माझा नवरा नाही काही कामाचा
माझा नवरा आहे बिनकामाचा
सकाळी सकाळी पिवून येतो
संध्याकाळी झोकून घेतो
बिनघोर पडतो रात्रीचा
दारू प्यायला मागतो पैसे
पैसे मी आणावे कुठून कसे
त्यासाठी कायम करतो घोशा
फाटक्या संसारात पडला पाय
तुम्हीच सांगा मी करावं काय
त्याला पायपोस लागेना कशाचा
दुसर्या बायांकडे बघते जेव्हा
आनंद होतो मनात तेव्हा
संसार तसा होवो माझा सुखाचा
प्रतिक्रिया
10 Jun 2012 - 8:59 pm | पक पक पक
आज चकण्याला चक्क जिलबी... :bigsmile: :bigsmile: :bigsmile:
अन हे काय ?घरच्या घरीच काव्य चोरी..........? :crazy:
11 Jun 2012 - 8:36 am | श्रीरंग_जोशी
सारा गाव मामाचा, एक नाही कामाचा...
कविता वाचून मजा आली...