सत्यमार्गा उजळुनी आम्हास तारा बापुजी

JAGOMOHANPYARE's picture
JAGOMOHANPYARE in जे न देखे रवी...
16 Jun 2012 - 12:12 am

अंतराळी कालगंगी अढळ तारा बापुजी
सत्यमार्गा उजळुनी आम्हास तारा बापुजी

पेटत्या हीमालयाची रोजची होई व्यथा
तोफगोळ्यांचा धुमसता नित्य मारा बापुजी

विहिर सुकली रान सुकले ऊष्ण उन्हाच्या झळा
आपुल्या शेळीस आणू कुठुन चारा बापुजी

भ्रष्ट नेते देश लुटती खाटकाची गाय ही
संस्कृतीचे वाजवीती रोज बारा बापुजी

पीक येवो वा न येवो नित्य कर्जे काढली
फाटला घेऊन बोजा सात बारा बापुजी

पाचशेची नोट कोणी काल दारी फेकली
धुंद लोकांच्या सभेचा आज नारा बापुजी

शांतरसगझल

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

16 Jun 2012 - 9:06 am | प्रचेतस

:)

JAGOMOHANPYARE साहेब,
खरच विचार करायला लावणारी कविता आहे.

परिकथेतील राजकुमार's picture

16 Jun 2012 - 12:19 pm | परिकथेतील राजकुमार

बापुंमुळे देशाला काय काय भोगावे लागत आहे हे बापुजींना कोणीतरी सुनवायची गरज होतीच.

धन्यवाद.

नाना चेंगट's picture

16 Jun 2012 - 12:20 pm | नाना चेंगट

हा हा हा !!!

बापूंचा मार्ग जनतेने सोडला म्हनुन हे झाले.

.. नथुकथेतील रामकुमार

जबर कविता - मूलगामी प्रतिसाद.

संस्कृतीचे वाजवीती रोज बारा बापुजी
हा हा हा जबर्‍या!
परखडपणा आवडला!!

गणपा's picture

16 Jun 2012 - 6:01 pm | गणपा

आवडली.