज्याना दैववशात हिंदुस्थानी वा पाश्च्यात्य शास्त्रीय संगीताची गोडी लागली आहे . त्याना डॉ.अशोक रानडे यांचे नाव व कार्य विसरता येणे नाही. अभ्यास वा आस्वाद यांचा मेळ घालीत गेले की आस्वादाची गोडी वाढते याचे भान त्यांच्या व त्यानी घेतलेल्या मुलाखती तून
येत असे.
2 Jul 2012 - 11:34 am | प्यारे१
संगीत या विषयातलं कळत नाही पण धागा कर्त्याचं नाव 'मनोज श्रीनिवास भीमसेन जोशी 'असं आहे का?
2 Jul 2012 - 11:43 am | नितिन थत्ते
????
2 Jul 2012 - 12:19 pm | प्यारे१
खरंच कुतूहलापोटी विचारलं आहे.
पंडितजींच्या एका मुलाचं नाव श्रीनिवास आहे ना?
नि असं काही कनेक्शन आहे का असा प्रश्न पडला म्हणून कॅज्युअली विचारला आहे.
2 Jul 2012 - 9:41 pm | श्रीरंग_जोशी
योगायोगने माझ्याही वडीलांचे नाव श्रीनिवास जोशी हेच आहे.
धागाकर्त्यांशी एकदा या विषयावर संवाद झाला होता.
2 Jul 2012 - 12:25 pm | रमताराम
संगीतक्षेत्रातला अजातशत्रू नि निगर्वी माणूस. अगदी लावण्यांपासून चित्रपटसंगीताचाही अभ्यास करणारा, संगीतविषयक अभ्यासाला खर्या अर्थाने सर्वसमावेशक करणारा कलाकार.
अवांतरः जर हा लेख पुण्यतिथीचे (एक वर्ष म्हणताय म्हणून विचारतो) औचित्य साधून लिहिला असेल तर त्यांची पुण्यतिथी ३० जुलैला आहे हे निदर्शनास आणून देऊ इच्छितो. अद्याप तीन आठवडे आहेत.
2 Jul 2012 - 11:20 pm | सुनील
अशोक रानडे यांनी दूरदर्शनवर घेतलेल्या भीमसेन जोशी, मल्लिकार्जून मणसूर यांच्या मुलाखती छानच होत्या.
श्रद्धांजली!
3 Jul 2012 - 4:45 pm | चौकटराजा
महाराष्ट्राला विचारवंताचे वरदान लाभले आहे. संगीत क्ष्रेत्रात ही परंपरा पं.भातखंडेनी सुरु केली. पुढे दि.ब. देवधर
आपल्याला कुमारजींचे गुरूजी बी आर देवधर म्हणायचे आहे का ?
8 Jul 2012 - 3:28 pm | मनोज श्रीनिवास जोशी
अर्धवटराव , पैसा , चौकट राजा ,प्यारे , श्रीरंग , नितीन , रामाताराम ,सुनील : आपल्या प्रतिसादाबद्दल आभार.
रामताराम : पुण्यतिथी ३० जुलै ला आहे. अगदी त्यावेळी लिहून होईल की नाही ही खात्री नव्हती. म्हणून थोडा आधीच लेख लिहिला.
चौकट राजा : ती माझी घोडचूक . मला बी. आर देवधरच म्हणायचे होते. उ.सं.डू. लक्ष्यात आणून दिलेत - धन्यवाद.