मी वळूनी हासले - चुकले जरासे

सांजसंध्या's picture
सांजसंध्या in जे न देखे रवी...
27 Mar 2012 - 12:14 pm

मी वळूनी हासले - चुकले जरासे

प्रश्न त्याचे टाळले, चुकले जरासे
उत्तराशी थांबले, चुकले जरासे

शीळ त्याची ओळखीची रानभूली
मी वळूनी हासले - चुकले जरासे

पाळले ना भान तू मज छेडतांना
लाजले मी लाजले, चुकले जरासे

भावनांना बांधले त्या, धुंद राती
आज का सैलावले चुकले जरासे

बंद होते द्वार माझे तव सुरांना
का कशी नादावले - चुकले जरासे

रोखले मी आसवांच्या आठवांना
शेवटी रागावले - चुकले जरासे

सोडतांना गांव जे मन घट्ट केले
त्या तिथे रेंगाळले चुकले जरासे

सांजछाया दाटल्या या अंगणाशी
मी पुन्हा भांबावले, चुकले जरासे

संध्या
२६.११.२०१०

रद्दीफ : एक शेर कुणीतरी एसेमेस केला होता. त्यातला चुकलो का ... असा काहीसा रद्दीफ थोडा बदलून घेतलाय.

शृंगारकरुणशांतरसगझल

प्रतिक्रिया

चौकटराजा's picture

27 Mar 2012 - 12:58 pm | चौकटराजा

माझेच गाणे ऐकविले तव स्वरानी
मी तुवा उगाच छळले - चुकले जरासे

किंचित कवि -
चौकट राजा

फक्त इतकंच???
रसग्रहण नाही का या वेळी?

चौकटराजा's picture

27 Mar 2012 - 1:43 pm | चौकटराजा

वल्ली हा आय डी हॅक केल्यावर परत चालू करू ! तुझ्या गावात त्याचा क्लास आहे कारे ?

प्रचेतस's picture

27 Mar 2012 - 1:49 pm | प्रचेतस

आपलं गाव एकच आहे हो. ;)

तसाही मला आयडी बदलायचा आहेच.

चौकटराजा's picture

27 Mar 2012 - 1:50 pm | चौकटराजा

मस्त ! वा! होते हवे म्हणणेच माझे
रस्ग्रन करू गेलो , चुकलेच माझे

चौकटराजा's picture

27 Mar 2012 - 1:53 pm | चौकटराजा

मस्त ! वा! होते हवे म्हणणेच माझे
रस्ग्रन करू गेलो , चुकले जरासे
आता कशाला टाकायचे ते उसासे
वल्ली पर्याच्या जालातआता फसलो जरासे

पैसा's picture

27 Mar 2012 - 3:10 pm | पैसा

पर्या याचा अर्थ जरासा वेगळा होतो साहेब!

चौकटराजा's picture

27 Mar 2012 - 6:20 pm | चौकटराजा

वल्ली पर्‍या यकू इइइइइइइइइइइइ .

चौकटराजा's picture

27 Mar 2012 - 6:20 pm | चौकटराजा

वल्ली पर्‍या यकू इइइइइइइइइइइइ .

गझल मस्तच.
पण ही जरा गाऊन दाखवली तर प्रचंड सुंदर होईल.
तुम्हाला गाता येतं का?
स्पावड्या गातो का रे?

शैलेन्द्र's picture

27 Mar 2012 - 1:14 pm | शैलेन्द्र

स्पावडा? ते बेनं गात का? बोलल नाही कधी.. बाकी गायला थोडी हवा ठेवावी लागते, ती कुठे ठेवत असेल कोण जाणे..

गातो म्हणजे काय.. चांगला ढसाढसा गातो.. ;-)

गातो म्हणजे काय.. चांगला ढसाढसा गातो.

___/\___

मी-सौरभ's picture

27 Mar 2012 - 3:56 pm | मी-सौरभ

तो ढसाढसा गातो तेव्हा तुम्ही ते बदाबदा ऐकता असे म्हणतात.
खरेखोटे तो 'आकाशातला बाप'च जाणे ;)

सांजसंध्या's picture

28 Mar 2012 - 1:14 pm | सांजसंध्या

बापरे.. गाणं

यकु's picture

27 Mar 2012 - 1:01 pm | यकु

प्रकाटाआ

प्रचेतस's picture

27 Mar 2012 - 1:11 pm | प्रचेतस

सुंदर कविता.

परिकथेतील राजकुमार's picture

27 Mar 2012 - 1:14 pm | परिकथेतील राजकुमार

गझल / कविता जे काही आहे ते आवडले.

ह्या पद्यरचनेची ह्यावेळी कोणी चिरफाड केली नाही हे अजून आवडले.

अत्रुप्त आत्मा's picture

27 Mar 2012 - 1:23 pm | अत्रुप्त आत्मा

रचना झ्याक जमली आहे... :-)

तुम्हाला विडम्बनाला पण झ्याक माल मिळाला असंल!! ;)

अत्रुप्त आत्मा's picture

27 Mar 2012 - 1:52 pm | अत्रुप्त आत्मा

@तुम्हाला विडम्बनाला पण झ्याक माल मिळाला असंल!! >>>तुमच्या म्हणण्याप्रमाणे ही कविता म्हणजे झ्याक माल असता,तर मग प्रतिक्रीया आलीच नसती,डायरेक्ट विडंबन आलं असतं...

-------------------------------------------------
भागो मोह- न -मारे ;-)

प्रचेतस's picture

27 Mar 2012 - 1:53 pm | प्रचेतस

रचना झ्याक जमली आहे... Smile

आणि हे दुसरे विधान

तुमच्या म्हणण्याप्रमाणे ही कविता म्हणजे झ्याक माल असता,तर मग प्रतिक्रीया आलीच नसती,

किती विसंगत विधाने करता हो भटजी तुम्ही.

अत्रुप्त आत्मा's picture

27 Mar 2012 - 2:05 pm | अत्रुप्त आत्मा

@किती विसंगत विधाने करता हो भटजी तुम्ही...? >>> :shock:

यात विसंगती काय आहे...? प्रथम मी कविता व तीची रचना झ्याक-म्हणजे चांगली जमल्याचे म्हटले आहे...आणी एकदा जर का चांगली झाली आहे,तर तीचे विडंबन घडावे असे कहिही त्यात कच्चे राहिलेले नाही... हे पुन्हा स्पष्ट करणे विसंगत नसुन,कमालीचे सुसंगत आहे...

असो... हे सहज कळणारे असल्यानी,इतके स्पष्टीकरण देऊन मी थांबतो... :-)

प्रचेतस's picture

27 Mar 2012 - 2:10 pm | प्रचेतस

पळा पळा...
आत्मा संतापलेला दिसतोय. :P

मी-सौरभ's picture

27 Mar 2012 - 3:59 pm | मी-सौरभ

पळा पळा...

आमी नायी तुच पळ आणि जरा हळु; रस्ता नविन आहे तसा तो राहिला पाहीजे.

मी आत्म्याला विडंबन करावयास सांगितले, चुकले जरासे!! ;)

मस्त .. अप्रतिम ..

भावनांना बांधले त्या, धुंद राती
आज का सैलावले चुकले जरासे

सोडतांना गांव जे मन घट्ट केले
त्या तिथे रेंगाळले चुकले जरासे

सांजछाया दाटल्या या अंगणाशी
मी पुन्हा भांबावले, चुकले जरासे

विशेष आवडले..

जयवी's picture

27 Mar 2012 - 5:44 pm | जयवी

सुरेख !!

सांजसंध्या's picture

28 Mar 2012 - 5:27 am | सांजसंध्या

सर्वांचे मनःपूर्वक आभार :)

सांजसंध्या's picture

31 Mar 2012 - 11:19 am | सांजसंध्या

गाणं मला येत नाही. चाल कळावी म्हणून फक्त..

निनाद's picture

31 Mar 2012 - 12:42 pm | निनाद

सोडतांना गांव जे मन घट्ट केले
त्या तिथे रेंगाळले चुकले जरासे

सांजछाया दाटल्या या अंगणाशी
मी पुन्हा भांबावले, चुकले जरासे

हे फार आवडले...
मन कुठे तरी रेंगाळतेच. या शब्दात ही रेंगाळावेसे वाटते.
आयुष्याच्या निरनिराळ्या प्रदेशांना घेऊन जाणारी ही कविता आवडली.
चाल लाऊन ऐकायला आवडेल कृपया तूनळीवर टाकावी हे विनंती.
(वर दिलेल्या दुव्यावर जायला माझा म्याकफी नाही म्हण्तो.)

एक एकटा एकटाच's picture

9 Mar 2015 - 11:06 pm | एक एकटा एकटाच

सांजसंध्या
नेहमीप्रमाणेच Superb

विशाल कुलकर्णी's picture

12 Mar 2015 - 9:48 am | विशाल कुलकर्णी

वाह .. मस्तच !