सांजवात..

सांजसंध्या's picture
सांजसंध्या in जे न देखे रवी...
23 Mar 2012 - 8:18 pm

सांजवात..

शीळ तुझी
दरीतली
खूण तुझी
सरीतली..

ओढ तुझी
अंतरात
रोज मुकी
चांदरात..

ओल तुझी
काळजात
बोल तिचे
आसवात

साद तुझी
वादळात
याद तुझी
काजळात

आजही तू
आठवात
तेवते मी
सांजवात..

- संध्या

शृंगारकरुणकविता

प्रतिक्रिया

सांजसंध्या's picture

23 Mar 2012 - 8:22 pm | सांजसंध्या

तुझे असे
झणी येणे
तुझे असे
झणी जाणे

खेळ तुझा
गुण गुणा
वेड लावी
माझ्या मना..

थांब जरा
दोन क्षण
खोल ना रे
तुझे मन

वाट पाहे
कधीची रे
पुन्हा तुझ्या
वाटेची रे

तुझे येणे
हवे मना
तुझे जाणे
साहवेना..

- संध्या

अत्रुप्त आत्मा's picture

31 Mar 2012 - 9:46 pm | अत्रुप्त आत्मा

व्वा...! १+१ एकास एक कविता अवडली... :-)

पैसा's picture

23 Mar 2012 - 8:26 pm | पैसा

दोन्ही छान रचना!

यकु's picture

23 Mar 2012 - 8:46 pm | यकु

कातील !
आवडली.

जाई.'s picture

23 Mar 2012 - 9:48 pm | जाई.

कविता आवडली

अमृत's picture

23 Mar 2012 - 9:54 pm | अमृत

तुमची कविता
मनभावन

अमृत

कविता आवडली.

शेवटच्या कडव्यात फसलीय का?
आठवात म्हणजे आठवणीमध्येच ना? मग शब्दप्रयोग ओढून ताणून केल्यासारखा वाटतो.

--
किल्वरएक्का

चौकटराजा's picture

24 Mar 2012 - 8:44 am | चौकटराजा

आता यानंतर "वल्ली" ही आय डी दुसर्‍याच एका खडूसाने घेतली आहे. वल्ल्ली यानी आग्यावेताळ अशी काहीतरी आयडी घेतल्याचे कळते.

सांजसंध्या's picture

24 Mar 2012 - 9:10 am | सांजसंध्या

आठवात म्हणजे आठवणीमध्येच ना.

हो. त्याच अर्थी. यमकारी शब्दकळा

सांजसंध्या's picture

24 Mar 2012 - 6:48 am | सांजसंध्या

प्रतिसादकांचे आभार...

जयवी's picture

24 Mar 2012 - 1:14 pm | जयवी

सुरेख....... आवडलीच :)

अविनाशकुलकर्णी's picture

24 Mar 2012 - 1:26 pm | अविनाशकुलकर्णी

मस्त मस्त

सांजसंध्या's picture

24 Mar 2012 - 2:09 pm | सांजसंध्या

अविकाका, जयवी... थँक्स !

चौराकाका
वल्लींचा प्रतिसाद नेहमी नेमका आणि प्रामाणिक असतो. तसाच आताही आहे. चुका दाखवल्या तर त्यात फायदा माझाच आहे...

चौकटराजा's picture

24 Mar 2012 - 2:25 pm | चौकटराजा

मी जिंकलो मी हरलो .
रसग्रन या प्रकाराचा वसा वल्लीने घेत्ला व तो कुनीतरी मान्ये क्येला याबद्द्द्ल मी वल्लीचे व करनार्‍यांचे आबार मान्तो.
च्चो रा .

सांजसंध्या's picture

24 Mar 2012 - 3:26 pm | सांजसंध्या

चौराकाका

_____________/\_____________

रुमानी's picture

26 Mar 2012 - 10:42 am | रुमानी

दोन्ही कविता छान ! आवडली.

गणेशा's picture

26 Mar 2012 - 5:03 pm | गणेशा

मस्तच ..

लिहित रहा... वाचत आहे...

निनाद's picture

31 Mar 2012 - 2:28 pm | निनाद

एक-द्वि शब्दी
कविता आवडली.

प्रास's picture

31 Mar 2012 - 3:11 pm | प्रास

मी काही फार मोठा काव्य रसिक नाही पण कोणतंही साहित्य वाचायला आवडणारा एक साहित्य प्रेमी जरूर आहे. फारसा काव्याच्या वाटेला जात नाही पण तुमच्या कविता हीच तुमची ओळख असल्याने तुमची आं. जालिय ओळख व्हावी या हेतूने कविता वाचली. शैली आवडली. पण

साद तुझी
वादळात
याद तुझी
काजळात

हा अधोरेखित शब्द काही कळला नाही. इथे काजळ काय करायचंय? मला वाट्टं 'काळजात' हा शब्द योग्य व्हावा. कदाचित 'कातळात' हा शब्दही योग्य होऊ शकेल. माहित नाही. मी कवी नाही.

आपल्याच कवितेला आपणच दुसर्‍या कवितेचा प्रतिसाद देणं काही कळलं नाही, हा मिपावर काहीसा नवाच प्रकार वाटला. असो.

दुसर्‍या कवितेमध्येही -

वाट पाहे
कधीची रे
पुन्हा तुझ्या
वाटेची रे

इथेही अधोरेखित शब्द खटकला. वाट कुठे जात नाही, येत नाही, ती त्याच जागी असते. तेव्हा दुसरी ओळ, पुन्हा तुझ्या येण्याची रे अशी असती तर शेवटच्या कडव्याशी सुसंगत वाटली असती.

हे आपले माझे मत.

कवयित्रीला तिचं मत बदलण्याचा आग्रह अजिबात नाही.

धन्यवाद!

सांजसंध्या's picture

31 Mar 2012 - 3:57 pm | सांजसंध्या

डोळ्यातून ओघळणारा थेंब काजळात थांबून राहतो या अर्थाने..

धन्यवाद प्रास.

प्रास's picture

31 Mar 2012 - 4:11 pm | प्रास

याद --> अश्रू --> डोळा --> काजळ --> अडकणं

फार लांबचा विचार आहे हो.... ('बडी दूर की सोचते हो'च्या चालीवर ;-))

धन्यवाद.

एक एकटा एकटाच's picture

13 Mar 2015 - 9:04 pm | एक एकटा एकटाच

आवडली
नेहमीसारखीच कडक!!!!!!!!

पॉइंट ब्लँक's picture

13 Mar 2015 - 9:33 pm | पॉइंट ब्लँक

प्रत्येक ओळीत दोनपेक्षा जास्त शब्द न वापरता यमक जुळवणे कसे काय जमले.

ज्योति अळवणी's picture

14 Mar 2015 - 12:49 am | ज्योति अळवणी

खूपच सुंदर कविता. नेमक्या शब्दात आपण भावना व्यक्त केल्या आहात. खूप आवडली