क्रुसावरिल माणिक

ajay wankhede's picture
ajay wankhede in जे न देखे रवी...
27 Mar 2012 - 10:11 am

तू आलास ,थांबलास,
आणि मनाला चटका लाऊन गेलास.
शब्दांना शब्दांच्याच माळेत
गुंफलेस तु
लय, ताल, माधुर्य सार्‍यांनाच
थंड निखार्‍यावर जाळलेस तु
चालावयास पायवाट होति
या नागफणिच्या वनात
हळुवार कोरलीस
आपलीच पायवाट तू
पाणी विद्रोहाचे पिऊनि,
उतरलास सागरात या
झेलणारा मंथने हजारो
तु एकटाच देवमासा
मज नाहि आज दु:ख
क्रुसावरिल 'माणिका'
होशिल भाग तु या
मैत्रेय जातकाचा.

...................................................................................................................
कविवर्य 'ग्रेस' यांना विनम्र अभिवादन

शांतरसकविता

प्रतिक्रिया

सांजसंध्या's picture

27 Mar 2012 - 10:38 am | सांजसंध्या

श्रद्धांजली

इथे देखील काव्यांजली वाहिली आहे. मिपाच्या वाचकांसाठी..
http://www.maayboli.com/node/33768

गणेशा's picture

27 Mar 2012 - 1:40 pm | गणेशा

छान कविता ...

आवडली.

मूकवाचक's picture

27 Mar 2012 - 1:57 pm | मूकवाचक

+१

पैसा's picture

27 Mar 2012 - 2:03 pm | पैसा

छान कविता.

चौकटराजा's picture

27 Mar 2012 - 8:01 pm | चौकटराजा

अजयराव ,
फारच बोलकी नेमकी .परत लिहिण्यात सहजता !
ग्रेस जी यांचं व्यक्तिमत्व व कर्तृत्व याचा पुरता आलेख १८ ओळीत ! कुर्बान. त्याना अढळपद आहेच मित्रा !
पुलेशू

पांथस्थ's picture

29 Mar 2012 - 3:30 pm | पांथस्थ

मस्तच.