'हाल ए दिल'ः हालच हाल

विकीपियु's picture
विकीपियु in जनातलं, मनातलं
21 Jun 2008 - 12:07 pm

आपल्या चित्रसृष्टीवर नेहमीच असा आरोप केला जातो की आपले दिग्दर्शक हॉलिवूडपटांमधून उचलेगिरी करत असतात.

मात्र त्यांनी तो खोटा ठरविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. आता हॉलिवूडपटांमधून नव्हे तर हिंदी चित्रपटांतूनच चोरी

केली जाऊ लागली आहे. या आठवड्यात प्रदर्शित झालेल्या 'हाल-ए-दिल'चे हाल यापेक्षा वेगळे नाहीतच. दिग्दर्शकाने

'जब वी मेट' या चित्रपटाची कथा अगदी सराईतपणे चोरली आहे.

शेखर सुमनाचा मुलगा अध्ययन सुमन या चित्रपटातून इंडस्ट्रीमध्ये करिअरची सुरुवात करीत आहे. या व्यतिरिक्त

चित्रपटात काहीही नवीन नाही. चित्रपटाची कथा आहे, संजनाची (अमिता पाठक) जी रोहितवर (अध्ययन सुमन) प्रचंड

प्रेम करते. आणि अचानक तिच्या आयुष्यात शेखर (नकुल मेहता) येतो. चित्रपटाची अर्धीअधिक कथा शेखर आणि

संजना यांच्या ट्रेनमधील प्रवासाभोवतीच फिरते. दोघांसोबतच प्रेक्षकांनाही तो असह़य होतो. कथेच काहीही नावीन्य

नाही. संगीत बरे आहे मात्र ढिसाळ कथेमुळे ते देखिल तग धरू शकणार नाही.

कुमार मंगत यांची निर्मिती असलेला हा चित्रपट बिग स्क्रीन बॅनर अंतर्गत बनला आहे. अजय देवगण आणि काजोल

चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत काहीवेळ दिसतात. हाल मात्र कथेच्या पात्रांचे होण्यापेक्षा प्रेक्षकांचेच जास्त

होतात.

चित्रपटसमीक्षा