अंतरीची हूरहूर ....

स्वर भायदे's picture
स्वर भायदे in जे न देखे रवी...
29 Jun 2012 - 10:39 am

अंतरीही हूरहूर वाटे
तू माझी होशिल का ?

जीवनाच्या गीताला या
सूर तू देशील का ?

वाळवंटासम आयुष्याचा
नूर तू होशिल का ?

बावरलेल्या या मनाला
धीर तू देशिल का ?

अंतरीही हूरहूर वाटे
सखे तू माझी होशिल का ?

जीवनाच्या हर क्षणास
अर्थ तू देशील का ?

अमावस्येच्या आंधारातील
चांदणे तू होशिल का ?

अंतरीही हूरहूर वाटे
प्रिये तू माझी.......... होशिल का ?

प्रेमकाव्य