आता कंटाळा आलाय....

झंम्प्या's picture
झंम्प्या in जे न देखे रवी...
9 Apr 2012 - 7:28 pm

आता कंटाळा आलाय मोठं होऊन जगण्याचा
उगाच मक्ख चेहऱ्याने जगभर वावरण्याचा

कधी वाटत आपलेही लाड कोणीतरी करावेत
अन भीती वाटल्यावर हळूच कुशीत घ्यावे

कधी दुडक्या चालीने रान भर हुंदडाव
तर कधी भर पावसात चिंब भिजावं

कधी कडक उन्हात बर्फाचे गोळे खावे
वाट दिसेल तिकडे वेड्या ओढीने पाळावे

कधी पोटात दुखतंय सांगून शाळेला बुट्टी मारावी
अन बाबांच्या भीतीपोटी आईशी सलगी करावी

कधी जेवताना चिऊ काउचे घास कोणी भरवावे
मग झोपताना काका दादाबरोबर घोडा घोडा खेळावे

नेहमीच आपल्याकडे सर्वांनी लक्ष द्यावं म्हणून काहीही करावं
अन मनासारखा नाही झाल तर फुगून बसावं

आता अपेक्षांचे ओझे वाहताना स्वतःला रोज्गाड्याला जुंपून बसलो
आरशात स्वतःला पाहताना आता पुरता अनोळखी भासलो

खरच कंटाळा आलाय आता मोठेपणाच कातडं पांघर्ण्याचा
मागे पडण्याच्या भीतीने शर्यतीत एकटच पळण्याचा

शांतरसकविता

प्रतिक्रिया

विजुभाऊ's picture

9 Apr 2012 - 7:30 pm | विजुभाऊ

आले रे आले झम्प्या दादा आले
आले रे आले झम्प्या दादा आले
आले रे आले झम्प्या दादा आले
आले रे आले झम्प्या दादा आले
आले रे आले झम्प्या दादा आले
आले रे आले झम्प्या दादा आले
आले रे आले झम्प्या दादा आले
आले रे आले झम्प्या दादा आले