रमतारामाची आरती

नाना चेंगट's picture
नाना चेंगट in जे न देखे रवी...
18 May 2012 - 12:37 pm

वडिलांची किर्ती गाऊ नये, धर्माच्या फुकाच्या गप्पा मारु नये, सारासार विचार करुन वागावे असा आम्हा रात्रंदिन उपदेश करणार्‍या रमतारामांचे आमच्यावर थोर उपकार आहेत.

आम्हास ज्ञान देणारा आम्हाला देवासमान असतो.
त्यामुळे रमताराम आमचे देव आहेत.
साहजिकच त्यांची आरती करणे अतिशय गरजेचे आहे.

आरतीनंतर प्रसाद मिळेल.
प्रसादासाठी कोणतीही गडबड करु नये.
देव रागवतो.
शिस्त ही आवश्यक आहे.

चला तर आरती करुया...

चला गाउया रमतारामाची आरती
चालवी जो आम्हा सत्यपथावरती
धरोनी बोट घेऊनीया कडेवरती
नौका करी पार भवसागरावरती |१

जय देव जय देव जय रमतामाऊली
होऊनी कृपावंत द्या आम्हास सावली || धृ

दाखविले आम्हा कवडसे प्रकाशांचे
आणिले भान सत्याच्या विविधतेचे
आम्ही बालक तुम्ही सागर ज्ञानाचे
तुमच्यासवे मिळे बळ जगण्याचे |२

जय देव जय देव जय रमतामाऊली
होऊनी कृपावंत द्या आम्हास सावली || धृ

जिएदेवाचे सादर करुनी उतारे
तळमळ केवळ नाही ते फटकारे
जळोत जिव्हा जे म्हणती पाखंडीरे
नाना म्हणे तुच धर्मरक्षक त्रातारे |३

जय देव जय देव जय रमतामाऊली
होऊनी कृपावंत द्या आम्हास सावली || धृ

फलश्रुती- ही आरती रोज म्हणणार्‍याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील.

आरतीविस्तार- ही आरती अजून विस्तारल्यास आमची हरकत नाही.

गधेगाळ- रमतारामदेवाच्या आरतीतील गणमात्रावृत्त यांच्या चूका काढणार्‍याच्या बेचाळीस पिढ्या नरकात जातील आणि त्याच्या...... असो.

बिभत्सप्रेमकाव्य

प्रतिक्रिया

प्यारे१'s picture

18 May 2012 - 2:19 pm | प्यारे१

हे एक लय झ्याक झालं.
ह्या आरतीच्या 'नावं बदलून विविध आवृत्त्या' काढायच्या.

रमतारामच्या जागी प्यारे (बोंबलायला आमची कशाला कोण आरती करतंय म्हणा पण तरीही ... बाकी प्यारेची नसली तरी जागोमोहनप्यारे (इन्ग्लिश)ची बनवायला हरकत नाही म्हणा! ;) )

लेखकुची ना ना नाही ना नाना?

अवांतरः तात्या अभ्यंकर आणि चपलांची आज फार आठवण येत आहे!
बाकी, स्वयंघोषित वकीलांना बर्‍याच दिवसांची थकीत फी मिळालेली दिसते. फारच 'उडत' आहेत....!

परिकथेतील राजकुमार's picture

18 May 2012 - 12:56 pm | परिकथेतील राजकुमार

नरेंद्र दाभोळकरांना मखरात बसवून शोडषोपचार चालल्यासारखे वाटले. ;)

कृपया ह्या आरतीचा मान श्री. योगप्रभु ह्यांना देण्यात यावा अशी मंडळाला विनंती आहे.

योगप्रभू's picture

18 May 2012 - 4:32 pm | योगप्रभू

<<कृपया ह्या आरतीचा मान श्री. योगप्रभु ह्यांना देण्यात यावा अशी मंडळाला विनंती आहे.>>

हलकट पर्‍या! तुझ्या ह्याला (जिभेला) काही हाड आहे की नाही? मी स्वतः एका श्रेष्ठ पंथाचा संस्थापक असताना मला त्या भोंदूरामाची आरती करायला सांगतोस? अरे माझं बघून (म्हणजे कॉपी करुन) मग स्वतःचा पंथ काढणारा तो इसम. त्याच्या आरत्या मी कशाला ओवाळू? पापी माणसा! तुझ्या दप्तरात पिवळी पुस्तके सापडोत. चौफुल्यावरुन तुला हाकलून देवोत. तुझ्या दुकानाच्या दारात पेन्शनरांचा अड्डा पडो.

याक्षणी मी 'सारासार' विचार करुन बोलत असल्याने फार वाईट शापवाणी उच्चारत नाही. माझ्या शिष्यगणांचाही आवरुन धरलाय (संताप). परवा एकदा काय लिफ्ट दिली त्या भोंदूरामानं, तर लागला लगेच त्याच्या कच्छपी.

-योगी पावन मनाचा-

परिकथेतील राजकुमार's picture

18 May 2012 - 4:47 pm | परिकथेतील राजकुमार

परवा एकदा काय लिफ्ट दिली त्या भोंदूरामानं, तर लागला लगेच त्याच्या कच्छपी.

अहो साक्षात श्रीकृष्ण 'रमगीता' सांगत सांगत सारथ्य करत आहेत आणि मी मागे बसून ती श्रवण करतो आहे असा हृद्य प्रसंग होता तो. तुम्ही कपाळकरंटे त्याला 'लिफ्ट' म्हणता ? अहो कुठे फेडाल ही पापे ? कमरेचे तर फेडून बसला आहातच म्हणा.

असो..

रमताराम's picture

18 May 2012 - 5:08 pm | रमताराम

साक्षात अर्जुनासम पर्‍याचे सारथ्य करण्याची संधी मला मिळाली याची त्या राधासुताला जळजळ झालेली दिसते. आपले अध्यात्मिक साम्राज्य वेगाने विस्तारताना पाहून आपल्या पंथाचे आता काय होणार या विचाराने पोटात गोळा आलेला दिसतो. घाबरू नका योगी. आम्ही काही क्रूसेड्स लढवायला येत नाही तुमच्याबरोबर. उत्तरध्रुवापासून ऑस्ट्रेलियापर्यंत हद्द आमची, त्याच्या खालची पृथ्वी तुमच्यासाठी सोडली आहे. तिकडे काय तुमच्या पंथाचा प्रसार करायचा तो करा.

तुझ्या दुकानाच्या दारात पेन्शनरांचा अड्डा पडो.
हा सॉल्लिड शाप आहे ब्वॉ. सौंदर्यफुफाट्याऐवजी नुसताच फुफाटा बघून परा जीवच देईल.... किंवा एखादा भोजपुरी सिनेमा पहायला जाईल.

योगप्रभू's picture

18 May 2012 - 7:33 pm | योगप्रभू

<<साक्षात अर्जुनासम पर्‍याचे सारथ्य करण्याची संधी मला मिळाली याची त्या राधासुताला जळजळ झालेली दिसते.>>

अरे मायावी असुरा! तू मला कितीही हीणवलंस तरी मीच कृष्ण आहे, हे जगाला माहीत आहे. मागे तू पौंड्रक नावाचा राजा होतास तेव्हाही अंगाला निळा रंग लावून आणि लाकडी हात बसवून, 'मीच विष्णू, मीच कृष्ण' असे जगाला सांगत फिरत होतास. तेव्हा आठवतंय ना सगळ्यांनी तुझी कशी निंदा केली ते.

उत्तरध्रुवापासून ऑस्ट्रेलियापर्यंत हद्द आमची, त्याच्या खालची पृथ्वी तुमच्यासाठी सोडली आहे. तिकडे काय तुमच्या पंथाचा प्रसार करायचा तो करा.

अरे असा क्षुद्र विचार केलास म्हणूनच तुझा पंथ वाढला नाही. मोठ्या माणसांना भुलवणं जमलं नाही म्हणून आता लहान मुलांना नादी लावतोस होय. मी काही हद्दी मानत नाही. हे विश्वचि माझे घर. पण तू म्हणतोस तर ठीक. तू म्हणतोस तिकडे 'वॉटर वर्ल्ड' निर्माण करतो आणि पंथ वाढवतो. तुला ते जमणार नाही कारण तुझा खालच्या प्रदेशाचा अभ्यास नाही. नुसती वरची पृथ्वी बघून पंथ वाढत नसतो.

तुझी आरती संपली असेल तर ताट फिरवायला लाग बघू.

रमताराम's picture

18 May 2012 - 7:47 pm | रमताराम

हे पार सूड घेतंय बघ आज.

बादवे कृष्ण आणि 'वासुदेव' यात गल्लत होते आहे ( संपूर्ण ज्ञान नाही नि हे म्हणे हे प्रेषित.)

तू म्हणतोस तिकडे 'वॉटर वर्ल्ड' निर्माण करतो आणि पंथ वाढवतो.
टैपिंग मिश्टेक झालीये. 'अंडर वर्ल्ड' असा शब्द आहे तो.

तुला ते जमणार नाही कारण तुझा खालच्या प्रदेशाचा अभ्यास नाही. नुसती वरची पृथ्वी बघून पंथ वाढत नसतो.
नाही. आम्ही 'खालच्या पातळीवर' कधी उतरलो नाही. आम्ही फक्त 'उच्च' गोष्टींचाच उच्च विचार करतो.

अवांतरः ताटात एक रुपया टाकून पन्नास पैसे उचलण्याचा आविर्भाव करत शंभर रूपये उचलणार्‍यांवर सीसीटीवी क्यामेर्‍यांची नजर आहे बरं का. नाही म्हणजे आपली माहिती असावी म्हणून सांगितलं, बाकी कै नै.

<<कृष्ण आणि 'वासुदेव' यात गल्लत होते आहे ( संपूर्ण ज्ञान नाही नि हे म्हणे हे प्रेषित.)>>

अरे ती सगळी माझीच नावे रे! संध्येतील चोवीस नावांमध्ये ही दोन्ही आहेत. तुला कशाला माझ्या ज्ञानाची उठाठेव? मी प्रेषित आहे त्यामुळे माझ्या शिष्यांना माझे वाक्य प्रमाण. तू तुझा पंथ वाढवायचा बघ.

वॉटर वर्ल्ड, की अंडरवर्ल्ड याच्याशी आम्हाला देणेघेणे नाही. तू आणि तुझ्या शिष्यांना 'अंडरवेअर वर्ल्ड'मध्येही प्रवेश नाही. हे का नाही सांगत?

<<आम्ही फक्त 'उच्च' गोष्टींचाच उच्च विचार करतो. >>
म्हणून तर तुम्हाला जग 'हुच्च' म्हणून ओळखते.

<<अवांतरः ताटात एक रुपया टाकून पन्नास पैसे उचलण्याचा आविर्भाव करत शंभर रूपये उचलणार्‍यांवर सीसीटीवी क्यामेर्‍यांची नजर आहे बरं का.>>
आता तुझ्या भक्तगणांना हापण इशारा द्यायची वेळ आली का? अरारा.. कसली लोकं जमवलीत पंथात कुणास ठाऊक?

योगप्रभू's picture

18 May 2012 - 7:15 pm | योगप्रभू

<<अहो साक्षात श्रीकृष्ण 'रमगीता' सांगत सांगत सारथ्य करत आहेत >>

..अरे तो बाळकराम आहे तो कुठून तुला रमगीता सांगणार? मी कॄष्ण आहे. माझ्याकडे ये वत्सा. तुला गीतेचे अंतरंग उलगडून दाखवतो. (स्वगत : अजाण लेकरु बिचारं. चुकून असुराच्या कळपात गेलं.) वत्सा! अरे त्या भोंदूचा रम, रमा, रमी यापैकी कशाशीही संबंध नाही. तस्मात त्याच्यात काही राम नाही. तुला माझ्याकडून रमगीता ऐकायची नसेल तर तुझ्या शिक्षणाची सोय करतो. सांप्रत चोलदेशात वास्तव्यास असलेले दैत्यगुरु सोकाचार्य मधून अधून आपल्या अश्मक देशातील आश्रमात येतात. ते तुला रमगीताच काय, पण सुरापुराण, आसवशास्त्र, मैरकेयोपनिषद, मिश्रणसंहिता अशा अनेक ग्रंथांचे ज्ञान देतील.

अहो कुठे फेडाल ही पापे ? कमरेचे तर फेडून बसला आहातच म्हणा.

... बघ त्या मायावी दैत्याच्या सहवासात राहिलं की विचार असे उलटेसुलटे होतात. मुला! अरे प्रथम कमरेचं फेडायचं असतं, मग पापं करायची असतात आणि मग ती फेडायची असतात. (आधी स्वर्गातून हकालपट्टी आणि नंतर सफरचंद खायचे, असा उलट क्रम नसतो रे सोनुल्या) अरे राजा मी कमरेचं फेडलं ते तुझी दया येऊन की रे. वाटलं की, कधी तरी तुलाही कमरेला काही झाकायला मिळावं. बारा महिने अठरा काळ तुझी ती दयनीय अवस्था नाही रे सहन झाली मला.

रमताराम's picture

18 May 2012 - 7:50 pm | रमताराम

टैम प्लीज. जरा घुसखोरी करतोय.

आधी स्वर्गातून हकालपट्टी आणि नंतर सफरचंद खायचे,
ओ उगाच 'तिकडचे इकडे' करू नका. आपल्याकडे सफरचंद नसते 'चरू' का कायतरी असते म्हणे.

अवांतरः मद्याचे नाव मैरेयक आहे मैरेकय नाही. (आणि हे म्हणे पर्‍याला दीक्षा देणार. हे राम.)

परिकथेतील राजकुमार's picture

19 May 2012 - 11:28 am | परिकथेतील राजकुमार

श्री. योगप्रभुगुर्जी,
श्री. ररा ह्यांच्या आश्रामाकडून अजून काय ऑफर येतात का ते बघतो नाहीतर मग तुमच्याकडे प्रवेश घेऊन मोकळा होतो.

अवांतर :- तुमच्या कपाळावरचा 'स्पार्टनद्वेष्टेपणाचा कलंक' पुसला गेला आहे का ?

<<तुमच्या कपाळावरचा 'स्पार्टनद्वेष्टेपणाचा कलंक' पुसला गेला आहे का ?>>

...द्वेष इतरांनी करावा. आमच्या पंथात केवळ प्रेम आणि स्नेहच. :)

नाना चेंगट's picture

19 May 2012 - 11:55 am | नाना चेंगट

कुणाबद्दल.. ?

योगप्रभू's picture

19 May 2012 - 12:13 pm | योगप्रभू

या विश्वातील सर्व प्राणिमात्रांबद्दल... :)

परिकथेतील राजकुमार's picture

19 May 2012 - 12:02 pm | परिकथेतील राजकुमार

द्वेष इतरांनी करावा. आमच्या पंथात केवळ प्रेम आणि स्नेहच.

प्रेम आणि स्नेह करण्यासाठी कोण कोण उपलब्ध आहे ते बघायला मिळेल काय ?

योगप्रभू's picture

19 May 2012 - 12:17 pm | योगप्रभू

<<प्रेम आणि स्नेह करण्यासाठी कोण कोण उपलब्ध आहे ते बघायला मिळेल काय ?>>
पर्‍या इकडे तिकडे बघायची गरज नाही. तुझी ती कामवाली (फोटो का बरे काढून टाकलास?) आमच्याच पंथाची अनुयायी आहे. तिला विचार इतरांचा तपशील. :)

परिकथेतील राजकुमार's picture

19 May 2012 - 12:21 pm | परिकथेतील राजकुमार

आमची कामवाली लै डिमांड मध्ये आली आहे आजकाल. तिचा फोटू परत लावण्यासाठी पार स्त्री सदस्यांकडून देखील आग्रह होत आहे.

श्रावण मोडक's picture

19 May 2012 - 1:07 pm | श्रावण मोडक

आमची कामवाली लै डिमांड मध्ये आली आहे आजकाल. तिचा फोटू परत लावण्यासाठी पार स्त्री सदस्यांकडून देखील आग्रह होत आहे.

इलाज नाही. काही जणींना तुमची खव आरसा वाटत असावी. ;-)

रमताराम's picture

18 May 2012 - 12:59 pm | रमताराम

बाजार उठवायला मी गावलो होय रे. आणि आपलं काय ठरलं आहे.... (पुढचा ड्वायलाक तुम्हाला ठाऊक आहेच.)

माऊली वगैरे म्हणू नकोस रे बाबा. काय शस्त्रक्रिया करून घेण्याच्या हक्कासाठी कोर्टात जाणारे ते तुम्हीच का अशा हलकट खरडी पराकडून येतील.

नाना चेंगट's picture

18 May 2012 - 1:04 pm | नाना चेंगट

माऊली वगैरे म्हणू नकोस रे बाबा. काय शस्त्रक्रिया करून घेण्याच्या हक्कासाठी कोर्टात जाणारे ते तुम्हीच का अशा हलकट खरडी पराकडून येतील.

अरेरे !! अहो जशी ज्ञानोबा माऊली तसेच तुम्ही माऊली !!

तुमच्या मनात असा अभद्र विचार आला तरी कसा माऊली?

शिव शिव...

प्रीत-मोहर's picture

18 May 2012 - 1:07 pm | प्रीत-मोहर

एलदुगो बघायला लागला की काय? ;)

नाना चेंगट's picture

18 May 2012 - 1:09 pm | नाना चेंगट

हे काय असतं?

परिकथेतील राजकुमार's picture

18 May 2012 - 1:34 pm | परिकथेतील राजकुमार

माऊली वगैरे म्हणू नकोस रे बाबा. काय शस्त्रक्रिया करून घेण्याच्या हक्कासाठी कोर्टात जाणारे ते तुम्हीच का अशा हलकट खरडी पराकडून येतील.

मी कशाला असे काय बोलेन ?

तुम्ही येवढे पॉवरफुल बाबा आहात म्हणल्यावर तुम्हाला हायकोडताच्या परवानगीची गरजच काय म्हणतो मी ?

नाना चेंगट's picture

18 May 2012 - 1:35 pm | नाना चेंगट

सहमत आहे

बाबा रमताराम की जै !!

प्रीत-मोहर's picture

18 May 2012 - 1:02 pm | प्रीत-मोहर

=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =))
=)) =))
=))

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 May 2012 - 1:22 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

दाखविले आम्हा कवडसे प्रकाशांचे
आणिले भान सत्याच्या विविधतेचे
आम्ही बालक तुम्ही सागर ज्ञानाचे
तुमच्यासवे मिळे बळ जगण्याचे |

ओळी आवडल्या. मला अर्थ लागला तो असा....

ज्ञानाचा सागर असणार्‍यांनी अंधारात जगणार्‍यांना कवडसे दाखवले नसते, सत्याचे भान दिले नसते तर हजारो लाखो माणसं अजूनही माणूसपणापासून वंचित राहीले असते. उन पडतंय, पाऊस पडतोय, ही सर्व देवाची कृपा म्हणून देवाला बोकड्या करावा लागला असता. पूर्वजन्मीचे भोग म्हणून गावकुसाबाहेरचं जगणं जगावं लागलं असतं. ज्ञानाच्या सागर असणार्‍यांनी समाजाच्या सर्वात शेवटच्या माणसाच्या गरजा काय ओळखून ज्या सुधारणा केल्या आज त्याला तोड नाही. म्हणून ''तुमच्यासवे मिळे बळ जगण्याचे '' ही ओळ रुढी परंपरेत गुरफटलेल्या माणसाच्या जीवनात एक आशादायी चित्र उभं करते. असो, या चार ओळीबद्दल खास आभार.....!

असंच म्हणायच आहे का कवीला ?

-दिलीप बिरुटे

पैसा's picture

18 May 2012 - 1:45 pm | पैसा

या रामाचं देऊळ कुठे आहे? मिपाची शनिदशा सुटावी म्हणून नवस करीन म्हणते! ;)
=)) =))

परिकथेतील राजकुमार's picture

18 May 2012 - 1:53 pm | परिकथेतील राजकुमार

या रामाचं देऊळ कुठे आहे? मिपाची शनिदशा सुटावी म्हणून नवस करीन म्हणते!

अदिती, घासुगुर्जी आणि निळ्या ह्या लोकांना काही दिवस बॅन करा. सगळ्या ग्रहदशा सुटतील.

आणि हो उगाच 'वैयक्तिक आकसाचा प्रतिसाद' वैग्रे आपले आपलेच ठरवून हा प्रतिसाद उडवण्याआधी, ह्या प्रतिसादात नमूद केलेल्या सदस्यांचे ह्या प्रतिसादा विषयीचे विचार जाणून घ्यावेत अशी खोडरबर संपादकांना विनंती.

Nile's picture

18 May 2012 - 8:35 pm | Nile

आमचं नाव त्या यादीतून काढा! आम्हाला तीनचार वेळा बॅन करूनही कोणाच्या ग्रहदशा सुटलेल्या नाहीत. याचा अर्थ एकच, बॅन केलं तरी आमचा प्रभाव* काही कमी होत नाही. **

*या प्रभावाला तुमच्यासारखे हलकट लोक डुप्लिकेट आयडी असं म्हणतात तो भाग निराळा.
** स्माईल्यांचा वापर जाणिवपूर्वक टाळण्यात आला आहे.

परिकथेतील राजकुमार's picture

19 May 2012 - 11:24 am | परिकथेतील राजकुमार

आमचं नाव त्या यादीतून काढा! आम्हाला तीनचार वेळा बॅन करूनही कोणाच्या ग्रहदशा सुटलेल्या नाहीत. याचा अर्थ एकच, बॅन केलं तरी आमचा प्रभाव* काही कमी होत नाही. **

आधी होम-हवन, मग ग्रह शांती, मग नारायण नागबली असे टप्प्याटप्प्याने जावे लागते निळ्या, तेंव्हा कुठे ग्रहदशा कमी होतात. चार वेळा बॅन म्हणजे तसे काही फारसे नाही. तुझा तर मेल्या आयपी बॅन करायला हवा आणि तुझ्या १९ डूआयडींची जाहिर यादी द्यायला हवी

*या प्रभावाला तुमच्यासारखे हलकट लोक डुप्लिकेट आयडी असं म्हणतात तो भाग निराळा.

हलकट का द्रष्टे ?

** स्माईल्यांचा वापर जाणिवपूर्वक टाळण्यात आला आहे.

धन्यवाद.
तुम्हाला हवाबंद डब्यात साबुदाणा खिचडी, मटार उसळ व शिकरण पाठवण्याची सोय केलेली आहे. एका छोट्याश्या पिशवीत रांगोळी आणि सव्वा रुपाया दक्षीणा देखील आहे. जेवणाआधी ताटाभोवती रांगोळी काढा, तुळशीपत्रा सोबत दक्षीणा ठेवून घ्या, थोडे रुम फ्रेशनर फवारा आणि भोजनाचा आस्वाद घ्या.

भारतात जन्माला येऊन देखील संस्कृतीकरंटेच राहणार रे तुम्ही !!

श्रावण मोडक's picture

18 May 2012 - 1:50 pm | श्रावण मोडक

बाबाबुवांना विरोध करणाऱ्यांचाही बाबाबुवा होतोच हे आम्हाला माहिती होतंच. ;-)

रमताराम's picture

18 May 2012 - 2:01 pm | रमताराम

अहो याचसाठी तर सारा अट्टाहास असतो, तुम्हाला तर ठाऊक आहेच. ;)
बाकी इतरत्रही हेच घडते बरं का, बुवाबाबांनाच काय दोष द्यायचा लेखकराव अशी इतरांची संभावना करणारेच लेखकराव होऊन बसतात, विठ्ठलाभोवतीच्या बडव्यांच्या नावाने शंख करून बाहेर पडलेले स्वत:चे बडवे जमा करतात, पार्श्यालिटीचा आरोप करणारे तीच पार्शालिटी आपल्याबाबत होत असेल तर आवर्जून तिचा फायदा घेतात, सं... नको तो विषय नको. ;)

नाना चेंगट's picture

18 May 2012 - 2:05 pm | नाना चेंगट

अहाहा ! अशी प्रगल्भ विचारसरणी असलेला मनुष्य अधिकाराच्याच जागेवर हवा !!!

भविष्यात आम्ही जर संकेतस्थळ काढले (चुकुन माकून) तर त्याचे पहिले संपादक तुम्हीच !!!

परिकथेतील राजकुमार's picture

18 May 2012 - 2:15 pm | परिकथेतील राजकुमार

अहाहा ! अशी प्रगल्भ विचारसरणी असलेला मनुष्य अधिकाराच्याच जागेवर हवा !!!

प्रगल्भ विचारसरणीवाल्यांना 'सल्लागार' म्हणून नेमतात ना ?

नाना चेंगट's picture

18 May 2012 - 2:17 pm | नाना चेंगट

वेगवेगळ्या संकेतस्थळांवर वेगवेगळी पद्धत असते.

श्रावण मोडक's picture

18 May 2012 - 5:10 pm | श्रावण मोडक

प्रगल्भ विचारसरणीवाल्यांना 'सल्लागार' म्हणून नेमतात ना ?

डब्बल गल्लत होते आहे का?

परिकथेतील राजकुमार's picture

18 May 2012 - 6:38 pm | परिकथेतील राजकुमार

डब्बल गल्लत होते आहे का?

गल्लत होऊ नये म्हणून तर उत्तराच्या अपेक्षेन प्रश्न विचारला आहे.

श्रावण मोडक's picture

18 May 2012 - 6:53 pm | श्रावण मोडक

ठळक शब्दांतून उत्तर दिले आहे. विचार करावा... ;-)

रमताराम's picture

18 May 2012 - 2:25 pm | रमताराम

भविष्यात आम्ही जर संकेतस्थळ काढले (चुकुन माकून) तर त्याचे पहिले संपादक तुम्हीच !!!
आम्ही आमच्या टीआरपीच्या धाग्यात म्हटलेच होते की प्रत्येक सदस्याच्या मनात असा विचार एकदा तरी येत असतोच. आता नानासारख्या म.सं. द्वेष्ट्याच्या मनात देखील जर हा विचार किमान एकदा येऊ शकतो तर इतरांच्या बाबत एकाहुन अधिक वेळा यायला हवा.

बाकी सं' लिहून थांबलो ते संरक्षण खात्याबद्दल लिहायचे होते. संवेदनशील विषय म्हणून थांबलो. उगाच भलता अर्थ का काढावा म्हणतो मी.

श्रावण मोडक's picture

18 May 2012 - 2:27 pm | श्रावण मोडक

भविष्यात आम्ही जर संकेतस्थळ काढले (चुकुन माकून) तर त्याचे पहिले संपादक तुम्हीच !!!

वृत्तपत्रीय विश्वात म्हणतात की, एखाद्याचा सूड घ्यायचा असेल तर तो खंगत गेला पाहिजे आणि त्यासाठी त्याला संपादक होण्याचा सल्ला द्यावा. इथं... असो! ;-)

सहज's picture

18 May 2012 - 2:45 pm | सहज

चला आता ररांचे मूर्तीभंजन करणार्‍या धाग्याची वाट बघणे आले!

कस्ला व्हिडीओ बिडीओ कोणी डकवला नाही म्हणजे मिळवले.

मागे संत तात्याबा महाराजांवर आरती आली होती मग तात्याबा परांगदाच झाले जणू, बघू ररांचे काय होतेय..असो मिपावर आरती केल्या गेल्याचा दुसरा मान मिळवणारे सदस्य म्हणुन नोंद केल्या गेली आहे.

रमताराम's picture

18 May 2012 - 2:47 pm | रमताराम

मेल्या अरे आता कुठे थोडे 'एक्स्पोजर' मिळते आहे तर लगेज 'एक्स्पोज' करण्याची भाषा? हे मीडियावाले सुखाने जगू देत नाहीत चार दिवस.

नाही म्हणजे तुमचा महिमा जाणून घ्यायचा, प्रचिती यायला हवी तर

मनाचे आणि शरीराचे पावित्र्य, मानलेल्या गुरुवरील, देवावरील एकनिष्ठता आणि श्रद्धा या गोष्टी असणार्‍या ल्कांना <बालकांना?? बालकांनाच असावे मन व शरिराचे पावित्र्य आजकाल फक्त बालकांमधेच असेल अशी किमान आशा, श्रद्धा ठेवीन म्हणतो.> याची प्रचिती येते.

ह्या पाककृतीतले घटक कुठून गोळा करायचे हा विचार करतोय....

परिकथेतील राजकुमार's picture

18 May 2012 - 3:01 pm | परिकथेतील राजकुमार

पण ह्या देवाला दारुचा नैवेद्य लागतो म्हणे ?

म्हणजे मग हळदी कुंकू आणि मंगळागौरीला हे दैवत पूजले जाणे अशक्यच !

सहज's picture

18 May 2012 - 3:10 pm | सहज

कालानुरुप मुक्त स्त्रियांमुळे हळदी कुंकू आणि मंगळागौरी नैवेद्यात बदल येउ शकतो.

परकीयांचे बटाटे, साबुदाणा इ कसे आपलेसे केले आपल्या पूर्वजांनी.. ररांची पुजा पुत्रप्राप्तीसाठी उत्तम अश्या आख्यायीका पसरवल्याकी बघ सगळे जमून जाईल.

सहज्सु

रमताराम's picture

18 May 2012 - 3:27 pm | रमताराम

हल्कत.

साती's picture

18 May 2012 - 3:09 pm | साती

आरती आवडली.

रमतारामांचा स्वतःचाच या आरतीला असलेला पाठिंबा बघून अनेक आधुनिक बापू,बाबांची आठवण झाली.
जरा या आरतीखाली प्रभावळयुक्त रमतारावांचा फोटो चिकटवा कुणीतरी.
आणि हि आरती म्हटल्यावर आम्हाला असेअसे अनुभव आले हे सांगणारा धागा काढा.

मी पहिला अनुभव लिहू का?
आजच सकाळपासून ४ वेळा ही आरती म्हटली. मागचे चार महिने गायब असलेले काजळमाया अचानक बुकशेल्फात सुखरूप आढळले.
:)

परिकथेतील राजकुमार's picture

18 May 2012 - 3:24 pm | परिकथेतील राजकुमार

ही आरती सुरु झाली ना, की आमचा रँबो देखील गर्दीत उभा राहून टाळ्या वाजवतो.

रमताराम's picture

18 May 2012 - 3:26 pm | रमताराम

आजच सकाळपासून ४ वेळा ही आरती म्हटली. मागचे चार महिने गायब असलेले काजळमाया अचानक बुकशेल्फात सुखरूप आढळले.
फक्त इकडून 'रसिक साहित्य'च्या बुकशेल्फमधून एक प्रत गायब झाली असा ओरडा होत आहे मगापासून पण कृपया तिकडे लक्ष देऊ नये. बाबांची लीला अगाध आहेच. :)
'काजळमाया'ची आठवण आली की हे बाबा सद्गदित वगैरे म्हणतात तसे होत असल्याने भक्ताची ही मागणी पुरी करणे क्रमप्राप्तच होते.

साती's picture

18 May 2012 - 3:50 pm | साती

are baapare, baba aahe ki bayangi bhoot ?
For more information on bayangi bhoot contact any good konkani bhoot expert.

श्रावण मोडक's picture

18 May 2012 - 4:05 pm | श्रावण मोडक

For more information on bayangi bhoot contact any good konkani bhoot expert.

साते, तूच सांग पाहू... :-)

मी-सौरभ's picture

18 May 2012 - 3:48 pm | मी-सौरभ

बाबा रमताराम यांच्या आश्रमाच्या नुतनीकरणाचे काम लवकरच सुरु होत आहे.
त्यासाठी सर्वांनी यथाशक्ती मदत करावी. मदत रोख स्वरुपात असावी (कमीतकमी ५०१ रुपये / डॉलर / पौंड / युरो / रिआल / अफ्रिकन डॉलर ई.).

(वि.सू. नूतनीकरण झाल्यावर सगळ्या देणगीदारांना पावती पाठवण्यात येइल. तवर पावती द्या पावती द्या करत पाठलाग करु नये.)

अधिक माहिती लवकरच ;)

बोला बाबा रमताराम की जय!!
बोला बाबा रमताराम की जय!!
बोला बाबा रमताराम की जय!!
बोला बाबा रमताराम की जय!!
बोला बाबा रमताराम की जय!!
बोला बाबा रमताराम की जय!!
बोला बाबा रमताराम की जय!!
बोला बाबा रमताराम की जय!!

रमताराम's picture

18 May 2012 - 4:23 pm | रमताराम

हे म्हणजे एखादा शिणुमा जर हिट झाला नव्या बालकलाकराचा की लगेच त्यांचे स्वयंघोषित एजंट्स फिरायला लागतात तसं झालं की. थांबा हो. हा बाबा पुणे-३० मधला आहे. तेव्हा:
'आमची कोठेही शाखा नाही. आमचे सोल, बूट, चप्पल इ. कोणतेही एजंट्स नेमलेले नाही. बाबांचा आश्रम दु. १ ते ४ बंद असतो. रविवार साप्ताहिक सुटी.' इ.इ. अटी लागू.

मी-सौरभ's picture

18 May 2012 - 5:21 pm | मी-सौरभ

देणगीतले ५०% तुम्हाला रॉयल्टी म्हणून देणार असं ठरलं होत ना आपलं????
तुम्हाला कुणीतरी ६० ची ऑफर दिलेली दिसत्ये...

मला आता तुमची पार्टी सोडून 'अंनिस' ला सामील व्हावे लागणार बहुतेक ;)

रमताराम's picture

18 May 2012 - 5:30 pm | रमताराम

आवो आसं नका करू. रातच्याला या वाड्यावं. काय ते शेटल करून टाकू.

ढब्बू पैसा's picture

18 May 2012 - 5:33 pm | ढब्बू पैसा

रातच्याला वाड्यावर शेटलमेंट!
बाबा येकदम ट्र्याकवर हाए. चालू द्या ;)

मृत्युन्जय's picture

18 May 2012 - 5:42 pm | मृत्युन्जय

अँ??? रातच्याला? वाड्यावर? सौरभला बोलावताय? शिव शिव शिव, आपलं ते राम राम राम. :)

श्रावण मोडक's picture

18 May 2012 - 5:47 pm | श्रावण मोडक

हाहाहा... चालायचंच मित्रा... बाबाच तो. चमत्कार असतात त्याचे. आता बघ, तो वाड्यावर बोलावतोय. वाड्यावर योगप्रभूही असतात. मग... असो... ;-)

रमताराम's picture

18 May 2012 - 6:02 pm | रमताराम

सकाळी पूजा अर्चा करणारे रात्रीच्या भेटीबाबत शिव शिव करतात म्हणजे त्यांच्या रात्रीच्या भेटी 'वेगळ्या' प्रकारच्या असाव्यात.
आमच्याकडे काव्यशास्त्रविनोदाची मैफल असते ब्वॉ. फार तर जोडीला तीर्थप्रसादाचा कार्यक्रम असतो. या एकदा वाड्यावर नि कपाळावरील आठी मोडून दिलखुलासपणे पाखंड्यांची मैफल अनुभवा जरा.

श्रावण मोडक's picture

18 May 2012 - 6:10 pm | श्रावण मोडक

कधी? पाखंड्याची वेळ सांगा. बाबाचा मुहूर्त नको. ;-)

मृत्युन्जय's picture

18 May 2012 - 6:34 pm | मृत्युन्जय

चकणा काय ठेवणार सांगा?

मी-सौरभ's picture

21 May 2012 - 1:48 pm | मी-सौरभ

नेहमी तेच तेच आयटम नस्तात काही चकना म्हणून...
तुमच्यासाठी शाकाहार आणि लिंबूपाणी पण ठेवतात आमचे गुरुजी ;)
बाकीच्या खास मंडळींसाठी तीर्थ प्रसाद अन भक्तीपर नृत्य असतं ;)

इरसाल's picture

18 May 2012 - 4:00 pm | इरसाल

आम्चे येथे रमताक्रुपेवरुन,
१.रमताप्राश
२.रमतादंतमंजन
३.रमता ब्रश
४.रमताआवळेपाक
५.रमता जोडदर्द निवारक औषध
६.रमता शंखपुष्पी
७.रमता म्हाक्याचे तेल
८.रमता कोंडानिवारक तेल
९.रमता जीवन प्राश (विशिष्ट वयोमानाच्या व्यक्तींनाच)
१०.रमता सुंदरी कल्प
११.रमता गंजीफ्रॉक
१२.रमता ट्रंक
१३.रमता साडी
१४.रमता ट्रयाकसुट
इ.इ.इ. मिळतील. (आश्रमाच्या भावात)
आमची कोठेही शाखा नाही

रमता जोडदर्द निवारक औषध
रमता जीवन प्राश (विशिष्ट वयोमानाच्या व्यक्तींनाच)

हे दोनच कामाचे रे. आणखी एक महत्त्वाचे उत्पादन
'रमता कवळीक्लीनर' ;)

मृत्युन्जय's picture

18 May 2012 - 4:26 pm | मृत्युन्जय

नशीब त्याने रमता व्हायग्रा किंवा रमता शिलाजीत नाही लिहिले :)

रमताराम's picture

18 May 2012 - 4:44 pm | रमताराम

आणखी एक

रमता ईनो. हा तर जळजळीवर अक्सीर इलाज. :)

परिकथेतील राजकुमार's picture

18 May 2012 - 4:49 pm | परिकथेतील राजकुमार

'रमताजोगी' ह्या नावाने एक 'हुक्का पार्लर' देखील भक्तजनांसाठी उघडावे.

रमताराम's picture

18 May 2012 - 5:06 pm | रमताराम

आता 'रम-ता-राम' नावाचा डान्सबारच राहिलाय. तो ही करा सुरू की पावन झाले बाबाचे नाव.

श्रावण मोडक's picture

18 May 2012 - 5:13 pm | श्रावण मोडक

साधू, साधू... :-)

इरसाल's picture

18 May 2012 - 4:55 pm | इरसाल

त्या गोष्टी फक्त आणी फक्त बाबांच्याच हातुन मिळतील.

विनायक प्रभू's picture

18 May 2012 - 4:09 pm | विनायक प्रभू

हे बाबा विभुती कुठुन काढणार?
म्हणजे हातातुन विभुती, तोंडातुन सोन्याची चेन अशा अर्थाने.

प्रकाश घाटपांडे's picture

18 May 2012 - 4:31 pm | प्रकाश घाटपांडे

आरती नंतर शास्त्रोक्त ( शक्य नसल्यास किमान शास्त्रापुरते तरी) 'तीर्थप्राशन' केल्यास अधिक पुण्य मिळते, मानसिक आरोग्य वाढते असा आमचा अनुभव आहे.

श्रावण मोडक's picture

18 May 2012 - 4:46 pm | श्रावण मोडक

आमचा अनुभव? तो अनुभव तुमचा नाही. ती त्या बाबाचीच कृपा आहे. ;-)

छोटा डॉन's picture

18 May 2012 - 5:50 pm | छोटा डॉन

नानासारखे समंजस आणि सुशिक्षित व्यक्तिमत्वही आता व्यक्तिपुजा आणि कर्माकांड यात गुतंलेले पाहुन मनास अनंत यातना झाला.
असो, त्याचा जो काही देव असेल तो त्याला मुक्ती देवो अशीच प्रार्थना करतो.

बाकी इतर बुवाबाजी आणि कर्मकांडावर आमचा विश्वास नाही.
बाकी रमताराम आमच्यातलेच असल्याने त्यांच्याबद्दल अधिक काय बोलणे ?

- छोटा डॉन

Nile's picture

19 May 2012 - 10:38 am | Nile

त्यातही, आजोबांचा बाबा झालेला (कोण रे तिकडे बाबा ला अबाबा करतोय??) पाहून जग उलटीकडे जातंय याची खात्रीच पटली!

भविष्यात याच आजोबांनी आमची लंगोटीईजेव्हा आम्ही पाळण्यात होतो तेव्हा हो!) धुतली आणि हे एक नंबरचे थोतांड आहे असे जरी आम्ही म्हणले तरी कोणी विश्वास ठेवणार नाही हे ही दिसत आहेच.

पैसा's picture

18 May 2012 - 6:00 pm | पैसा

p1

बाबाजी किरपा भेज दीजिये.

ही आरती आणि याच्या आवृत्त्या यांचे पुस्तक मी छापेन

माझे नाव - माधव सोकाजी ढापले

स्वानन्द's picture

18 May 2012 - 11:14 pm | स्वानन्द

रमताराम आणि योगप्रभू यातले कोण जास्त पावरफुल आहेत, यावर कोणी मार्गदर्शन करेल का?
रमताराम यांचे सोवळे कडक असते म्हणे... केवळ आरती म्हटल्याने मनोकामना पूर्ण होतील का?

नाना चेंगट's picture

19 May 2012 - 10:32 am | नाना चेंगट

>>>रमताराम यांचे सोवळे कडक असते म्हणे..

अहो कित्येक वर्षांत धुतलेले नाही म्हणून कडक झाले आहे. तशी अजूनही बरीच कारणे आहेत. सुज्ञांस सांगणे नलगे

तिमा's picture

20 May 2012 - 10:20 am | तिमा

वाचून ज्ञानात भर पडली.

बिपिन कार्यकर्ते's picture

20 May 2012 - 4:55 pm | बिपिन कार्यकर्ते

====))))))))))))))))))

एकदम वरिष्ठ!

sneharani's picture

21 May 2012 - 1:54 pm | sneharani

आरती अन् प्रतिसाद पाहून खपले!! बाबांचा डिमांड जास्तच वाढलेला दिसतोय या आरतीने!!! ;)
=)) =))

रमताराम's picture

21 May 2012 - 2:09 pm | रमताराम

थोडीशी गंमत होईलसे वाटले पण लोक लैच शिरेस झाले की. आरती झाली आता विसर्जनाला नेऊ नका म्हणजे मिळवली. :ghost:

सूर्यपुत्र's picture

21 May 2012 - 6:12 pm | सूर्यपुत्र

शिष्यत्व हवे.
कधी भरु टेंडर?

-सूर्यपुत्र.