शोध
शोध तुझा घेत फिरत राहिले
जळी,स्थ्ळी आणि पाशाणी.
थकले,त्रासले,कोलमडले,
तरीहि भटकतच राहिले.
येउन एक दिवस तूच
कुजबुजलास
''कशाला एवढा त्रास?
नि कसला हा त्रागा!
तू म्हणजे मीच नाही का?''