सुरेश भटांची क्षमा मागून त्यांच्या 'चांदण्यात फिरताना' ह्या अप्रतीम गीताचे एक वास्तववादी / का विसंवादी स्वैर विडंबन)
हाथरुणात शिरताना डसला मज डास
घरा नाही रॅकेटही सॉकेटही ठेचण्यास
साचलेल्या डबक्यातून आला तो एकटाच
दूर थवे (ईतर) मच्छरांचे आले मागे कधीच
वेळ माझी निजायची पण सारे जाणतात
सांग मेल्या तुझ्या संग कशी पुरी करू निज
तुज चाले ओडोमस अन भावे ऑलाउट
श्वास तुझा गुणगुण डंख तुझा लालेलाल
चु भू द्या घ्या
प्रतिक्रिया
27 Mar 2012 - 5:11 pm | परिकथेतील राजकुमार
शपथ सांगतो हो तुम्हाला, तो 'हाथरुणात' शब्द असा काळजात अगदी मलमली रुतला बघा.
अंथरुणाला लग्न न झालेले लोक हाथरुण म्हणतात म्हणे.
27 Mar 2012 - 5:23 pm | मी-सौरभ
स. प.रा. च्या प्रतिसादाला सुपेर लाईक्क करण्यात आले आहे ;)
27 Mar 2012 - 6:37 pm | चौकटराजा
श्री मुखदुर्बळ यांसी
आपल्या विलक्षण मोकळेपणा बद्द्ल व नम्रतेबद्द्ल खरोखरच लाख धन्यवाद !
काही चूक नाही काही भूल नाही
पुलेशु
27 Mar 2012 - 6:53 pm | विनायक प्रभू
हातांचे कर्ज