1

जात जात जात

Primary tabs

रमताराम's picture
रमताराम in जे न देखे रवी...
29 May 2012 - 4:59 pm

जिथे तिथे चहुकडे आम्हा लिहावी लागते जात.
जन्म घेतल्याक्षणीच आमच्या मागे लागते जात.

जन्म नोंदणी करतेवेळी लिहावी लागते जात.
शाळेत दाखल करताना लिहावी लागते जात.
फी भरतानाही शाळेत पुन्हा पाहिली जाते जात
नोकरीसाठी वणवणताना लिहावी लागते जात.

ब्राह्मण, मराठा, महार चांभार असो तुमची जात.
नालायकांच्या नालायकीची आधार असते जात.
अपयशाला नि न्यूनाला पण लपवून ठेवते जात
लायकीला पण बंधन नसते, नसते कुठली जात

बढतीसाठी हापिसात रांगा, सांगा पुन्हा जात
तुमची आमची रांग वेगळी, वेगळी तुमची जात
दहावी, बारावीत बोर्ड सांगतं, वेगळी तुमची जात
सैनिकांच्या पलटणीतूनही दिसून येते जात

इलेक्शनच्या फडी उतरता, लिहावी लागते जात
सर्टफिकेट वरची असो वेगळी, मनात ठेवा जात
मतदात्यांनी मत देताना, ध्यानी ठेवावी जात
पाचशेची नोट घेतल्यावर, कुठे आठवते जात?

टीव्हीवरती बातमी होती, बळीची सांगती जात
कुठली बातमी कवर करावी, हे ही ठरवे जात
आंदोलनाची सर्कस कुठे, कारण पुन्हा जात
वाफ तोंडची पुरोगामी, मनात तुमच्या जात

मरतानाही फॉर्म भरायचा, सांगा तुमची जात
संगे तिथेही ती न्यायची, जाईल कशी ही जात?
जातीवरची वृथा भांडणे, लढवती कमजात
अशा मूढांनी जिवंत ठेवली क्षुद्र अशी ही जात

भयानकबिभत्सबालकथाजीवनमानराहणी

प्रतिक्रिया

रमताराम साहेब, अफाट लिहिल आहात.

आपको मान गये उस्ताद अस म्हणावस वाटत.

एक अतिशय अचुक सटिक तितकी च डोळ्यात अंजन घालणारी कविता .

मृगनयनी's picture

29 May 2012 - 7:28 pm | मृगनयनी

मस्त कविता रमताराम!!! ...

____________________________________

"महापुरुषां"चा गुरु बदलला जातो.. पाहुनि गुरुची जात!
पुतळ्याची विटंबना केली जाते, पाहुनि पुतळ्याची जात!

इतिहासाची वाट लावतानाही पहिल्यांदा पाहिली जाते ती जात!
प्राचीन इतिहास-संस्थांवर हल्ला करतानाही आधी पाहिली जाते ती जात!

कम्पनीत इन्टर्व्यु'च्या वेळेसही पाहिली जाते तुमची जात!
तुमच्या उच्च बुद्धिमत्तेचा उद्धार होतानाही काढली जाते तुमची जात!

बर्‍याचदा तुमच्या वाणीच्या शुद्धतेमुळेही आपोआपच ओळखली जाते तुमची जात! ;)
राजकारण्यांना डावपेच खेळण्यासाठी तर हमखास वापरली जाते ती जात!

अ‍ॅट्रोसिटी अ‍ॅक्ट बनवतानाही ग्राह्य धरली जाते ती जात!
वर्षानुवर्षे झाली तरी या अ‍ॅक्टमध्ये उचित बदल करताना आडवी येते ती जात!

:)

रमताराम's picture

29 May 2012 - 7:31 pm | रमताराम

दोन उदाहरणे इथेच सापडली. जात अमर रहे.

daredevils99's picture

31 May 2012 - 3:53 am | daredevils99

तुमच्या उच्च बुद्धिमत्तेचा उद्धार होतानाही काढली जाते तुमची जात!

बर्‍याचदा तुमच्या वाणीच्या शुद्धतेमुळेही आपोआपच ओळखली जाते तुमची जात!

अशा मूढांनी जिवंत ठेवली क्षुद्र अशी ही जात

तुमच्या उच्च बुद्धिमत्तेचा उद्धार होतानाही काढली जाते तुमची जात!

बर्‍याचदा तुमच्या वाणीच्या शुद्धतेमुळेही आपोआपच ओळखली जाते तुमची जात!

अशा मूढांनी जिवंत ठेवली क्षुद्र अशी ही जात

तरी बरं हे उच्च बुद्धिमत्ता आणि शुद्ध वाणीवाले "मूढ" लोक किमान ऊठसूट आरक्षणाची भीक तरी मागत नाही!!!.... :|

गरीब परिस्थितीमुळे, मागासलेल्या वातावरणामुळे शिक्षणाची जबरदस्त इच्छा असूनही शिक्षण घेऊ न शकणार्‍यांसाठी "आरक्षण" लागू करणे मी समजू शकते.. किम्बहुना अश्या गरजू लोकांना शिक्षणाच्या बाबतीत "आरक्षण" मिळायलाच्च पाहिजे...

परन्तु, आर्थिक परिस्थिती उत्तम असूनही, गावाकडे शेतीवाडी, जमीनजुमला, (काही लोकांचे) साखर कारखान्यांमध्ये शेअर्स .. असूनही (पक्षी:- उच्च मधमवर्गीय किन्वा श्रीमन्त या कॅटेगरीत गणना होत असूनही).. केवळ "जाती" मुळे होणारा फायदा करून घेण्यासाठी जेव्हा काही लोक ( सर्व नाही) आरक्षणासाठी अर्ज करतात... तेव्हा खरोखर त्यांची कीव आल्याशिवाय राहत नाही!.... :|

अर्थात उच्च बुद्धिमत्ता आणि शुद्ध वाणीवाले "मूढ" लोक तर कुणाला अश्या गोष्टी करायला शिकवतही नाहीत किन्वा तसा सल्लाही देत नाहीत!!!

आणि तेव्हा ही "क्षूद्र" जात या "शुद्ध" मूढांमुळे नाही.. तर आरक्षणासाठी हपापलेल्या अप्पलपोट्यांमुळे जिवन्त राहते!...

JAGOMOHANPYARE's picture

31 May 2012 - 1:08 pm | JAGOMOHANPYARE

आरक्षण ही भीक नाही. तो सरकारने अन्याय पीडीताना दिलेला अधिकार आहे..

मृगनयनी's picture

31 May 2012 - 2:27 pm | मृगनयनी

आरक्षण ही भीक नाही. तो सरकारने अन्याय पीडीताना दिलेला अधिकार आहे..

वरती तेच्च तर टंकले आहे ना!.. की 'आरक्षण' हा पीडितांना दिलेला अधिकार आहे.... तर मग जे लोक सध्या पीडित नाहीत..त्यांना हा आरक्षणाचा अधिकारच नाही...

जे लोक ६० वर्षात गवर्नमेन्ट्च्या नोकर्‍या पारम्पारिक पद्धतीने पिढीजात करत आहेत.. तेही भरपूर पगारावर.... मुलाबाळांना कॉन्वेन्टमधे घालून नंतर उच्चशिक्षणासाठी परदेशात पाठवत आहेत... अश्या लोकांना फक्त जातीच्या बळावर "मागासवर्गीय" म्हणून आरक्षण देणे कितपत योग्य आहे?

सरकारी नियमानुसार फक्त "जातप्रमाणपत्राच्या" जोरावर जर अश्या लोकांना आरक्षण मिळत राहिले.. तर मग आमच्यासारखे अल्पसंख्यांक बुद्धीवादी ओरडाआरडा करणारच ना! :|

अर्थात या प्रोसिजरमध्ये खरा पीडितवर्ग मात्र आरक्षणापासून वन्चित राहतो.. याचे जास्त दु:ख होते!

क्रीमी लेयर बद्दल माहिती नाही वाटतं?

कृष्णाजी भास्कर कुलकर्ण्याची सांगाल का हो जात?
छत्रपतीनी मुंडी छाटली पाहिली नाही जात.

ह्म्म...

शिवरायांचे दोन्ही गुरु- दादोजी आणि रामदास्वामी.. यांची जी जात.. तीच कृष्णाजी'चीही जात!!!
आणि जावळीच्या "हणमन्त मोरे"वरही तलवार चालविताना छत्रपतींनी नाही पाहिली जात!

बाजीप्रभू देशपांड्यांच्या रक्ताचा सडा पडला... तोफांच्या सलामीने केली महाराजांनी पावनखिन्डीवर मात!!
मुरारबाजी देशपांड्यांनी तर स्वतःचे मुन्डके छाटल्यानन्तरही स्वराज्य-लढाईला दिली साथ!!!

असो!...

तरी घोषणेतुन गो ब्राह्मण का नाही हो जात?

अरे बापरे!!.. कुणी सांगितलं.. की शिवरायांच्या ललकारीत "गो ब्राह्मण" हा शब्द वापरला जातो? कुठे ऐकलंत किन्वा पाहिलंत?..इथे मिसळपाववर देखील असे काही टंकणारे काही मोजकेच लोक्स असतील!....
पण बाहेर कुठेही शिवरायांच्या ललकारीत.. "गो ब्राह्मण" हा शब्द वापरला जत नाही.. अगदी "जाणता राजा" या महानाट्यात देखील!.. आणि अगदी शिवसेनेमध्ये देखील!!.. एका अतिरेकी संघटनेने बन्दी आणली आहे या शब्दावर!..

अर्थात या संघटनेने बन्दी जरी नसती आणली.. तरी फार विशेष फरक पडला नसता.. कारण "गो ब्राह्मण" मधल्या दुसर्‍या शब्दातल्या जातीतल्या बहुतांश लोकांनाच त्याचे काही वैषम्य वाटत नाही.. त्यांच्या जातीचे नाव असो.. नसो.. काय फरक पडतो? गाड्याबरोबर नाड्याची यात्रा चालतेय ना.. चालू द्या...... (असो.. आम्ही या "बहुतांश" मध्ये येत नसल्याने आमच्या लोकल एरियात का होईना.. पण आम्ही "ते" शब्द वापरतो..!) :)

परिकथेतील राजकुमार's picture

29 May 2012 - 5:15 pm | परिकथेतील राजकुमार

फेटा उडवल्या गेला आहे !

सुहास..'s picture

29 May 2012 - 5:17 pm | सुहास..

चान चान !

आपल्या 'कूळवंत' लेखनसामर्थ्याचे आम्हाला नेहमी कौतुक वाटत आले आहे. ;)

प्रकाश घाटपांडे's picture

29 May 2012 - 5:27 pm | प्रकाश घाटपांडे

एकदा बांधकाम मजूरांच्या झोपडीतील एक छोटा मुलगा फिरताना माझ्या मागे आला " ओ काका ओ काका तुमची जात कुठली हो?" मी त्याला म्हणल तुझी व माझी एकच जात म्हणजे 'माणूस'. गोंधळलेल्या नजरेने तो माझ्याकडे पहात राहिला.
सरकारी नोकरीत व्यक्तिगत माहितीत जात लिहायला सांगितली मी म्हणल 'माणूस' हॅहॅहॅ अशी जात असते का? मला तुझी जात माहित आहे. त्यानेच माझी जात लिहून टाकली. तर अशी ही जात. जात नाही ती जात.

पैसा's picture

29 May 2012 - 5:44 pm | पैसा

ररा नेहमीप्रमाणेच मस्त लेखन! बालकथा, भयानक, बीभत्स सगळं आवडलं!!

मदनबाण's picture

29 May 2012 - 5:50 pm | मदनबाण

जनगणनेत विचारली जाते,सांगा पुन्हा जात

नाना चेंगट's picture

29 May 2012 - 6:06 pm | नाना चेंगट

प्रतिसाद द्यायचा आहे पण आधी तुमची जात विचारावी म्हणतो.. :)

प्रीत-मोहर's picture

29 May 2012 - 6:12 pm | प्रीत-मोहर

मूळ प्रेरणेपेक्षा हे जरा जास्त सुसंगत वाटतय म्हणुन हा फाउल कंसिडरावा का?

अजातशत्रु's picture

29 May 2012 - 7:13 pm | अजातशत्रु

इथेही जाती नुसारच क्रम ?:puzzled:

ब्राह्मण, मराठा, महार चांभार असो तुमची जात.

बरोबर आहे कशी जाणार "जात"? :-(

चर्मकार अगोदर टंकले असते तर बाभळ बुडाली असती ?:puzzled:

रमताराम's picture

29 May 2012 - 7:29 pm | रमताराम

पहा म्हणजे क्रम हा श्रेष्ठत्वानुसार असावा लागतो नि तो ही उतरत्या क्रमानेच असे गृहितक तुमचे की माझे?

माझी कविता जात्यंधतेबाबत असल्याने जात्यंधतेच्या तीव्रतेनुसार तो क्रम आहे असे मी म्हटले तर पार्टी बदलणार की मत... असलेच तर.

अर्धवटराव's picture

31 May 2012 - 1:25 am | अर्धवटराव

>>माझी कविता जात्यंधतेबाबत असल्याने जात्यंधतेच्या तीव्रतेनुसार तो क्रम आहे असे मी म्हटले तर पार्टी बदलणार की मत...
-- कि जात??

सगळे "जात्याच" आंधळे... कुणाकुणाला दृष्टी देशील बाबा?

अर्धवटराव

शिल्पा ब's picture

31 May 2012 - 2:10 am | शिल्पा ब

न्युनगंड घेउनच जगल्यावर नाईलाज होतो...कुठे कुठे जळमटं काढत फिरणार?
बाकी कविता आवडली आहे.

स्पंदना's picture

31 May 2012 - 5:43 am | स्पंदना

सुरेख ररा.

विजुभाऊ's picture

31 May 2012 - 12:18 pm | विजुभाऊ

मला पुण्यात एका कम्पनीत इन्टर्व्ह्यू च्या वेळी माझ्या आडनावाच्या लोकाना कशाला लागते नोकरी असे विचारले गेले होते. तेही एका तथाकथीत उच्चवर्णी एकारान्ती आडनावाच्या इसमाकडून.

मृगनयनी's picture

31 May 2012 - 1:16 pm | मृगनयनी

विजुभौ!... कदाचित तुमच्या आडनावावरून तुम्ही विपुल डी. शहा'चे कुणी नातेवईक वगैरे वाटला असाल.. त्या माणसाला!.. ;) ;) ;) ;)

कारण आपण जसे एकजात "एकारान्ती" लोकांना एकाच मापात तोलता!.. त्याप्रमाणे लोक "शहा"नामक लोकांना एकाच मापात तोलत असावेत!!! ;) ;) असो!.. जात-धर्म नसून मनुष्यधर्म आहे हा!!!

* आमच्या एरियात एक "अम्बानी" नामक सफाईकामगार रोज रस्ता झाडायला येतो.. तरीही काही लोक त्यास विचरतात, की तुम्ही अनिल किन्वा मुकेश अम्बानीकडे का वशिला लावत नाही?.. तुमच्या नात्यातले आहेत ना!! LOLOLOLOL =)) =)) =)) =))

________________

आणि तसेही मराठी माणसांना व्यवसाय करण्यास उद्युक्त करण्यासाठी मोस्ट प्रोबॅब्ली गुज्जु-भाईंचीच उदाहरणे दिली जातात.. कारण भल्याभल्यांना जमत नाही.. पण गुजराथी माणूस व्यवसाय खूप चांगल्या पद्धतीने करतो.. हे सर्वज्ञात आहे... :]

मी तर ऐकलंय..की गुजराथी लोक त्यांचं बिझनेस मधलं टारगेट पूर्ण होईपर्यन्त अन्नात मीठ सुद्धा वर्ज्य करतात!!!.. :)

त्यामुळे गुज्जु लोक्स प्रचन्ड आर्थिक लाभ करून देणारे बिझनेस करण्याचे सोडून नौकरी वगैरे का करत असतील... याचे कुतुहल त्या माणसाला साहजिकच वाटलेले असावे.. म्हणून कदाचित त्याने तुम्हांस हा प्रश्न विचारला असावा... :)

रमताराम's picture

31 May 2012 - 1:20 pm | रमताराम

विजुभाऊ, हे सांगतानाही तुम्हीदेखील त्या व्यक्तीची जात पाहून ठेवली हे सांगून गेला आहात. फुट इन द माउथ!

इथले प्रतिसाद बघता दोन्ही बाजूंनी सोयीस्कररित्या ही कविता 'त्यांच्या'साठी आहे असे समजून आपली पाठ थोपटून घेण्याचा प्रकार चालवला आहे असे दिसते. याला मूर्खपणा म्हणावे की वेड पांघरून पेडगावला जाणे हे ज्याचे त्यालाच ठाऊक.


ब्राह्मण, मराठा, महार चांभार असो तुमची जात.
नालायकांच्या नालायकीची आधार असते जात.

या ओळी इतक्या समर्पक ठरतील असे वाटले नव्हते.

sneharani's picture

31 May 2012 - 1:13 pm | sneharani

मस्त !! :)

बिपिन कार्यकर्ते's picture

31 May 2012 - 1:13 pm | बिपिन कार्यकर्ते

व्वा!

बादवे, ररा, तुही जात कंची? ;)

मृगनयनी's picture

31 May 2012 - 1:18 pm | मृगनयनी

बिका'जी... र.रा. यांनी एका धाग्यात सांगितले होते.. की ते "जमदग्नि" कुळातले आहेत...त्यावरून काय तो निष्कर्ष काढा!!! :) ;) ;)

रमताराम's picture

31 May 2012 - 1:28 pm | रमताराम

तुम्हाला समजलं नसेल - शक्यता बरीच दिसते - तर आता उघड सांगतो. ही कविता इतर कोणाहीपेक्षा तुम्हालाच अधिक लागू पडते. जालावरची जातीवरची जी अश्लाघ्य भांडणे पाहून व्यथित होऊन ही कविता लिहिली आहे त्यात वर सक्रीय झालेले दोन आयडी नि तुम्ही हेच मुख्य कारण आहात. इतर कोणाही पेक्षा तुम्हा तिघांसाठीच आहे ही कविता. अर्थात या तुम्हा लोकांच्या वृत्तीत फरक पडण्याची अपेक्षा नाहीच, अपेक्षा आहे ती इतरांनी डोळस व्हावे ही.

इंग्रजीत एक म्हण सांगितली जाते, नेवर फाईट विद अ पिग, यू मे फील यू आर ट्राईंग टू गेट हिम आउट ऑफ द मड, बट ही डजन्ट वाँट टू.... अँड जस्ट एंजॉय्स मडी फाईट्स. शेवटी शहाणपण हेच की चिखलात राहू इच्छिणार्‍याला तिथेच राहू द्यावे नि आपण पुढे चालू लागावे. तेव्हा माझ्यासाठी हा पूर्णविराम. तुमचे 'मडस्लिंगिंग' चालू द्या.

मृगनयनी's picture

31 May 2012 - 2:02 pm | मृगनयनी

@ रमताराम!

अरे बापरे!!!.. "जाती"वरती एवढी मोठी कविता लिहिलीत... ती आम्हाला, आमच्या (तथाकथित) जात्यंधतेला समर्पितही केली... आणि आम्ही फक्त तुमचे "गोत्र" इथे सांगितले.. तर इतका राग आला ?

तरी बरं आमच्या एका लेखाच्या एका प्रतिसादात.. आपण स्वतःच आपले "गोत्र" स्वहस्ताने टंकित केले होते... (पक्षी: आपले गोत्र आपणच स्वतः सार्वजनिकरीत्या सांगितलेले होते...)

छान!.. हे म्हणजे.. दुसर्‍यांवर आधी मनसोक्त चिखल उडवायचा.. आणि स्वतःच मारलेल्या दगडामुळे काही थेंब स्वतःच्याच अंगावर उडल्यावर मात्र बोम्ब ठोकायची!.....

मुळात "जात" या विषयावर आपण धागा काढला आहे, तर मग त्यादृष्टीने येणारे प्रतिसादही वाचण्याची तयारी ठेवावी!....

आणि आपल्याला जश्या काही गोष्टी व्यथित करतात.. तश्याच आम्हालाही काही गोष्टींमुळे व्यथा होतात बरं का!...

काही कारणास्तव होत असलेल्या स्व-जातीच्या बदनामीला उत्तर देणे हे आपल्या दृष्टीने "मडस्लिंगिंग" होत असेल..
तर मग स्वतःच्या जातीला, जातिबान्धवांना अधिकाधिक कमी लेखून, कायम स्वजातीतले दोषच अधोरेखित करून, इतर बर्‍याच चान्गल्या गोष्टींकडे जाणून बुजून काणाडोळा करून उगीचच सामाजिक सहिष्णुतेचा आव आणणार्‍या आणि निरुत्तर व्हायची वेळ आल्यावर काहीबाही कारणे देऊन कातडी ओढून घेणार्‍या आपल्यासारख्यांच्या वृत्तीला काय म्हणावे बरे?

स्वजातीयांवर टीका हा जातीद्वेश कमी करण्याचा एक मार्ग आहे. म्रुगनैनी तै - आंतर्जाल थोडसं शोधलं तर आपल्याला सर्वच जातीत असे शहाणे लोक्स मिळतील.

मृगनयनी's picture

31 May 2012 - 7:42 pm | मृगनयनी

... राझघराणं'दादा.. ही टीका हल्कीफुल्की असेल तर ठीक आहे हो.. पण इथेतर... .................... जाऊ देत! :|

बाकी "स्वजातीयांवर टीका हा जातीद्वेश कमी करण्याचा एक मार्ग आहे." हे वाक्य अजूनही विनोदी वाटतेय!... असो.. पण त्याबद्दल आपण थोड्याश्या अन्तर्जालावरच्या साईट-लिन्क्स इथे दिल्यात तर बरे वाटेल! ..

राजघराणं's picture

31 May 2012 - 8:47 pm | राजघराणं

http://parabsachin.blogspot.in/2011/07/blog-post_19.html

स्वजातीची बाजू घेउन भांडत राहिलं तर जातिद्वेष कमी होईल काय ?

स्वजातीयांवर टीका हा जातीद्वेश कमी करण्याचा एक मार्ग आहे. म्रुगनैनी तै - आंतर्जाल थोडसं शोधलं तर आपल्याला सर्वच जातीत असे शहाणे लोक्स मिळतील.

आणी अश्या शहाण्या लोकांवरच देश विसंबून आहे

सुनील's picture

31 May 2012 - 9:49 pm | सुनील

सचिन परब यांच्या ब्लॉगचा दुवा दिल्याबद्दल दुवा! त्यांचा लेख आवडला.

परिकथेतील राजकुमार's picture

2 Jun 2012 - 11:45 am | परिकथेतील राजकुमार

स्वजातीयांवर टीका हा जातीद्वेश कमी करण्याचा एक मार्ग आहे.

बरं.
पण मग ह्याचे भान आणि अवधान कायम एकाच जातीने का ठेवायचे ? म्हणजे इतरांनी पण आपल्याला शिव्या द्यायच्या आणि आपण पण स्वतःला शिव्या द्यायच्या. ह्यातून नक्की जातीद्वेष कसा कमी होणार आहे ? आणि जातीद्वेष हेच ज्यांच्या जीवनाचे ध्येय आणि अर्थार्जनाचा मार्ग आहे, त्यांना ह्या सगळ्याने काय फरक पडणार आहे ?

ह्या परब साहेबांच्याच लेखातले आपल्याला सोयीस्कर असे उतारे घेऊन काही विशिष्ठ लोकांनी काल कसा हैदोस घातलाय ते एकदा फेसबुक आणि ओर्कुटवरती बघून या. :)

गंमत, मौजमजा म्हणून ठिक आहे. पण स्वजातीवरती टिका करणे म्हणजे माकडांच्या हातात कोलीत देणे असे माझे स्पष्ट मत आहे.

राजघराणं's picture

2 Jun 2012 - 1:18 pm | राजघराणं

अवधान कायम एकाच जातीने का ठेवायचे ? - अस कोण म्हटल बुवा ?

ओरकूट फेसबूक ची लिंक द्या - परब साहेबांच्याच लेखातले आपल्याला सोयीस्कर असे उतारे घेऊन काही विशिष्ठ लोकांनी काल कसा हैदोस घातलाय ते एकदा फेसबुक आणि ओर्कुटवरती बघून या. Smile

सुहास..'s picture

31 May 2012 - 4:48 pm | सुहास..

की ते "जमदग्नि" कुळातले आहेत...त्यावरून काय तो निष्कर्ष काढा!!! >>>

मायला , मी अजुन जिवंत असताना लोक काहींना माझ्या कुळातले कसे काय समजु शकतात .....हा ररासारखा 'कूल' माणुस कुठुन आला माझ्या कुळात ???

खुद्द जमदग्नी !!

नाखु's picture

31 May 2012 - 1:54 pm | नाखु

हा विषय जाऊदे ळाला.....तुर्तास ईतकेच...

खादाड_बोका's picture

2 Jun 2012 - 1:12 am | खादाड_बोका

यु ब्लडी फुल्स.....यु विल नेवर थींक आउट ऑफ द "जात" बॉक्स ......ग्रो अप...

श्रावण मोडक's picture

2 Jun 2012 - 11:34 am | श्रावण मोडक

काय झालं? चार पुस्तकं काय सांगितली तर लगेच हे असं? ;-)

आगाऊ म्हादया......'s picture

6 Jun 2012 - 9:56 am | आगाऊ म्हादया......

सुन्दर जम्लिये!!!!!!!!!!!!

ऋषिकेश's picture

6 Jun 2012 - 4:55 pm | ऋषिकेश

अर्थ-संदेश म्हणून लै भारी!
कविता म्हणून ओके ओके..

ढब्बू पैसा's picture

6 Jun 2012 - 5:08 pm | ढब्बू पैसा

उद्वेगातून आलेली, फारच गद्य स्वरूपाची वाटली.
पण अर्थ मस्तच.
तुम्हीच तुमच्या लेखनातून अपेक्षा वाढवून ठेवल्यात त्याला काय करणार ;)

साती's picture

7 Jun 2012 - 11:22 am | साती

नोकरी म्हणजे सरकारीच हवी तर जात लिहिता येते.
खाजगी नोकरीत कुणी जात विचारत नाही.
मी सरकारी नोकरीतही कॅटेगरी ओपन ठेवली तर जातच्या कॉलमात काही लिहिलं नाही तरी चाललं. अर्थात जातीचे फायदे मिळणार नाही हे अध्याहृत होते.
अमच्या सरकारी हॉस्पितलात अ‍ॅडमिट करताना पेशंटची जात लिहिणे कंपल्सरी आहे. डेथ सर्टिफिकेटवर तसेच बर्थ सर्टिफिकेटवर जात लिहित नाहीत.
पोलिसांत मात्र काहिही आवेदन द्यायचे असेल तर जात विचारतात. आम्हाला पासपोर्टसाठी क्लिअरंस हवा होता तेव्हा विचारली. पण दोघांच्या जाती दोन ध्रुवावरच्या असल्याने पोलिसाने स्वतःच त्याबाबतचा उल्लेख गाळला. :)
मुलाच्या शाळेच्या अ‍ॅडमिशनला आम्हाला जात-धर्म कोरं सोडायचा ऑप्शन शाळेने दिला नाही.