मागच्या भागात आपण "इरेझर " टूल आणि black न white इफेक्ट पहिला होता,
आज आपण "फोटोशोप फिल्टर" चे उपयोग पाहू
आता अशी कल्पना करू कि माझ्याकडे SLR कॅमेरा नाही , एक साधा डीजीकॅम आहे (खरही तसाच आहे ;) )
पण मला अस दाखवायचं आहे कि मी एका भन्नाट वेगाने जाणार्या कार ला माझ्या कॅमेरात त्या क्षणापुरत बंदिस्त केलंय..
करता येईल का?
हो येईल कि .. अगदी सोप्प आहे
हा माझा कार चा फोटो
त्याला फोटोशोप मध्ये घेऊन नेहमीप्रमाणे एक लेयर
नंतर टूलबार मध्ये --- filter -- blur -- motion blur
angel -३३
distance ७७
ओके .. आता हे असं दिसेल
चला काम झालेलं आहे ...
आता आपला लाडका खोडरबर :)
आपल्याला कार ला कॅमेरात पकडलय असं दाखवायचय.. ठीके.. हवा त्या भागावरून रबर फिरवा
किंवा कार सोडून बाकी दृशावरून रबर फिरवून असाही उलटा इफेक्ट देता येईल
final output :)
प्रतिक्रिया
2 Apr 2012 - 2:51 pm | निश
मन्या फेणे साहेब, मस्त
मी शिकलेल्या वेब डिझांयिंग ची आठवण झाली.
तेव्हा मला सुध्दा गाडिच चित्र घेउनच ब्लर फिल्टर करायला शिकवल होत.
तुम्हि मस्त शिकवता आहात.
2 Apr 2012 - 3:02 pm | स्मिता.
फार फार वर्षांपूर्वी, कधी एके काळी फोटोशॉप आणि फ्लॅशवर अगदीच फालतू किडे किले होते. तेव्हा हे धागे असते तर बरे फोटो बनवले असते ;)
मस्त सुरूवात झालीये... आणखी येवू दे.
2 Apr 2012 - 3:07 pm | सर्वसाक्षी
स्पाशेठ
उपक्रमाबद्दल धन्यवाद
जरा अधिक तपशिलवार द्या राव! म्हणजे आम्हा नवशिक्यांना समजेल असे आणि काय समजले नाही ते लक्षातही येइल. उदाहरणार्थ - खोड रबर वापरताना काय काळजी का घ्यावी? काय काळजी घ्यावी? खोड रबराची कार्यकक्षा कमी जास्त कशी करावी?
आपण जर अत्याधुनिक आवृत्तीचे फोटोशॉप वापरत असाल तर तीच क्रिया / परिणाम साधण्यासाठी जुन्या अवृत्तित कुठे शोधावे हेही सांगा. मागील प्रयोगात मला लेअर खिडकीच्या उजवीकडे आदेशावली सापडली नाही मात्र मी > इमेज > डिसॅच्युरेट > खोडरबर अशा रितीने तो परिणाम करत होतो.
आणखी एक विनंती. चमत्कार वा फेरफार शिकविण्याआधी मूलभूत गोष्टी शिकवाल तर बरे होईल म्हणजे लेव्हल्स, कर्वज ( आरजीबी/ सिंगल कलर), शॅडोज - हायलाईट्स वगिरे वगैरे.
आपला विद्यार्थी
साक्षी
2 Apr 2012 - 3:11 pm | स्पा
ओक्के पुढच्या भागात फक्त टूल्स ची ओळख पाहू :)
2 Apr 2012 - 7:07 pm | चौकटराजा
खोड रबर वापरताना काय काळजी का घ्यावी? काय काळजी घ्यावी? खोड रबराची कार्यकक्षा कमी जास्त कशी करावी?
खोडरबर हा ब्रशच आहे. त्याचा आकार ब्रशाप्रमाणे वाढविता येतो. त्याचा हार्डनेस कमी करण्यासाठी सोफ्ट ब्रशची निवड करावी.
फोटो शॉप मधे कशाचेही रूपांतर ब्रशात करता येते. व असा आपण खास आपला म्हणून तयार केलेला ब्रश खोडरबर म्हणून ब्रश इतकाच परिणाम
कारक रित्या वापरता येतो. ब्रश व खोडरबर मधे फरक असा की ब्रशाला रंग असतो. खोडरबरचे कामच मुळी पिक्सल्स गायब करणे असल्याने रंगाचा प्रश्नच येत नाही. बाकी टेकनिकली ब्रश व खोडरबर एकच आहे.
2 Apr 2012 - 3:17 pm | गवि
जबरी...
नुसतं मोशन ब्लर अॅप्लाय करण्याचं माहीत होतं पण लेयर्स करुन असला अफलातून इफेक्ट.. वा..
फेणेसर आपला गंडा बांधायचा आहे..
2 Apr 2012 - 3:27 pm | प्रास
व्वा मन्याभाऊ, छान शिकवताय की....
आम्हाला फोटोशॉप ऐकूनच माहिती आहे, कधी त्यात हात घातला नाही पण समजून घ्यायला आवडते आहे.
बाकी फायनल इन्पुट मधल्या पहिल्या फोटो मध्ये काचेपलिकडल्या भागामध्ये ब्लर्रिन्ग इफेक्ट केलेला नसल्यामुळे हा 'खास बनवलेला' किंवा 'खास दिलेला' इफेक्ट आहे हे कळून येतंय असं वाटलं. दुसरा इफेक्ट जास्त आवडला, ओरिगिनल वाटला. :-)
पुशिप्र (पुढील शिकवणीच्या प्रतिक्षेत)
2 Apr 2012 - 4:04 pm | गवि
आजच्या तुमच्या धड्यावर आमचा एक तातडीचा प्रयोग.. सफाईच्या नावाने बोंबच आहे.. पण जमवले काहीतरी...
2 Apr 2012 - 4:06 pm | स्पा
भारीच हो गवि
प्रगती चांगली आहे :)
2 Apr 2012 - 4:08 pm | प्रास
मन्याभाऊ, प्रगती नाव आहे का? ब्वॉर्र.....
2 Apr 2012 - 5:22 pm | वपाडाव
मस्त सुरु आहे की क्लास... चला आता फोटोशॉप शोधणे आले...
2 Apr 2012 - 5:34 pm | जोशी 'ले'
मस्त हो मास्तर फेणे ... :-) आता सगळं कसं बायजेवार येउ द्या.
2 Apr 2012 - 5:42 pm | मितभाषी
छान रे स्पावड्या. :)
आता तुझ्याकडे फोटो पाठवायची गरज नाही ;)
2 Apr 2012 - 6:15 pm | प्रचेतस
ट्टॉक.
लै भारी शिकीवताय हो गुर्जी.
2 Apr 2012 - 6:28 pm | अत्रुप्त आत्मा
किडे दाखवल्याबद्दल ;-) स्पांडुरंगबुवा मन्याळकरांचे धन्यवाद :-)
2 Apr 2012 - 6:54 pm | यकु
हा भाग पण भारी रे मन्या!
तुझ्यामुळे फोटोचे दुकान उघडावे लागणार.;-)
2 Apr 2012 - 6:57 pm | चौकटराजा
मोशन ब्लरचा मस्त उपयोग म्हणजे चित्रात पाउस पाडणे .
१. चित्रात एक लेयर वाढवा उदा. लेयर १
२. त्या लेयर वर स्प्रे ब्रशाने टिपके टिपके टिपके येतील असा लाईट ग्रे कल्रर चा स्प्रे मारा .
३. फिल्टर मधे जाऊन - नॉईज- अॅड नॉईज या प्रमाणे फिल्टर द्या .
४.आता फिल्टर-ब्लर-मोशन ब्लर असे जाऊन फिल्टर द्या( पावसाच्या धारा तिरक्या पडतात असा परिणाम हवा असल्यास मोशनची दिशा
तिरकी करा)
५.लेयर १ ची ओपॅसिटी कमी करा ( स्लाईडर वापरून )
६. आता चित्रात आपल्याला पाऊस पडताना दिसेल.
2 Apr 2012 - 8:47 pm | निवेदिता-ताई
करुन पाहीन ..जमतय का??
3 Apr 2012 - 2:05 am | सुनील
छान लेखमाला होईल!
परंतु, जे फोटोशॉपने करता येते ते जवळपास सगळेच GIMP वापरूनदेखिल करता येते. मग चकटफू GIMP सोडून ते महागडे फोटोशॉप घ्या कशाला?
व्यावसायिक कारणांकरीता असेल तर गोष्ट वेगळी कारण GIMP हे फोटोशॉपइतके युजरफ्रेंडली नाही.
पुलेशु
3 Apr 2012 - 5:14 am | चौकटराजा
@ सुनील . मी गेले १० वर्ष फोट्शॉपशी परिचित आहे पण मला हे GIMP माहित नव्हते. त्याबद्द्ल धन्यवाद !
3 Apr 2012 - 4:13 am | सुहास..
मस्त च रे कांबळे...आपल हे ....आपटे....आपल हे .....फेणे ...( लेका, नाव का बदलय रे ? स्पावड्या म्हणताना जरा बर वाटत होत. आय मीन जरा आपलेसे ...असो ...ज्याची त्याची मर्जी ;) )
3 Apr 2012 - 9:48 am | मदनबाण
वाचनखुण म्हणुन हा धागा साठवला आहे. :)
3 Apr 2012 - 9:29 pm | पैसा
फेणी, धडा कळला. प्रत्यक्ष प्रयोग केला नाही. केला की होमवर्क इथेच पेस्ट करीन. लवकर पुढचा धडा दे बघू!
4 Apr 2012 - 10:10 am | स्पा
:)
3 Apr 2012 - 11:48 pm | सुनील
फोटोशॉपचे ऑनलाइन शिक्षण घेणार्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक गृहपाठ -
हिरानंदानीची एक २२ मजली बिल्डींग घ्या. तीला फोटोशॉप (किंवा GIMP) वापरून १२२ मजली करा आणि तीला बुर्ज खलिफा असे नाव द्या.
हा गृहपाठ पुढील तास येण्यापूर्वी झाला पाहिजे! :)
7 Apr 2012 - 1:11 pm | मुक्त विहारि
अजुन येवु द्या...
8 Apr 2012 - 10:30 am | शैलेन्द्र
मन्या, तुला फोटोशॉपची शीडी द्यायला सांगीतली ते काम तु अजुन करतोयेस.. असे गुरु असल्यावर पोरांनी शिकायच कस रे?
13 Apr 2012 - 5:05 pm | प्रचेतस
पुढचा भाग कधी?
30 Apr 2012 - 4:03 pm | मितभाषी
पुढचा भाग कधी?
1 May 2012 - 12:41 am | अत्रुप्त आत्मा
+१
कधी..?
कधी..?
कधी..?
13 Apr 2012 - 6:55 pm | परिकथेतील राजकुमार
लक्ष आहे माझे.