(स्त्री मन)

नाना चेंगट's picture
नाना चेंगट in जे न देखे रवी...
17 May 2012 - 1:43 pm

प्रेरणा - http://misalpav.com/node/21683

वळवळण्याने तिच्या जाग आली मला,
जवळ घेऊन म्हणालो,' काय झाले बाई ग, इतके वळवळायला?'
शिरली अलगद केसात माझ्या, लागली कचकचून चावायला,
कळेचना मलाही कसे शांत करू मी हिला,
थापटून डोक्याशी थोपटले किंचीत इथे तिथे,
राहिचना, शेवटी मस्त खाजवून डोक्यावर, थोपटले जरा मानेवर,
जमेचना शांत करणे, तेंव्हा हाक मारून पत्नीला म्हणालो,
.
.
.
.
.
.'अग! डोक्यात उवा झाल्यात माझ्या, शिकेकाईने जरा घासून दे'..

शृंगारसंस्कृती

प्रतिक्रिया

बॅटमॅन's picture

17 May 2012 - 1:54 pm | बॅटमॅन

मस्त विडंबन !!

अमृत's picture

17 May 2012 - 1:59 pm | अमृत

:-)

अमृत

मुक्त विहारि's picture

17 May 2012 - 2:19 pm | मुक्त विहारि

कूरकूरण्याच्या मूळे त्रास झाला मला,
जवळ घेऊन म्हणालो,' काय झाले बाई ग, इतके कूरकूर करायला?'
अलगद घेतले मी तिला हातात,
उघडून बघू लागलो मी तिचे अंग न अंग.
द्रव पदार्थ तर होता व्यवस्थित.
तेंव्हा हाक मारून पत्नीला म्हणालो,
.
.
.
.
.
.'अग! नीबच तूटलय ह्या पेनाची,जरा नविन नीब आणायला पैसे दे'..

नाना....

बाकि तुमच्या डोक्यात उवा म्हणजे जरा जास्तच झाल नाही.