आवरलेल्या मनातुन
सावरलेले क्शण आहेत
तुझ्यासाठीच राखुन ठेवलेले
काही गुलाबी पण आहेत
तुझ्याशिवाय दिवस साजरे करण्याची सवय
आता मला करुन घ्यायला हवी
कारण
रात्रींमध्ये तुझ्याच
आठवणींची स्पंदनं आहेत
फक्त मला
भिती वाटत राहते संध्याकाळ्ची
कारण या कातर वेळी तुझ्यावर
दुसर्याच कोणाची तरी राखण आहे
.
.
.
.
अनिरुद्ध
प्रतिक्रिया
25 May 2012 - 11:27 am | मिसळलेला काव्यप्रेमी
नीट कळली नाही...
अवांतरः क्ष लिहीण्यासाठी X चा वापर करावा.
25 May 2012 - 2:02 pm | स्वप्निल घायाळ
हे काय होत ? कविता कुठे आहे . :)
28 May 2012 - 9:10 am | बटाटा चिवडा
भटकंती विभाग मिपावर सर्वस्वी वेगळेपणाने दिलेला आहे, ह्याची सर्व कलाकारांनी कृपया नोंद घ्यावी.
28 May 2012 - 7:09 pm | चौकटराजा
एका धाग्यावर काहीजण म्हणतात अभिव्यक्तीला यमक , वृत यात गुंतवून पोस्टमार्टेम करू
नका कवितेचं अन इकडे अ शे ने मुक्तछंद वापरला तर कविता कूठे विचारायचं ? अजब न्याय आहे !
अनिरूद्ध , गो अहेड .मला आवडली बुवा ! कारण व्यक्त झालेले सरळ समजतेय !