सतावणारा प्रश्न तुझा " मी जाऊ "

रघु सावंत's picture
रघु सावंत in जे न देखे रवी...
29 May 2012 - 11:58 pm

सतावणारा प्रश्न तुझा
" मी जाऊ "

तुझ्याकडे पाहून तुला हवय काय
माझ्या शिवाय कुणाला कळेल काय
डोळ्यातले भाव ह्रदयातील ताना
माझ्या शिवाय कधी कळतील काय
ओझरता स्पर्श अनं भरलेले ऊर
माझ्या शिवाय कधी मिळतील काय
जाशील तू दूर पण सवयीचा श्वास
माझ्या शिवाय कुठे मिळेल काय
असशील सुखात पण प्रेमाची शाल
माझ्या शिवाय कुणी पांघरेल काय
येताजाता तुझ्या प्रेमाचा कटाक्ष
माझ्या शिवाय कुणी झेलेल काय
ते आसुसलेले ओठ ती प्रेमाची भूक
माझ्या शिवाय कुणी क्षमवेल काय
रुपगव्रीते तुझ्या तारुण्याची तारिफ
माझ्या शिवाय कुणी करेल काय
रंगल्या रात्री तुझ्या प्रेमाचा मिलाप
माझ्या शिवाय कुणी करेल काय
तुझ्या ह्रदयाला हाक प्रेमाची साथ
माझ्या शिवाय कुणी देईल काय
असतील बहु आणी होतील ही बहु
पण माझ्या सारखा कुणी होईल काय .

शृंगारकविता

प्रतिक्रिया

अविनाशकुलकर्णी's picture

31 May 2012 - 9:55 pm | अविनाशकुलकर्णी

कळेल काय..होईल काय ...करेल काय
इतक्या प्रश्णाच्या सरबत्ति पुढे ति टिकेल का?
का पळ काढेल???

अविनाशकुलकर्णी's picture

31 May 2012 - 9:55 pm | अविनाशकुलकर्णी

कळेल काय..होईल काय ...करेल काय
इतक्या प्रश्णाच्या सरबत्ति पुढे ति टिकेल का?
का पळ काढेल???

रघु सावंत's picture

2 Jun 2012 - 11:59 pm | रघु सावंत

टिकलीच पाहिजे ,तेच तर तिला समजावण्याचा हा अट्टाहास चालू आहे.
माझ्या मते माणसाने माझ्या या वरिल कविते प्रमाणे प्रेम करावे.
मग तिने आपल्यापेक्षा १० पटीने सुंदर असणार्‍या माणसाची लग्न केलं तरीही,
आपल्या प्रेमाची चव तिला तिथे मिळणार नाही.छाती ठोक पणे सांगतोय =रघू सावंत