(रे मना ..)

गणेशा's picture
गणेशा in जे न देखे रवी...
20 Mar 2012 - 7:43 pm

मुळ गझल : http://www.misalpav.com/node/21076 - सांजसंध्या
त्यावरुन पॉझिटीव्ह कविता :

रे मना नभ पुन्हा उजळून आले
शब्द भावनांची माळ माळून आले.

आस रात्रीस, ह्या चांदण्या नभाची
मेघ तेंव्हा मिठीत न्हावून आले

हे श्वास होते भारलेले कधीचे
क्षण तुझ्यासवे आज दरवळून आले

देहात रुजलेली जाणीव मिलनाची
तव स्वप्न मनी आज फुलून आले

जीवनाचे डाव कित्येक खेळले मी
तुझेच प्रितवार आज झेलून आले.

--- शब्दमेघ

शृंगारकवितामौजमजा

प्रतिक्रिया

पैसा's picture

20 Mar 2012 - 7:45 pm | पैसा

स्वतंत्र कविता म्हणून आवडली. पण संध्याने वापरलेलं वृत्त मुद्दाम वापरलंस नाही की काय कारण?

धन्या's picture

20 Mar 2012 - 8:02 pm | धन्या

ते वृत्तामधलं आपल्याला फारसं कळत नाही. "भुजंगप्रयाती य ये चार वेळा" हे रटण्याइतकाच आपला आणि वृतांचा संबंध.

काव्य झकास आहे. सांजसंध्येच्या कातरवेळच्या निराशावादी भावनेला आपण दिलेलं सुंदर सकारात्मक उत्तर आवडलं.

प्रचेतस's picture

20 Mar 2012 - 8:09 pm | प्रचेतस

रे गणा फोटो पुन्हा दिसून आले
येताना पिकासाची कास धरून आले

आस होती रे तुला किती बघण्याची
फोटो तेव्हा फ्लिकर सोडून आले.

ते क्षण होते कधीही नच दिसण्याचे
आज पाहूनी डोळे पाणावून आले

नयनांत रूजलेली जाणीव फोटो दिसण्याची
आज दिसूनी अपुरे स्वप्न पुर्ण जाहले

कितीदा तरसलो मी पाहण्यास ते
आज परी जालावर प्रकट जाहले.

अत्रुप्त आत्मा's picture

20 Mar 2012 - 10:07 pm | अत्रुप्त आत्मा

बघा लोकहो... वल्ली हे विडंबक नाहीत बरं...! ;-)

आवडेश

आस होती रे तुला किती बघण्याची
फोटो तेव्हा फ्लिकर सोडून आले.

मस्त

सांजसंध्या's picture

20 Mar 2012 - 8:09 pm | सांजसंध्या

गणेशा
छान सकारात्मक प्रयत्न आहे.

वल्ली
:D

चौकटराजा's picture

20 Mar 2012 - 8:14 pm | चौकटराजा

शब्द मेघ वर्षावला आणि मी भिजूनीच गेलो
काव्य भूमी ओलावली आणि मी रूजूनीच गेलो

चौकट राजाकडे नाही शब्द कळा. नाही प्रतिभा. पण कौतिक मात्र जरूर आहे. अतः दोन ओळी आपल्या कवतिका खातर !

स्पा's picture

21 Mar 2012 - 4:55 pm | स्पा

मस्त