सागराच्या तळाशी किती रत्नराशी
जगाच्या नकाशाशी झुंझतो शशी
मानवाची स्थिती वादळे संगती
मरणबाजार अवघा लढे पावसाशी
जात जातीत भेदे कुणी क्षूद्र वंशी
कळे ना कसे तो तयाचाच अंशी
बिचारे विचारांचे क्षेत्र कोरडे
स्नेह जाळून आळवे ती प्रार्थना कशी
यातना ही खरी अंत तो तूच आहे
पसारा दिगंत खंत पामरास दाहे
जगावे उरावे जिणे तोषवावे
जपावे झरे जोवरी श्वास वाहे
............................अज्ञात
प्रतिक्रिया
15 Mar 2012 - 12:39 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
परत एकदा अद्भुत रचना!!
__/\__
15 Mar 2012 - 12:39 pm | प्रचेतस
शब्दसौंदर्य आवडलं.
15 Mar 2012 - 1:01 pm | अत्रुप्त आत्मा
@शब्दसौंदर्य आवडलं. +१
15 Mar 2012 - 12:47 pm | तर्री
पण पहिल्या कडव्याच्या पहिल्या तीन ओळींचा एक मेंकाशी संबंध लावू शकलो नाही. "नकाशाशी झुंझणारा शशी " नाही समजला.
पण दुसरे तिसरे कडवे फार म्हणजे फारच ऊत्तम.
15 Mar 2012 - 2:30 pm | अज्ञातकुल
फॅसिस्ट लोकांना ल्युनॅटिक म्हणतात. त्यांच्यावर चंद्राचा प्रभाव असतो असे मानतात. जगाचा नकाशा अशा लोकांमुळे आज धोक्यात आहे.
15 Mar 2012 - 2:41 pm | निश
अज्ञातकुल साहेब, मस्त कविता.
दुसत कडव खरच अप्रतिम
15 Mar 2012 - 4:05 pm | चौकटराजा
मला काय बी कळ्ळं नाय . म्या पामर गदिमा च्या प्रसादगुण संस्कारात वाढलेला.
ह्ये विश्वरूप दर्शन मला न दिसले .
रसिक म्हणे मी स्वतः ला हे डोके माझे कसले ?
15 Mar 2012 - 9:07 pm | पक पक पक
मला काय बी कळ्ळं नाय .
असु द्या हो काका..? सॉरी आजोबा ,आता साठी आली... ;) या वयात समजुन घेण जरा कठीण्च जात.. ;)
म्हण्तात ना 'साठी बुद्धि नाठी' .. :bigsmile: :bigsmile: :bigsmile:
15 Mar 2012 - 4:06 pm | चौकटराजा
मला काय बी कळ्ळं नाय . म्या पामर गदिमा च्या प्रसादगुण संस्कारात वाढलेला.
ह्ये विश्वरूप दर्शन मला न दिसले .
रसिक म्हणे मी स्वतः ला हे डोके माझे कसले ?
15 Mar 2012 - 6:08 pm | परिकथेतील राजकुमार
कोण 'पामर गदिमा' ?
धन्यवाद.