नमस्कार आता कालकुपीचा भाग २ (अंतिम)
डा.मिचिओ किंवा मिशिओ हे अमेरिकेतील प्रसिद्ध पदार्थ विज्ञानातील शास्त्रज्ञ आहेत
त्यांनी या विषयाची बरीच पुस्तके लिहिली आहेत व त्यापैकी बरेच ईग्रजी चित्रपट देखील निघाले आहेत
त्यांच्या भाष्याप्रमाणे सन २१०० मध्ये जग कसे असेल ,ते म्हणतात --
जगाची विभागणी ३ प्रकाराच्या लोकांमधे होईल
१)पहिला प्रकार- काही लोक या जगाचे नियंत्रण करतील- त्यांच्याकडे भूंकप , वाद्ळे व समुद्रतुफानाला रोखण्याची साधने असतील
२)दुसर्र्या काही लोकांकडे अशी साधने असु शकतील की ते सुर्याच्या उर्जे पासुन मोठी अवजारे व यंत्रे चालवतील
३) तिसरा वर्ग असा की जे निरनिराळ्या ग्रहावरुन साधन संपत्ती आणुन प्रूथ्वी वर नवी संस्क्रुती निर्माण करण्याचा प्रयत्न्य करतील,कारण आपण उर्जा सुर्यापासुन घेतो व भुगर्भातुन खनिजे व पेट्रोलजन्य पदार्थ घेतो व हे पदार्थ नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत व ईतर उर्जासाधने शोधावी लागतील
त्यांच्या सिद्धांताप्रमाणे - १) असे चष्मे उपलब्ढ होतील की त्याद्वारा तुम्हाला कचेरीत न जाता घरात बसुन सर्व फायली पहाता येतील २) तुम्हाला मोटारीसाठी चालक ठेवण्याची जरुरी नाही किंवा स्वतः चालविण्याची जरुरी नाही कारण काही वर्षातच विना चालक मोटारी येतील ३) अवतार या ईग्रजी चित्रपटात दाखविल्याप्रमाणे काही छोट्या पदार्थाने किवा चिप्स च्या आधारे मेन्दु कडे सन्देश पाठ्वुन काही रोग बरे केले जातील ४) मानवी शरीरातील काही पेशी ना कार्यक्षम किवा हतबल करता येईल
संदभ - १) Nanotechnology: Everything from Nothing?
२) Physics of the Future : 2011 book by theoretical physicist Michio
मिसळ पाव मंडळी ,मागील कालकुपी भाग १ मधे जुएल्स वेर्ने या लेखकाची भविष्ये कशी खरी झाली या बद्दल मी लिहीले आहे तर आता महान अमेरिकन संशोधक व लेखक डा.मिचिओ बद्दल लिहीले आहे
पुढील शतकाबद्दल त्यांची ही वाणी खरी ठरेल काय ? तुम्हाला काय वाट्ते ? किवा तुमचे मत काय आहे ?
काल कुपी भाग २/२
गाभा:
प्रतिक्रिया
26 Jun 2012 - 10:11 am | जोयबोय
२१००मधे उत्पन्नाची साधने काय असतील? कारन सर्व स्वंयंचलित असेल तर नेमके काय काम मानव करनार
26 Jun 2012 - 12:22 pm | चित्रगुप्त
शंभर वर्षांनंतरच्या तंत्रज्ञानाबद्दल अंदाज करणे अवघडच वाटते.
२१००मधे उत्पन्नाची साधने काय असतील?
हा प्रश्न महत्वाचा आहे खरा.
आणखी काही प्रश्नः
त्यावेळी कुटुंब- संस्थेचे काय स्वरूप असेल?
करमणुकीसाठी मानव काय करत असेल?
कला, संगीत, साहित्य, सिनेमा इ. चे स्वरूप काय असेल?
धर्मांचा पगडा कितपत असेल, सध्याच्या धर्मांपैकी कोणत्या धर्मांचे प्राबल्य खूप वाढलेले असेल, आणि कोणते नामशेष झालेले असतील ?
पर्यावरणाची अवस्था काय असेल? कोणत्या समस्या असतील?
26 Jun 2012 - 1:28 pm | कपिलमुनी
२१००मधे मिपा चे काय होइल ??
26 Jun 2012 - 1:56 pm | मोहनराव
संपादकांची गरज पडणार नाही, धाग्यांना आपोआप पंख फुटतील!
26 Jun 2012 - 6:24 pm | शुचि
धागेच आपोआप उगवतील :D
26 Jun 2012 - 2:09 pm | ऋषिकेश
यातील बहुतांश गोष्टीच आताच शक्य आहेतः
इथे बघा
अर्थात सोलार एनर्जी पासून अनेक कृत्रिम उपग्रह, दूरपल्ल्याची याने चालत आहेतच
सध्या असे प्रयत्न चालु आहेतच
चष्मे नाहित पण टॅब/पामटॉप्स आहेतच की. कोणत्याही फाईल शेयरींग साअईटवर कॉपीज चढवल्या असतील तर घरूनही बघता येतीलच.
अश्या मोटारीच काय विमानेही आहेत.
Bionic Chips ने सर्च करा. प्रोफेसर वॉर्विक (हे काहि वर्षांपूर्वी पुण्यातही येऊन गेले होते) ज्यांनी आपला हात अश्या चीपने कार्यरत केला आहे.
गेनेटिक इंजिनियरिंग
थोडक्यात हा काळ आलाच नाही तर लवकरच मागे सरेल