"...कविता कविता कविता..."

विदेश's picture
विदेश in जे न देखे रवी...
18 Jun 2012 - 9:41 am


इकडे कविता तिकडे कविता
बघावे तिकडे कविताच कविता
पेपरच्या पुरवणीत कविता
मासिकाच्या गदारोळात कविता
रद्दी कागदावर दिसते कविता
कवितेच्या रद्दीवर कविता
सुटका नाही बजावतात कविता
संमेलनात सतावतात कविता
ऑर्कुट कविता सर्किट कविता
ब्लॉग कविता फेसबुक कविता
चितेवर कविता चिंतेवर कविता
उन्हावर कविता पावसावर कविता
गारांसारख्या आदळतात कविता
धबधब्यासारख्या कोसळतात कविता
तहानभूक विसरून कविता
उठता बसता पाडतात कविता
शब्दांपुढती शब्द कविता
वेळही जातो बनते कविता

शांतरसकवितामौजमजा

प्रतिक्रिया

स्पंदना's picture

18 Jun 2012 - 1:24 pm | स्पंदना

इतक्या वेळा तुम्ही एकच शब्द लिहिलात.
नाही उगा नोट केल.
तुम्हाला होउ देत.