आठवांची अंतरीची रांग आहे लांबडी

JAGOMOHANPYARE's picture
JAGOMOHANPYARE in जे न देखे रवी...
4 May 2012 - 4:06 pm

चूल आणि मूल सोडुन ती उडाली स्वामिनी
राघवामागून सीता लालुपाठी राबडी

जीवनाच्या रंगमंची खेळ रंगे रोजचा
तीसर्‍या अंकाअखेरी होइ काया नागडी

काव्य नाही सूर नाही गान आहे बेसुरे
ताल नाही भावते पण आज कोलावेरि डी

ढाळ आसू बोलतो तू भार होण्या मोकळा
आठवांची अंतरीची रांग आहे लांबडी

बाळ दे चाहूल पोटी स्वप्न नेत्री दाटले
गोजिर्‍या पोरीस आता गोजिरी गं टोपडी

शांतरसगझल

प्रतिक्रिया

पक पक पक's picture

4 May 2012 - 7:24 pm | पक पक पक

संदर्भ काय आहे..... :bigsmile:

पैसा's picture

4 May 2012 - 10:02 pm | पैसा

जामोप्या, ही हझल पण नाही. काहीच्या काही गझल दिसते आहे. बहुतेक राबडी, लांबडी आणि कोलावेरी डी एका कवितेत आणण्यासाठी शब्द जुळवलेले दिसतायत! :D

धन्या's picture

4 May 2012 - 11:21 pm | धन्या

जामोप्या, ही हझल पण नाही. काहीच्या काही गझल दिसते आहे. बहुतेक राबडी, लांबडी आणि कोलावेरी डी एका कवितेत आणण्यासाठी शब्द जुळवलेले दिसतायत!

कोंबडी, तंगडी, लंगडी, रांगडी असे शब्द वापरून अजून चार पाच कडवी* वाढवता आली असती. ;)

*आम्हाला गझल प्रकारातलं शष्प काही कळत नाही. त्यामुळे हा कविता आणि गाण्यांसाठी वापरात असलेला शब्द वापरला आहे.

मुक्त विहारि's picture

4 May 2012 - 10:29 pm | मुक्त विहारि

हा पण "पेशवाईत" गेला की काय?

"जागो" परत फिरा....