नभांगण...!!

वेणू's picture
वेणू in जे न देखे रवी...
15 Mar 2012 - 6:03 pm

सुरावटींनी सजलेल्या, तर कधी
उधळल्या गेलेल्या मैफिली....
घमघमलेली सांजरात अन्
अर्धोन्मिलीत मोगरा....

'आठवतंय का ते?'-
सालांनंतरच्या भेटीतला,
तुझा निरागस प्रश्न
तेच, विस्मयी डोळे न्
दुमडलेले ओठ!

तुला विचारायचेच राहून गेले
कधी वाकून पाहिलंस मनात माझ्या...?

तू नेहमीच काठाशी वावरणारी.....

'अपनी धुन में मस्त'
असं अधोरेखित जगणारी...
जितकं तुला ओढू पाहिलं,
अडकवु पाहिलं,
तितकी निसटत गेलेली...
'बांधील प्रेमाचा व्यापार का?'
ह्याच भोवती धुमसणारी

समजलो नव्हतो,
बंधनात अडकणारी तू नाहीस,
जितकं स्वातंत्र्य नात्यात,
तितकी माझी होशील ते!

उमजताच, आलो हाक मारायला

तोवर मनाचं नभांगण रिकामं करून गेलीस....

हाका पोकळीतच विरल्या....!!

कविता

प्रतिक्रिया

पैसा's picture

15 Mar 2012 - 7:34 pm | पैसा

मिपावर स्वागत असं म्हणणार होते, पण मग लक्षात आलं, गेल्या वर्षी तुम्ही एक कविता प्रकाशित करून गायब झालात! कविता चांगल्या आहेत दोन्ही. नियमित लिहीत चला.

सांजसंध्या's picture

15 Mar 2012 - 7:51 pm | सांजसंध्या

:)

निशदे's picture

15 Mar 2012 - 8:08 pm | निशदे

मस्तच आहे...... खूप आवडले...... :)

प्रचेतस's picture

15 Mar 2012 - 8:40 pm | प्रचेतस

कविता आवडली.

चला, मागच्या काही दिवसांत पडलेल्या घाऊक विडंबनांचा योग्य परिणाम झालाय म्हणायचा

पक पक पक's picture

15 Mar 2012 - 8:58 pm | पक पक पक

चला, मागच्या काही दिवसांत पडलेल्या घाऊक विडंबनांचा योग्य परिणाम झालाय म्हणायचा

ओ वल्ली आम्ही बे काम झालो त्याच काय..? ;) आत्ता जरा कुठे चांगल चालल होत अन लगेच ही बेकारी... :sad: :sad: :sad:

जाई.'s picture

15 Mar 2012 - 9:33 pm | जाई.

छान आहे कविता

अत्रुप्त आत्मा's picture

15 Mar 2012 - 10:56 pm | अत्रुप्त आत्मा

सुंदर रचना जमलिये.. :-)

@चला, मागच्या काही दिवसांत पडलेल्या घाऊक विडंबनांचा योग्य परिणाम झालाय म्हणायचा>>> येस दॅट्स दी वर्क +++++++++ ११११११११११११११

@आत्ता जरा कुठे चांगल चालल होत अन लगेच ही बेकारी... >> आंम्हाला पूर्ण बेकार रहाण्यात अतिशय आनंद आहे...

आंम्हाला पूर्ण बेकार रहाण्यात अतिशय आनंद आहे...


आपणा मुळेच आम्हि देखिल 'बेक्कार' झालो आहोत... ;) मोठे सांगत होते , संगत चांगली ठेव !! पण ऐकल नाही . :) अन आता आम्हाला सुद्धा बेकार रहाण्यात अतिशय समाधान आहे... :) :)

जेनी...'s picture

16 Mar 2012 - 8:58 am | जेनी...

अप्रतिम ..
शब्दांची रचना ,अर्थ , सगळ सगळच सुंदर
अजुन कविता वाचायला आवडतिल तुमच्या .

चौकटराजा's picture

16 Mar 2012 - 10:01 am | चौकटराजा

मला कविता कळलीच नाही
माझी मति पळलीच नाही
पंचाईत माझी टळलीच नाही
काव्य दृष्टी मजकडे वळलीच नाही

स्वातीविशु's picture

16 Mar 2012 - 11:02 am | स्वातीविशु

फारच छान कविता...
प्रेमाच्या उद्विग्न भावना सुंदर रितीने मांडल्यात. :)

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

16 Mar 2012 - 11:22 am | मिसळलेला काव्यप्रेमी

आवडली.

प्यारे१'s picture

16 Mar 2012 - 11:32 am | प्यारे१

ब्येष्ट...!

वेणू's picture

18 Mar 2012 - 7:39 pm | वेणू

तुम्हां सगळ्यांचे आभार!
विडंबनाचा संदर्भ लक्षात नाही आला, पक पक :)

धन्या's picture

18 Mar 2012 - 8:25 pm | धन्या

धुळवड अजून संपलेली नसल्यामुळे जिकडे तिकडे पिचकार्‍या मारणं चालू असताना एक छान कविता वाचायला मिळाली.