" हे माझे पंढरपूर ! "

विदेश's picture
विदेश in जे न देखे रवी...
30 Jun 2012 - 7:19 am

हात जोडतो देवापुढती, कधी न जातो दूर,
घरातली माणसे देव, हे माझे पंढरपूर |

वारकरी ना दिंडीमधला, मनास ना हुरहूर
नातीगोती वारकरी, हे माझे पंढरपूर |

सुखात सोबत विठ्ठल माझा, दु:ख बने कापूर
सुविचारांचा टाळगजर, हे माझे पंढरपूर |

कर्तव्याचे रिंगण माझे, त्यात कधी न कसूर
सेवापूर्ती पालखीत, हे माझे पंढरपूर |

घेता नामस्मरणी विठ्ठल, चंद्रभागेला पूर
नयनामधुनी भिजे मूर्ति, हे माझे पंढरपूर ||

शांतरसकविता

प्रतिक्रिया

अमृत's picture

30 Jun 2012 - 11:06 am | अमृत

घरातली माणसे देव, हे माझे पंढरपूर --- वाह

अमृत

पिंगू's picture

30 Jun 2012 - 12:25 pm | पिंगू

कदाचित ह्यालाच संसार म्हणतात..