वणवा

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in जनातलं, मनातलं
25 Jun 2012 - 10:16 am

तिचा देखणा देह
पेटवी देहात वणवा
तिच्या अदा कातिल
होई जीव घायाळ

तिची रेशमी साडी
करे पदराशी चाळा
ते चोरटे कटाक्ष
होई जीव खुळा

उसळे कुंतलाच्या लाटा
दर्वळे आसमंत सारा
भरकटे गलबत माझे
कोठे शोधू किनारा

बिघडे श्वासाची लय
तिचा धकधकणारा उर
ति गौरगुलाबी काया
चुंबण्या जीव आतुर

कविता

प्रतिक्रिया

कविताबाईना कविता विभागात ढकला.

स्पंदना's picture

26 Jun 2012 - 3:31 pm | स्पंदना

उगा ढकला ढकळी नका करु.
यश्टी एकच आहे, न्हाय बसल अदीमंदी राखिव शिटांवर तरी चालत. आव बाय कशी हाय बगा? तिथ कोण बसवुन घिल व्हय तिला? हित्त उठुन दिसत्या.

गोंधळी's picture

25 Jun 2012 - 2:46 pm | गोंधळी

sexy कविता.