तीट!

चैतन्य दीक्षित's picture
चैतन्य दीक्षित in जे न देखे रवी...
22 Jun 2012 - 10:55 am

तनुवेलीवर यौवन फुलले,
पाहुनिया तुज हे जग भुलले,
हरले! सगळे प्रयत्न हरले !
सांभाळावे कसे मनाला? सांग तूच गे मला,
शिकावी कुठे कलंदर कला ?

नुकती सरली वर्षे सोळा
ज्वानीचा ह्या नूर निराळा...
भाव कसा मग असेल भोळा?
नजरेच्या एका घावातच जीव जाहला खुळा ॥

सावळकांती, आखिव बांधा,
चालीमधला झोक न साधा,
मदनालाही होइल बाधा
तुला पाहता, श्वास आतला आतच गं थांबला ॥

पदराआडुन हसते काही,
बघणार्‍या मग भानच नाही,
तुझाच तो होउनिया राही
संन्याशाला संसाराचा लावशील तू लळा ॥

मनी तुझ्या जे काही दडले,
ओठ सांगताना अवघडले,
ते न इथे कोणाला कळले.
ह्या मौनाची 'तीट' लावुनी, देव जरा शांतला ॥

- चैतन्य दीक्षित

शृंगारकविता

प्रतिक्रिया

मेघवेडा's picture

22 Jun 2012 - 1:40 pm | मेघवेडा

आहा! काय सुरेख सांभाळलीय लय! चैत्या, मान गये बुवा. अत्त्युत्तम. :)

गणपा's picture

22 Jun 2012 - 1:45 pm | गणपा

सेक्सी. :)

नाना चेंगट's picture

22 Jun 2012 - 1:47 pm | नाना चेंगट

जबरा !!

अरे कुठे होता हा धागा?

प्यारे१'s picture

22 Jun 2012 - 2:16 pm | प्यारे१

सेक्सी च!

चैतन्य दीक्षित's picture

22 Jun 2012 - 3:35 pm | चैतन्य दीक्षित

प्रतिसादाबद्दल सगळ्यांचे धन्यवाद.
ही कविता इथे द्यायला कारणीभूत ठरलेल्या (त्यांच्या 'काय/कोण सेक्सी वाटते' या धाग्यामुळे) 'शुचि'तैंचेही आभार :)

मला माझी ही कविता सेक्सी वाटते :)

शुचि's picture

22 Jun 2012 - 6:43 pm | शुचि

जबराट आहे :) सेक्सीच खरच.

स्पंदना's picture

22 Jun 2012 - 5:16 pm | स्पंदना

कवितेच नावच इतक आवडल ना, काय सांगु.
अन कविता वाचुन तर जीव वेडा खुळा झाला. अगदी लटपट लटपट्...सारख काहीतरी झकास वाटुन गेल.

अमितसांगली's picture

23 Jun 2012 - 8:45 am | अमितसांगली

संन्याशाला संसाराचा लावशील तू लळा ....कविता कधी संपूच नये असे वाटत होते....

चैतन्य दीक्षित's picture

26 Jun 2012 - 9:15 am | चैतन्य दीक्षित

प्रतिसादाबद्दल सर्वांचे पुनश्च आभार :)