कविता करताना,
चंद्र असावाच लागतो,
कविमनाला कधी कधी
किनारा ही भावतो.
प्रेयसीच्या गालावर
खळी असावीच लागते
चालताना ही तिला हरिणीशी
स्पर्धा करावी लागते
कधी तिच्या अॅक्सेसरीज
येतात कवितेंच्या ओळीमध्ये
हास्य कवीला मात्र
सॅन्डल च मिळते झोळीमध्ये
जळजळीत कविंना मात्र
करावे लागते राजकारण
शिवी घालताना ही
दाखवावे लागते सरण
मुखी दाटते नव कवींच्या
विचांराचे जुगाड
शब्द सुचतात परी
ना आघाड ना पिछाड
वास्तव कवी परततो
हाती घेवुन चिटोरा
दम गेला परी
दात वाजे कराकरा
आजमितीला व्यक्त व्हा
चला करू काव्य
चारोळ्यांच्या रंगात
वाश्या तुझाच व्यत्यय........
प्रतिक्रिया
12 May 2012 - 6:17 pm | पैसा
=)) भयानक फलज्योतिष आवडलं.
12 May 2012 - 6:21 pm | यकु
चान चान :p :p :p
वृत्त गंडले आहे काय
शिवाय शेवटच्या कडव्यात यमक देखील कलंडले आहे ;-)
वासुनाक्यावर बसल्याबसल्या काव्य झालेले दिसते :p
12 May 2012 - 10:43 pm | हारुन शेख
यालाच पाकटवणे म्हणतात का ?
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
12 May 2012 - 9:52 pm | llपुण्याचे पेशवेll
उत्तम कविता.
उगा मी करून झोपतो हिमालयाची उशी पेक्षा ही कविता वृत्तात गंडली असेल तरी आशयात १०० मार्क.