रेशिमगाठी

शकु गोवेकर's picture
शकु गोवेकर in काथ्याकूट
17 Jun 2012 - 4:46 am
गाभा: 

परवा एका लग्नाला जायचा योग आला.
वर वधु या दोन्ही कडची मंडळी सुशिक्षित व समंजस होती परंतु मला वाट्ते की काही छोट्या कारणांमुळे दोन्ही घरांमधील नारा़जी व रुसवे पणा दिसुन आला
तर मग रेशिमगाठी म्हणजे काय हो ? माझ्या मते रेशिमगाठ ही एक अशी गाठ आहे की ,जी करकचुन वा आवळुन बांधता येत नाहि किंवा खरेच मनाचे धागे जुळ्ले तर ही गाठ सैल होत नाही ,मग ही गाठ परिचय व नंतर प्रेम व नंतर विवाह अशी असो किंवा अगदी कांदा पोहे खाउन व पहाणे कार्यक्रम करुन व ईतर सर्व गोष्टि पाहुन केलेला किंवा झालेला विवाह असो,
परंतु पत्रिका पाहुन व थोरा मोठ्यांच्या संमती ने ठरवुन किंवा प्रेमाने केलेला विवाह सुद्धा नंतर टिकु शकतो काय ? मग सुखी विवाहाचे गमक काय? मि पा कराना काय म्हणायचे आहे ?

प्रतिक्रिया

श्रीरंग_जोशी's picture

17 Jun 2012 - 4:58 am | श्रीरंग_जोशी

यात शंकाच नाही की हा विषय रोचक आहे.

परंतु सुखी विवाहाचे (नेमके) गमक शोधणे हे सुखी माणसाचा सदरा शोधण्यासारखे आहे.

शिल्पा ब's picture

17 Jun 2012 - 6:23 am | शिल्पा ब

तुमचेच उदा. देउन सांगा ना हो आज्जी!

इनिगोय's picture

19 Jun 2012 - 2:03 pm | इनिगोय

का मावशी.?

बाकी हौस दांडगी आहे हो!

रोचक विषय !! विचार वाचण्यास उत्सुक...

अप्रतिम's picture

17 Jun 2012 - 8:31 am | अप्रतिम

शकुताई सध्या कोणता चित्रपट पहाताय?

मेघवेडा's picture

19 Jun 2012 - 1:22 pm | मेघवेडा

रेशीमगाठी, प्रेम, चित्रपट, सुखी विवाह, दिवस जातील वगैरे गोष्टी एकत्र पाहून सूरज बडजात्यांची आठवण आली! :)

गणपा's picture

19 Jun 2012 - 1:29 pm | गणपा

मला हे आठवले. ;)

चिरोटा's picture

17 Jun 2012 - 9:25 am | चिरोटा

परंतु पत्रिका पाहुन व थोरा मोठ्यांच्या संमती ने ठरवुन किंवा प्रेमाने केलेला विवाह सुद्धा नंतर टिकु शकतो काय

वेळच्या वेळी कांदेपोहे, खिचडी,बटाटेवडे,शिरा,उपमा घरात बनवले गेले तर विवाह दीर्घकाल टिकतो.

किसन शिंदे's picture

17 Jun 2012 - 9:33 am | किसन शिंदे

वेळच्या वेळी कांदेपोहे, खिचडी,बटाटेवडे,शिरा,उपमा घरात बनवले गेले तर विवाह दीर्घकाल टिकतो.

शमत आहे. मग तो विवाह आई-वडिलांनी ठरवलेला असो वा प्रेम करून केलेला असो, त्याने काही फरक पडत नाही. ;)

आचारी's picture

17 Jun 2012 - 10:45 am | आचारी

सुखि स॑साराचा मार्ग नवर्‍याच्या पोटातुन जातो !

खरे आहे काय??????

या प्रश्नाचं उत्तर जाणण्यासाठी अजय देवगणचा "ओंकारा" बघावा अशी शिफारस करेन.

अर्धवटराव

एमी's picture

20 Jun 2012 - 6:35 am | एमी

:-D मलापण तेच आठवलं
बाकी ज्यांच्या ह्रदयाचा मार्ग पोटातून जातो त्यांच्या ह्रदयात स्वयंपाकीण बाई फारच उच्च स्थानावर असेल ना

अर्धवटराव's picture

20 Jun 2012 - 9:20 pm | अर्धवटराव

आणि काहि "हटके" लोकांच्या हृदयात संजीव कपुर ;)

अर्धवटराव

दादा कोंडके's picture

20 Jun 2012 - 9:56 pm | दादा कोंडके

जमाना खराब है, अगदी मिपावरच्या बल्लवाचार्‍यांनीसुद्धा सावध रहायला पहिजे! :)

श्रीरंग_जोशी's picture

17 Jun 2012 - 10:55 am | श्रीरंग_जोशी

या विषयावर अधिकारवाणीने विचार व्यक्त करण्याएवढी योग्यता माझ्यात नक्कीच नाही. तरीही एक प्रयत्न म्हणून खालील विचार या व्यासपीठावर मांडतो आहे. काहीही चुकीचे वा आक्षेपार्ह वाटल्यास त्याबद्दल अवश्य लिहावे व उदार मनाने माफ करावे हि विनंती...

सहजीवन यशस्वी होण्यासाठी लागणाऱ्या काही गोष्टी...

संयम - विवाह एक ठरवून घडवून आणलेली घटना असली तरी लग्न हि मुरत जाणाऱ्या लोणच्यासारखी एक प्रक्रिया आहे. आयुष्याचा जोडीदार म्हणून जबाबदारीचे भान हळुवारपणे येते. लहानपणापासूनच्या बऱ्याच सवयी बदलणे भाग असते परंतु हे बदल अल्पकाळात घडतील अशी अपेक्षा जोडीदाराने करणे संयुक्तिक नाही. मुळात अचानक होणारे बदल बहुतेकवेळा टिकाऊ नसतात. त्यासाठी वेळ द्यावा लागतो, प्रोत्साहनही द्यावे लागते. दुर्दैवाने आजच्या वेगवान काळात संयम ही दुर्मिळ होत जाणारी गोष्ट आहे.

मनाचा मोठेपणा - कष्ट, त्याग व सेवा हे समाजशील प्राणी म्हणून प्रत्येक मर्त्य मानवाच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहेत. या बाबतीत स्वतःचा कधीही उदो उदो करू नये. व या गुणांसाठी जोडीदाराला शक्य तेवढे प्रोत्साहन द्यावे.

शब्दांचा जपून वापर - जगात कुणाचाही अपमान करणे अवघड नाही. जोडीदाराचा तर नाहीच नाही. पण एखादी गोष्ट न रुचल्यास घालून पाडून बोलू नये, जमेल तेवढ्या संयत भाषेचा वापर करून आपला मुद्दा पटवून द्यावा.

अतिरेकी शिस्त नको - घराबाहेर जागोजाग प्रत्येक व्यक्तीला शिस्तीचे पालन करावेच लागते. घरातही केले तर उत्तमच. पण जोडीदाराकडून अतिरेकी शिस्तीची अपेक्षा बाळगणे हे अव्यावहारिक ठरू शकते. या बाबतीत लवचीकपणा दाखवणेच बरे.

व्यक्तिस्वातंत्र्य - विवाह झाल्याने एक दुसरी व्यक्ती आपली जोडीदार बनते. तिने आपल्या सुख, दु:ख संकटात सामील होणे ही अपेक्षा वाजवीच आहे. परंतु आपला जोडीदार एक आपल्यापेक्षा वेगळ्या वातावरणात स्वतंत्रपणे वाढलेली व्यक्ती आहे, तिच्या प्रतिक्रिया नेहमीच आपल्याला अपेक्षेप्रमाणे मिळू शकणार नाही याचे भान ठेवावे.

जोडीदाराच्या प्रिय गोष्टी -आपल्या जोडीदाराच्या भावनिकरीत्या जवळ जाण्यासाठी याहून उत्तम मार्ग नसावा. आपल्या जोडीदाराच्या प्रिय गोष्टींविषयी (यात कुटुंब, मित्र, छंद वगैरे बरेच काही असू शकते) आत्मीयता बाळगणे. हे खरंच सोपे नसते पण अशक्य नक्कीच नाही.आत्मीयता बाळगणे जमत नसल्यास वादाच्या वेळी या गोष्टींचा उद्धार तरी करू नये.

आर्थिक व जीवनातील इतर बाबींचे नियोजन -आजच्या काळात दोन्ही जोडीदार कमावत असताना खर्च व गुंतवणूक याबाबतीत दोघांचेही यथोचित योगदान हवे. यात होणारे असंतुलन पुढे जाऊन असंतोषात परावर्तित होऊ शकते. अन इतरही बाबींचे काटेकोर नाही तर ढोबळ नियोजन नक्कीच हवे. परंतु एखाद्या मोठ्या अडचणीच्या वेळी लवचीकता दाखवण्याचे तारतम्यही ठेवायला हवे.

अवाजवी व अव्यावहारिक अपेक्षा ठेवू नये - आपला जोडीदार आपल्यासारखाच सामान्य व्यक्ती असतो. अपवादात्मक परिस्थितीखेरीज त्याच्याकडून दैनंदिन जीवनात अवाजवी व अव्यावहारिक अपेक्षा ठेवू नये. यात जितके तारतम्य बाळगता येईल तेवढे उत्तम.

काळानुरूप अथवा काळाच्या पुढे चालण्याचा प्रयत्न करावा - (जोडीदाराला न पटणारी) एखादी गोष्ट केवळ पिढ्या न पिढ्या वा वर्षानुवर्षे चालत आली आहे म्हणून ती जोडीदारावर लादता कामा नये. काळाबरोबर बदलत राहावे. नाही तर कालबाह्य होण्यास वेळ लागत नाही.

सारांश - या विषयावर जितके लिहावे तेवढे कमीच आहे. परंतु स्वतःच्या उदाहरणावरून प्रामाणिकपणे सांगतो असे विचार मांडणे फार सोपे आहे पण अमलांत आणणे तेवढेच कठिण.

श्रीरंगजी मुळ धाग्यापेक्षा तुमचा प्रतिसाद जास्त मोठा , सखोल, अन व्यवस्थित मांडणीचा आहे.

Maharani's picture

18 Jun 2012 - 6:43 pm | Maharani

+१

बॅटमॅन's picture

17 Jun 2012 - 2:47 pm | बॅटमॅन

ही रेशीमगाठ नीट बांधली तर नाडी सुटत नाही....कसे ;)

दादा कोंडके's picture

17 Jun 2012 - 4:25 pm | दादा कोंडके

उलटपक्षी वेळच्या वेळी नाड्यासुटणे हे पक्क्या बसलेल्या रेशिमगाठीचं गमक आहे! :)

उलटपक्षी वेळच्या वेळी नाड्यासुटणे हे पक्क्या बसलेल्या रेशिमगाठीचं गमक आहे!
ख्या ख्या ख्या खी खी खी ! ;)

बॅटमॅन's picture

17 Jun 2012 - 8:27 pm | बॅटमॅन

और ये लगा एक शानदार दादा कोंडके द्व्यर्थी सिक्सर!!!!! :)

नर्मदेतला गोटा's picture

18 Jun 2012 - 11:45 pm | नर्मदेतला गोटा

अंडरलाएनीमुळे काय होतं

गाठ सुटत नाही का

अंडरलैनीमुळं नाडीवर श्लेष होतो या ठिकाणी.

तर्री's picture

17 Jun 2012 - 3:09 pm | तर्री

कुठेही ...काहीही...

परा, तुमच्या दुकानात रोजमेळ मिळतील का हो ?

पक पक पक's picture

17 Jun 2012 - 8:01 pm | पक पक पक

त्ये गाठीच एक टोक ह्याच्या हातात अन एक टोक तिच्या हातात दिल की झाल,अजाबात नाय सुट्णार गाठ. :)

श्रीरंग_जोशी's picture

18 Jun 2012 - 2:22 am | श्रीरंग_जोशी

कारण संसार म्हंटला की ओढाताण ही होणारच.

मोहनराव's picture

18 Jun 2012 - 11:41 am | मोहनराव

कॉलिंग किचेनतै!! ;)

कपिलमुनी's picture

18 Jun 2012 - 1:25 pm | कपिलमुनी

;)

अत्रुप्त आत्मा's picture

18 Jun 2012 - 11:38 pm | अत्रुप्त आत्मा

@कॉलिंग किचेनतै!! >>> जोरदार अणुमोदण. ;-)

किच्चु ताई लवकर ये...

नर्मदेतला गोटा's picture

18 Jun 2012 - 11:26 pm | नर्मदेतला गोटा

हा चर्चेचा विषय आहे की खरड तेच कळले नाही

मिसळपाव मंडळाने सध्याच्या धाग्यांबाबत आणि त्यातील विषयांबाबत
तातडीने चिंतन बैठक करावी

असे वाटू लागले आहे

(चिंता बैठक)

तर्री's picture

19 Jun 2012 - 1:24 am | तर्री

आधीच प्रोब्लेम त्यात वटपौर्णिमेला गाठ अजून घट्ट करण्यात आली आहे.

श्रीरंग_जोशी's picture

20 Jun 2012 - 10:31 am | श्रीरंग_जोशी

नुकताच हा लेख वाचला. डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा लेख आहे.