गंध फुलांचा

मंदार दिलीप जोशी's picture
मंदार दिलीप जोशी in जे न देखे रवी...
30 Jun 2012 - 3:38 pm

"गंध फुलांचा" ऐकल्यावर मनात
नेमकं काय दाटायचं
कुणास ठाऊक मला तेव्हा
नेमकं काय वाटायचं

आतून येणारी हाक
त्या हाकेतली आर्त स्पंदनं
याचा ठावच घेतला नव्हता
मनातल्या वादळाचा तेव्हा
अर्थच उमगला नव्हता
येणारी हाक कुणाची होती
की होते ते फक्त मनाचे खेळ?
ती होती का "आशा"च्या आवाजाने निर्मिलेली
एक अगम्य, वेडी आशा.....?
की अव्यक्त भावनांची
हळुवार अमूर्त भाषा?

मग जळमटं बाजूला सारून
जुन्या कपाटातून काढलीच बाहेर
माझ्या आयुष्याची वही
तिची पानं थोडी कोरी
थोडी भरलेली
तुझ्यासमोर ठेवली
तेव्हा सारं काही उमगलं
बांध फोडून मनात दाटलेलं
त्या वहीवर अलगद उमटलं

भरलेल्या पानांना
तुझ्या अक्षराची सोबत झाली
कोरी पानं वाट बघत होतीच
तुझंच अक्षर उमटण्याची
मला न समजलेलं गणित
तुझ्याच अक्षरात सोडवण्याची

जास्त काही लिहीत नाही
एवढंच तुला सांगायचं होतं, यापुढे.....
उघडलेल्या वहीवर अक्षर तुझंच असेल,
एवढंच वचन द्यायचं होतं.

- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
ब्लॉगवर प्रकाशित
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
ही कविता जालरंग प्रकाशनाच्या जालवाणी अंकात माझ्याच आवाजात इथे ऐकता येईल.

कविता

प्रतिक्रिया

पैसा's picture

1 Jul 2012 - 8:28 am | पैसा

सर्वप्रथम मिपावर स्वागत! कविता आवडली. आणखी येऊ द्या. प्रत्यक्ष कवितावाचन हा प्रकारही आवडला.

मराठमोळा's picture

1 Jul 2012 - 9:28 am | मराठमोळा

मिपावर स्वागत..

"तू मुर्ख आहेस" ऐकल्यावर मनात
नेमकं काय दाटायचं
कुणास ठाऊक मला तेव्हा
नेमकं कविता करावंस वाटायचं

आतून वळवळणार्‍या किड्यांची हाक
त्या हाकेमुळे स्वस्थ न बसवणं
याचा ठावच घेतला नव्हता
सुलेमानी किड्यांचा तेव्हा
अर्थच उमगला नव्हता
खरच ती कविता होती
की होते ते फक्त किड्यांचे खेळ?
ती होती का "ओकारीच्या"च्या आवाजाने निर्मिलेली
एक अगम्य, काव्यजिलेबी.....?
की अव्यक्त भावनांची
झालेली नुसतीच भेसळ?

मनातली मळमळ आंजावर सांडून
एकदाची कविता काढलीच बाहेर
आंजावरची फुकटची वही
तिची पानं थोडी फाडलेली
थोडी खरडलेली
तुमच्यासमोर ठेवली
तेव्हा सारं काही शांत झालं
बांध फोडून पोटात दाटलेलं
त्या वहीवर पचकन उमटलं

सडलेल्या कवींना
तुमच्या दुर्लक्षिततेची सोबत झाली
विडंबनं करणारी वाट बघत होतीच
माझ्या साहित्यिक जिलेब्या पडण्याची
मलाच न समजलेल्या कविता
तुम्ही फटक्यांनी चोपण्याची

जास्त काही सांगत नाही
एवढंच तुम्हाला सांगायचं होतं, यापुढे.....
उघडलेल्या मुख्यपानावर रोज एक-दोन ओकार्‍या माझ्याही असतील,
एवढंच वचन द्यायचं होतं.

धन्यवाद. ह. घ्या अशी अपेक्षा. :)

प्रचेतस's picture

1 Jul 2012 - 9:54 am | प्रचेतस

कविता आणि विडंबन दोन्ही झकास.

मंदार दिलीप जोशी's picture

1 Jul 2012 - 5:00 pm | मंदार दिलीप जोशी

विडंबन आणखी चांगले होऊ शकले असते :)
शब्द आवडले नाहीत. प्रांजळ मताबद्दल क्षमस्व.

निशदे's picture

1 Jul 2012 - 10:07 am | निशदे

मस्तच आहे रे...........आवडली......

अत्रुप्त आत्मा's picture

1 Jul 2012 - 10:23 am | अत्रुप्त आत्मा

अमितसांगली's picture

1 Jul 2012 - 10:29 am | अमितसांगली

मिपावर स्वागत व शुभेच्छा....

विजय_आंग्रे's picture

1 Jul 2012 - 10:32 am | विजय_आंग्रे

कविता आणि विडंबन दोन्ही आवडले. मस्तच.

मंदार दिलीप जोशी's picture

1 Jul 2012 - 4:58 pm | मंदार दिलीप जोशी

सर्वांना धन्यवाद :)