अ॑तर

शितल's picture
शितल in जनातलं, मनातलं
21 Jun 2008 - 2:42 pm

कविता अणि अमेय चा मुलगा मानस आज उच्चशिक्षणासाठी अमेरिकेला रवानगा होणार होता. कविता आणि मानस पुण्याहुन मुबईला कॆब करून एअरपोर्टवर आले, अमेय त्याची वाट पहातच उभा होता.
मानसने त्याच्या बाबाना पाहिल्यावर त्याना नमस्कार केला, आज ब-याच वर्षानी कविता आणि अमेय समोरा समोर होते आणि कोणाला काय बोलावे हे समजत नव्हते. दोघेही मानसला वारवार काळजीवाहु सल्ले देत होते, पण एकमेकाशी बोलत नव्हते, हे मानसच्या नजरेत आले, तेव्हा त्याने पुढाकार घेऊन बोलायला सुरूवात केली, आता पर्यत तुम्ही दोघेही माझ्याकडे एकमेकाची चौकशी करत होता, पण आता मात्र मी येथे नाही त्यामुळे तुम्ही दोघानीही जमल्यास एकत्र रहा किवा, फोनवर एकमेकाशी बोलत रहा. थोड्याफार सुचना मानसनेही दोघाना ही देऊन, निघण्याची वेळ जशी आली तसे त्याने दोघानाही एकत्र उभे करून नमस्कार केला, आणि दोघानाही कुशीत घेतल्यावर मनमोकळे आश्रु वाहु दिले, आणि जाताना दोघाचा हात एकमेकाच्या हातात देऊन सागितले तुम्ही एकत्र राहिलातर मला जास्त आनद होईल, आणि बाबाना सागितले की आई मी गेल्यावर फार एकटी पडेल, आणि पुण्यात गेल्यावर घरी खुप रडत बसेल त्यापे़शा दोन/ तीन दिवस ती तुमच्या जवळ राहु दे. एवढे बोलुन मानस निघुन गेला.
दोघानीही चश्मे काढुन डोळे पुसले, आणि हळव्या मनाने परतीच्या मार्गाला लागले, अमेयने कविताला विचारले, तु काय ठरवले आहेस तु राहणार आहेस की परत पुण्याला जाणार आहेस. त्यावर कविताने अमेयकडे फक्त एक नजर टाकली आणि त्यावरून त्याला कळले की ती येथे राहणार आहे, मग त्याने ड्रायव्हरला गाडी काढायला सागितली, गाडी आल्यावर त्याने कविताला बसण्यासाठी दार उघडले, कविता आत जाऊन बसली आणि तीला वाटले अमेय ही तीच्या जवळ बसेल पण त्याने दार लावले आणि तो पुढे बसला. आणि जेवणासाठी गाडी एका चागल्याच हॊटेलला न्यायला सागितली.
कविताच्या मनात अनेक प्रश्नाचे काहुर माजले, अमेय आणि तीच्यातील अतर किधी वाढत गेले ते कळलेच नाही आणि मन गाडीच्या चाकाच्या वेगाने मागे जाऊ लागले.
तीला आठवु लागले, दोघे ही एकाच कपनीमध्ये कामाला होते, अगदी हसत खेळत काम करायचे, त्यातुन मैत्री झाली, आणि मग मैत्रीचे रूपातर प्रेमात आणि नतर विवाहात. दोघे ही अगदी करिअरीस्ट, आणि तेवढेच ताठ. लग्न झाल्यावर ही काही फारसे बिनसत नव्हते, लग्ना नतर थोड्या दिवसानी दोघानीही कपनी बदलली, आणि चा॑गल्या पगाराच्या चा॑गल्या हुद्दुयाच्या नोक-या पत्करल्या. पण जसा मानसचा जन्म झाला आणि दोघावरील जबाबदा-या वाढु लागल्या तसे एकमेकावर चिडणे, दोघेही सारखेच कमवते असल्याने माघार कोणी घ्यायची हा मुळ मुद्दा असायचा. अमेय, कविताला सागत होता की मानस ५ वर्षाचा होई पर्यत तु पार्ट टाईम जॊब कर, आणि तु त्याला जास्त चागले समजुन घेऊ शकशील, पण कविताचा इगो दुखावला जात होता, तीचे म्हणने होते की मग तो ते स्वतः का नाही करत, ती पार्ट टाईम जॊबला नकार देत होती, आणि दोघाच्यातील ह्या बारीक वादाचे रूपातर कधी दोघानीही विभक्त रहावे ह्या पायरी पर्यत गेले ते कळले ही नाही. मानसला थोडे समजु लागल्यावर कविता त्याला मु॑बईहुन अमेय चे घर सोडुन पुण्याला आली अमेयनेही एक दोन वेळा तीला घरी परत आणण्याचा प्रयत्न केला पण ती गेली नाही.
मानस जवळ असल्यामुळे तीला फारसा एकटापणा जाणवायचा नाही, कधी कधी अमेयची आठवण यायची पण ती त्याचे विचार मनातुन पुसुन टाकायची. इकडे अमेय ही स्वत:च्या नोकरी मुळे जगभर प्रवास करीत फिरत होता, भारतात असल्यावर त्याला मानसची आणि कविताची आठवण यायची म्हणुन तो भारता बाहेरच जास्त करून राहण्याचा प्रयत्न करायचा, आणि चार सहा महिन्यातुन भारतात आल्यावर मानसला भेटायचा, त्यासाठी मात्र कविताने त्याला कधी नकार दिला नाही. तुझे बाबा काय म्हणतात एवढाच प्रश्न टाकायची.
गाडी हॊटेल पाशी थाबली, दोघे ही समोरासमोर बसले, मेनु कार्ड हातात घेतल्यावर अमेयने कविताच्या आवडतीची डिश ऒर्डर केली तशी ती चमकुन अमेयकडे पहात राहिली, आणि अमेयने डॊळे मिचकावले, त्याला आपली आवडनिवड अजुन लक्षात आहे हे पाहुन ती मनातुन सुखावली. जेवण झाल्यावर दोघेही गाडीत बसले पण आता अमेय, कविताच्या बाजुला मागे बसला होता, कारण मगाही त्याने कविता आत बसल्यावर बाजुला सरकेली ओझरत्या नजरेने पाहिली होती म्हणजे तीची इच्छा होती की त्याने मागे बसावे पण ती काहीच बोलली नव्हती त्यामुळे तो ही पुढे बसला होता.
गाडी घराच्या दिशेने निघाली, कविताला वाटले हा आता मोठा माणुस झाला आहे, मस्तपैकी टुमुकदार बगल्यात रहात असेल, पण गाडी ज्या रस्त्यावरून जात होती ते तीला फुसटचे ओळखीचे वाटत होते, आणि गाडी जुन्या अपार्टमेटच्या खाली पार्क केल्यावर ती थोडी बावरली, आणि पाउले जश जशी घराच्या दिशेने पडत गेले तस तसे तीला ते जास्त ओळखीचे वाटु लागले, आणि दार उघडुन आत गेल्यावर तर तीच्या डोळ्यातुन असपाणी वाहु लागले, लग्नातील दोघाचा फोटो समोरच होता, आणि मानस लहान असतानाचे फोटो ही भितीवर लावले होते, अमेय तिच्याकडे पहात होता आणि ती अलगत अमेयच्या कुशीत शिरली आणि हमसुन रडु लागली आणि तेव्हा तीच्या ओठावर वाक्य आले "मी तुला समजायला चुकले.” मला माफ कर.

जीवनमानलेख

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

21 Jun 2008 - 2:55 pm | मदनबाण

शितलताई मस्तच लिहल आहेस तु ,,,सगळ कसं अगदी डोळ्यासमोर घडतं आहे अस वाटल.....

मदनबाण.....

अनिल हटेला's picture

21 Jun 2008 - 9:15 pm | अनिल हटेला

वा !!!

सून्दर लिखाण आहे बर....

सगळ कस नजरेसमोर घडतये असच वाटल....

अजुन वाचायला आवडेल......

देवदत्त's picture

21 Jun 2008 - 9:45 pm | देवदत्त

छान एकदम. :)

सखाराम_गटणे™'s picture

21 Jun 2008 - 9:56 pm | सखाराम_गटणे™

ऐकदम एमोशनल करुन टाकले हो.
मी पण बर्याच लोकांना छोट्या छोट्या कारणाने अलग होताना पाहीले आहे.

सखाराम गटणे
(धमु, छोटा डॉन, आंद्या, पिवळा डांबिस, विजुभाउ इ. यांच्या वर्गातला :))