नियती ? नाय नाय टेंपोवरती!

संजय क्षीरसागर's picture
संजय क्षीरसागर in जनातलं, मनातलं
5 Jun 2012 - 5:23 pm

प्रेरणा : नियती ( http://www.misalpav.com/node/21857)

रक्ताळलेल्या प्रार्थना या अत्यंत प्रभावी कवितेतून इथे पदार्पण करणार्‍या हजाक या कविश्रेष्ठांची ही दुसरी कविता

नक्की कोणत्या त्रासामुळे अशी निर्मिती होते? या प्रश्नाला कविवर्यांनी "भळभळती वेदना कुठल्याही साच्याचा भाग बनु शकत नाही" असं उत्तर दिल्यानं आता वाचकांना अजून कायकाय सहन करावं लागणाराये याचा अंदाज येऊ शकतो.

"इतरांचा विचार करावा की नाही याबद्दल काय वाटतं, का जाऊं द्या सगळे बाराच्या भावात?" यावर त्यांनी "इतरांचा विचार करुन लेखन केलं तर नवं काही देता येईल का?" असा प्रतिप्रश्न करून आम्हाला निरूत्तर केलय!

तर आता ही कविता:

कविनं जीवंतपणीच स्वत:ची अंतयात्रा काढली आहे त्यामुळे शेवट जरी :

>आणि चालताना सोबत असते फक्त
एक न संपणारी शवयात्रा

असा दारुण असला तरी भळभळती वेदना समजल्याशिवाय गत्यंतर नाही.

सुरुवात पाहा :

>कधी कधी,
सैरभैर, प्रश्नांकित होऊन,
शरिर स्वतःला हरवुन बसतं
गर्दीत लहान मुलासारखं

"हुकलेला" या शब्दाचं हे काव्यात्मक वर्णन वाटत असेल तर "गंडलेला" म्हणजे काय हा प्रश्न वाचकांना पडणार हे ओळखून कविनं पुढे लिहिलय :

>आणि कधी आपण
मनाला हरवु देतो
कधीकधी वेगळं जगता यावं
म्हणुनसुद्धा....

आता अशा परिस्थितीत कर्मालाच (सॉरी नियतीला) दोष जातो, हो की नाही ? एकदम बरोब्बर ओळखलत!

>पण नियती कधीच
हरवुन बसत नाही स्वतःला
ती आंधळ्या डोळ्यांनी
नी बांधलेल्या हाताने
धापा टाकत,
मूकपणे चालत रहाते.

आता अशा अवस्थेत गप घरी बसायला हवं ना? पण नाही, मूकपणे चालयच. आता "भंजाळल्यासारखं" म्हणजे काय? हा प्रश्न ओघानं येणारच, त्यावर कविराज म्हणतात:

तिच्यात
सापळ्याआड धडधडणारं
असं काहीच नसतं.
कुण्याच्याही स्पर्शाने
उभे रहाणारे किंवा सुटणारे
प्रश्न नसतात.

म्हणजे एक वेळ पेशवे परवडले पण हे नाही झेपत म्हणायची वेळ आली असं म्हणायच का? तर नाही अजून पुढची वेदनेची कळ यायचीये :

भंगणारी आकांक्षा,
फाटलेलं ह्र्दय
शोकाचे सुर
पश्चातापाचे निश्वास
जखमा आणि सारं काही
असतं शवपेटीत बंद

आता ही शवपेटी टेंपोवर ठेवली म्हणजे "न संपणारी शवयात्रा" व्यवस्थित मार्गस्थ होईल असं वाटत असलं तरी कवि आपला हट्ट सोडणार नाही, तो निरागसपणे विचारेल "हा टेंपो कुठे मिळेल हो?"

देशांतरमुक्तकचौकशीप्रश्नोत्तरेमदत

प्रतिक्रिया

जोयबोय's picture

6 Jun 2012 - 2:46 pm | जोयबोय

संजय राव सलाम,

़ज्या कवितेचा अर्थ लावता लावता नाकी नऊ आले तत्याचे तुम्ही सोप्या भाषेत अर्थबोध करून दीला त्याबद्दल अभार

पैसा's picture

6 Jun 2012 - 6:16 pm | पैसा

एक नंबर रसग्रहण!