ए सुमनांचे राणी

नरेंद्र गोळे's picture
नरेंद्र गोळे in जे न देखे रवी...
6 Apr 2012 - 9:59 am

ए सुमनांचे राणी, बहर स्वामिनी तू
तुझे स्मितहास्य, कहर जाहले
न मन शुद्धीवर अन्, नसे शुद्धीवर मी
कटाक्षांचे मिलन, कहर जाहले

तुझे ओठ की, पद्म कोमल गुलाबी
ह्या दो पाकळ्या, प्रेमकविता जणू की
त्या पाकळ्यांनी, तव स्नेहार्द्र गूज
मला ऐकविणे, कहर जाहले

कधी मुक्त मिलन, कधी संकोचणे ते
कधी चालतांना, बिथरणे, उसळणे
हे भुवयांची महिरप, चढवून उतरणे
उतरून चढविणे, कहर जाहले

ही थंडी हवेतील, वयातील ही रात्र
तुझ्या कुंतलांची, कृपा केवढी ही
ही प्रत्येक बट जणू, शत गंधकोशी
तुझे धुंद होणे, कहर जाहले

ह्या गाण्यातली बहार अनुभवलेल्यांना गीतकार ओळखता यावा नाही का!

शृंगारकलाकवितामौजमजा

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

6 Apr 2012 - 10:06 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मस्त जमलंय.......!

-दिलीप बिरुटे

मस्त कलंदर's picture

6 Apr 2012 - 10:16 am | मस्त कलंदर

गेल्या वेळचं गाणं पटकन ओळखता आलं नव्हतं.... पण हे शीर्षक वाचूनच ओळखलं.
खरंच गजब हो गया...

गणपा's picture

6 Apr 2012 - 2:27 pm | गणपा

असेच म्हणतो. :)

शुचि's picture

6 Apr 2012 - 10:48 pm | शुचि

अगदी अगदी

पैसा's picture

6 Apr 2012 - 10:50 am | पैसा

यावेळेला धागा उघडायच्या आधीच गाणं कळलं. पण रूपांतर झक्कास!

रुमानी's picture

6 Apr 2012 - 12:56 pm | रुमानी

छान !

प्रचेतस's picture

6 Apr 2012 - 1:14 pm | प्रचेतस

सुंदर अविष्कार.
मस्त जमलय.

अत्रुप्त आत्मा's picture

7 Apr 2012 - 12:32 am | अत्रुप्त आत्मा

:-)

बिरूटे सर, मस्त कलंदर, गणपा, शुचि, पैसा, श्रुचि, अतृप्त आत्मा आणि वल्ली,

सगळ्यांना प्रतिसादाखातर मनःपूर्वक धन्यवाद.

मात्र, गीत जरी सगळ्यांनीच ओळखले असले तरी कुणालाच गीतकार ओळखू आलेला दिसत नाही आहे.

गीतकार सांगायचा होता का?
तर घ्या.......ह्सरत जयपुरी! बरोबर का?

अरे वा! श्रुती, म्हणजे तुम्ही गीतकारही ओळखलाच होता म्हणा की!

रघु सावंत's picture

8 Apr 2012 - 1:42 pm | रघु सावंत

सायबा
छान शृंगार जमलाय