निराकार

अज्ञातकुल's picture
अज्ञातकुल in जे न देखे रवी...
10 Jun 2012 - 5:27 pm

आलो वेस ओलांडून देह जन्म त्वा वाहून
आले गेले निरोपाचे रोप अंगणी लावून

करू पाहिला संसार ऐहिकाचा मुका मार
पळ पळालो बेजार नाही फिटला अंधार
रूप निरूप आकार विरूपाची सोंगे फार
जेहि देखणे पाहिले नाहि भेटला आधार

जळू गेली माया काया छेडली अंगी शततार
राहिल्या न पडदे भिंती दिसू लागले त्या पार
क्षणाची उसंत बेतली उलगडले घन संभार
घरटे उसवून उघडले उजेडास मिटले दार

सुटे मोकळे आकाश जीव आता,.. विना पाश
झिंग निराकार अशी ही नको पुन्हा उसने श्वास
शेवटास आरंभाची चिरंजीव वेडी आशा
राहुदेत ध्रुवापाशी अशी चंदनी आरास

.........................अज्ञात

शांतरसकविता

प्रतिक्रिया

निवेदिता-ताई's picture

10 Jun 2012 - 7:14 pm | निवेदिता-ताई

छान

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

11 Jun 2012 - 4:37 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

मस्त रचना.
आवडली.

कवितानागेश's picture

11 Jun 2012 - 5:29 pm | कवितानागेश

राहुदेत ध्रुवापाशी अशी चंदनी आरास
ही ओळ कळली नाही.

अज्ञातकुल's picture

11 Jun 2012 - 6:23 pm | अज्ञातकुल

...................... विना पाश सुटे मोकळे आकाश
श्वासांविना निराकार झिंग
ही सुगंधी अवस्था ध्रुवापाशी (अढळ) राहू देत.
(पुन्हा जन्म मरणाच्या फेर्‍यात अडकवू नकोस)

अशी याचना आहे ती.........

.............................अज्ञात :)

इनिगोय's picture

11 Jun 2012 - 5:51 pm | इनिगोय

शांतरसातली ही रचना आवडली.

रूप निरूप आकार विरूपाची सोंगे फार
जेहि देखणे पाहिले नाहि भेटला आधार

हे अगदी ओळखीचं वाटलं.