मंडालेचा राजबंदी

अमितसांगली's picture
अमितसांगली in काथ्याकूट
21 Jun 2012 - 9:21 am
गाभा: 

नुकतेच अरविंद गोखले यांचे 'मंडालेचा राजबंदी ' हे लोकमान्य टिळक यांच्यावरील राजद्रोहाच्या तिन्ही खटल्यांची माहिती देणारे पुस्तक वाचनात आले. अरविंद गोखले हे केसरी या नियतकालीकेचे दहा वर्ष संपादक होते. लोकमान्य टिळकांचे नातू जयंत टिळक यांच्याशी त्यांचा अत्यंत घनिष्ट संबंध होता.

लोकमान्यांचे केसरीमधील लेख, त्यांची भाषणे, मंडालेच्या तुरुंगातील पत्रव्यवहार, त्यांचे वकिली कौशल्य, राजद्रोहाच्या शिक्षेची कारणे, त्याबद्दल लोकमान्यांनी दिलेले स्पष्टीकरण, मंडालेच्या तुरुंगामधील त्यांनी काढलेली ६ वर्षे, इंग्लिश, फ्रेंच, जर्मन, पाली व संस्कृत या भाषांमधील त्यांचे ज्ञान व वाचन, त्यातून जन्माला आलेला गीतारहस्य ग्रंथ, स्वराज्याबद्दल वाटणारी कळकळ व टिळकांचे मृत्यूपत्रही त्यात वाचायला मिळेल.

लोकमान्य टिळक डावपेच खेळण्यात तरबेज होते. राजद्रोहाच्या दुसऱ्या खटल्यात त्यांनी न्यायालयात स्वतः त्यांची बाजू मांडली होती.त्यावेळी साक्षीदारांची घेतलेली उलटतपासणी (खूप विस्तृतपणे लिहिले आहे) त्यांचे नैपुण्य दाखविते.

एकूणच शंभर वर्षापूर्वीचा सारा इतिहास पुन्हा पिंजून उभी केलेली एका राष्ट्राभक्ताची संघर्षगाथा...

प्रतिक्रिया

धागा काढण्याचा उद्देश समजला नाही.

पुस्तकाचा परिचय करून देण्याचा उद्देश असेल तर तो परिचय खूपच त्रोटक झाला आहे असे नमूद करावेसे वाटते.

पुस्तकाबद्दल अजूनही माहिती यायला हवी होती.

अमितसांगली's picture

21 Jun 2012 - 9:36 am | अमितसांगली

परिचय करून देण्याचा उद्देश होता. सविस्तरपणे लिहीन.

कारण....

१. ज्याला वाचनाची आवड आहे, तो हे पुस्तक वाचणारच
आणि
२. ज्याला वाचनाची आवड नाही, त्याला तुम्ही कितिही सांगितले तरी पण तो पुस्तक वाचणारच नाही...

मग कशाला आपला वेळ वाया घालवता? मी तर हे पुस्तक वाचणारच आहे.कारण मी वाचन-व्यसनी आहे आणि १०-१२ वा़क्यांत तुम्ही , पुस्तकाची बर्‍यापैकी ओळख करून दिली आहे.
निदान मला तरी , एव्हढी ओळख भरपूर झाली..

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

21 Jun 2012 - 9:45 am | निनाद मुक्काम प...

सविस्तर लेखाची वाट पाहतोय

लोकमान्य टिळकांनी सुरु केलेले 'सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयन्ती' हे २ उत्सव आपण दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरे करतो. पुण्यातला सार्वजनिक गणेशोत्सव व विविध देखावे पाहण्यासाठी बाहेरचे लोक मुद्दाम सुट्टी काढून येतात. . . . . . . अगदी पूर्वीपासून!

अमित'जी... "मन्डालेचा राजबंदी" -लोकमान्य टिळकां'बद्दल अधिक माहिती जाणून घ्यायला आवडेल!
"गीतारहस्य" जाणलेले ते एक थोर महामानव होते.

* लोकमान्य टिळकांनीच प्रथम नारायण राजहंस'जींना "बालगन्धर्व" असे सम्बोधले.. व 'बालगन्धर्व' सर्वपरिचित आणि लोकप्रिय झाले...