व्युत्क्रमी परिकर्म

निनाद's picture
निनाद in जे न देखे रवी...
29 Mar 2012 - 7:48 am

व्युत्क्रमी परिकर्म
स्वयं-संतुलन कच्चीजप्ती शंकुचाचणी अवसीदन।
मिथ्या शस्त्रक्रिया स्व-विमोची रूपद बीजगुणन॥

दुय्यम उघाड दोलनलेखी मळसूत्रउत्परिवर्तन।
वालुकाश्मी भित्ति बीज चाचणी अपवाहचक्रन॥

वैतनिकपद व्युत्क्रमी परिकर्म सदापदावर्तन।
स्थूनांकन दोष अपवाह गुणांक वनसंशोधन॥

प्रतिवेदक अधिकारीसंचय वायु पुनर्मूल्यन।
लालसावर प्रारणप्रतिक्षेप परिपथ प्रत्यावर्तन॥

भयानकहास्यकरुणअद्भुतरसमुक्तक

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 Mar 2012 - 8:01 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शरदिनीच्या नव 'काव्य परंपरेत' भर घालणारी ही कविता आहे. आपली कविता आणि आपली प्रतिभा अतिउच्च दर्जाची आहे. आस्वादकाच्या बाबतीत एका वर्गशिक्षकाच्या काही मर्यादा आहेत, त्यामुळे कोणी जाणकार आस्वादकाने सदरील कवितेचे दर्जेदार रसग्रहण केले तर कवितेचा आस्वाद घेता येईल

असं म्हणतात की, मार्क्स, फ्रॉइड, रसेल आणि आइनस्टाइन यांनी माणसाच्या व्यक्तित्वाबद्दलच्या आणि वास्तवाबद्दलच्या कल्पनाच बदलवून टाकल्या. आणि मग कलावंतांपुढे प्रश्न पडला असेल की, व्यक्तित्त्व आणि वास्तव जर तर्काच्या, तर्कवाणीच्या जाणिवेच्या चिमटीत येत नसेल तर कलावंतांनी कोणतं माध्यम वापरावं ? कलावंतांनी अशा जाणिवांसाठी जी कोणती माध्यमं त्यासाठी वापरली असतील त्यात काळाने 'कविता' नावाच्या एका माध्यमाने एका मोठ्या विचारसमुहाला मोठी पायवाट करुन दिली असे मला वाटायला लागले आहे. (थोरामोठ्यांच्या विचारातून साभार)

-दिलीप बिरुटे

निनाद's picture

29 Mar 2012 - 8:19 am | निनाद

वत्सर भारद्वाज वाजश्रवा वेशपरायण
तेच मार्क्स, फ्रॉइड, रसेल आइनस्टाइन

व्यक्तित्व प्रतिष्टंभ वास्तव कलावंतवचन
तर्कवाणी माध्यम छद्मशंकुक नेत्रांजन

चिमटी सार्वजनिक वर्गशिक्षक पीठासीन
नियतविहित निर्धारित शल्यपूर्व निदान

;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 Mar 2012 - 8:26 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आज संस्कृतचा कोणता ग्रंथ वाचायला घेतलाय ?
आणि हे कोणतं वृत्त म्हणायचं ?

आता कटतोय.. महाविद्यालयातून येतांना एखादा शब्दकोश घेऊन यावा लागेल
कवितेचा वरीजनल आस्वाद घ्यायला. ;)

-दिलीप बिरुटे

निनाद's picture

29 Mar 2012 - 8:28 am | निनाद

वत्सर भारद्वाज वाजश्रवा वेशपरायण
हे प्रमुख १० ऋषींच्या मुलांपैकी नव्हेत का?
नव्या युगातले नवे ऋषी त्यासम....

पैसा's picture

29 Mar 2012 - 8:29 am | पैसा

कविता आणि रसग्रहणाचं कोणी तरी मराठीत भाषांतर करा रे!
:~

प्रचेतस's picture

29 Mar 2012 - 8:33 am | प्रचेतस

कॉलिंग गणेशा आणि चौकटराजा.

सहज's picture

29 Mar 2012 - 9:43 am | सहज

चाळण दूर्वा लोभसबाला रम्य
भंगुनी तोरा गोक्षुराक्ष आम्ल्य

निरलस अवघड भलतेच काव्य
अबलमी निरर्थक डुर्र शब्दगम्य

- शर्निनादिनी

दुर्बोध कवी पद रिक्त झाले आहे त्यावर वर्णी लावण्यासाठी खटाटोप दिसतोय :-)

२०११ पर्यंत तरी एक चांगला इसम होता. :-(

सुगम्य भाषांतराशिवाय परीक्षण देणेस असमर्थ आहोत. क्षमस्व !
(कोणी मदत करील का ? )

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

29 Mar 2012 - 11:15 am | मिसळलेला काव्यप्रेमी

काय बी कळना झालयं.. अवो जरा आमच्या भाषेत अरथ सांगा कि राव!!

कपिल काळे's picture

29 Mar 2012 - 12:22 pm | कपिल काळे

आम्ही शरदिनीला दिलेली आधुनिक ग्रेस्सांची उपमा, निनाद हिरावून घेण्याचा प्रयत्न करत आहे की काय अशी शंका वाटून गेली.

यकु's picture

29 Mar 2012 - 1:29 pm | यकु

______/\_____ !!!!
साष्‍टांग नमन !

निनाद's picture

30 Mar 2012 - 4:33 am | निनाद

सर्व वाचकांना धन्यवाद!
सरांचे खास आभार.

शर्निनादिनी ? भारीच!
सहजरावांची ष्टाईल आवडली.

कपिलराव, ग्रेस सारख्या कवीची उंची गाठण्याची आमची पात्रता नाही.
ट ला ट लावणारे यमके इतकीच काय ती लायकी!

परत एकदा वाचणार्‍या सार्‍या आस्वादकांचे मनापासून आभार!

सांजसंध्या's picture

30 Mar 2012 - 7:30 am | सांजसंध्या

मराठीत आहे का कविता ?

पैसा's picture

18 Dec 2013 - 9:09 am | पैसा

धूसरिका परत वाचली! परत काही कळ्ळं नै. पण आता ती धूसरिका आहे हे माहित असल्याने णो टेण्शन!

निनाद's picture

19 Dec 2013 - 9:04 am | निनाद

धूसरिका हे सह्ही नामकरण आहे.
काहीतरी धूसर धूसर कळल्यासारखं वाट्टं!
पण काय कळ्ळं ते समजत नाही...!
काय बरोबर णा? ;)

पैसा's picture

19 Dec 2013 - 10:49 am | पैसा

अगदी अगदी!

राजेश घासकडवी's picture

19 Dec 2013 - 12:56 pm | राजेश घासकडवी

बरेचसे अर्थ लागले, पण अवसीदन, अपवाह, स्थूनांकन हे शब्द सापडले नाहीत. यांचे अर्थ सांगाल का?

निनाद's picture

20 Dec 2013 - 3:56 am | निनाद

अवसीदन - माझ्या मते 'स्थिर करणे' किंवा 'एका जागेवर स्थापित ठेवणे', 'स्थापन करणे' अशा अर्थाने वापरला जातो.

अपवाह - पात्र भरून वाहू लागलेल्या प्रवाहास अपवाह म्हणतात. म्हणजे बादली भरून जाऊ लागल्यावर जो प्रवाह निर्माण होईल तो पाण्याचा अपवाह असेल. किंवा जमीन पूर्ण भिजल्यावर जे पाणी वाहू लागेल ते अपवाह असेल.

स्थूनांकन - काटेकोर मोजणी नसलेले. हिशोब करताना केलेले अंदाज आणि अचूक गणिती मूल्य यातील फरकास स्थूनांकन दोष म्हणतात. स्थूल फरक असेही म्हणता येईल.

एकजण शहरातला महाबळेश्वरला जातो .इकडे तिकडे धुक्यात मातीच्या वाटेवरून रानातून हिंडतो .ओला धुसर गारवा ,अधुनमधून कौलारू घरे ,पक्षांचे आवाज ,पायी लाल माती ,बाजारातील पोहे चहा आणि खमंग गरमागरम चणे : जातीवेद याची धुसरिका व्युत्क्रम .

एकजण शहरात जातो ,चकाचक इमारती ,भपकेदार रखवालदार,काटकोनात मोठे रस्ते ,टकाटक पब्लिक ,भरधाव मोटारी आणि वाजणारे भोंगे सगळे स्पष्ट तरीही धुसर या व्युत्क्रमी परीकर्म कवितेसारखे .