प्रेमात हे असेच असते

गोंधळी's picture
गोंधळी in जे न देखे रवी...
13 Mar 2012 - 9:23 pm

मी तीला पाहत होतो
ती मला पाहत होती
पाहता पाहता एक दिवस तस काही होईल असे वाटले नव्हते
खरच प्रेमात हे असेच असते

मी तीच्याशी बोलत होतो
ती मझ्याशी बोलत होती
बोलता बोलता एक दिवस तस काही होईल असे वाटले नव्हते
खरच प्रेमात हे असेच असते

मी तीच्या घरी जायचो
ती माझ्या घरी यायची
येता जाता एक दिवस तस काही होईल असे वाटले नव्हते
खरच प्रेमात हे असेच असते

मी तीच्या तीने माझ्या सहवासात रहावे
असे एकदा वाटु लागले
होता होता एक दिवस तस काही होईल असे वाटले नव्हते
खरच प्रेमात हे असेच असते

अखेर एकदा मी तिला प्रेमाचि साद घातली
तिनेही मला प्रेमाने प्रतिसाद दिला
पण आता असेच वाटते एक दिवस असे होनार होते
कारण खरच प्रेमात हे असेच असते..हे असेच असते.

शांतरसप्रेमकाव्य

प्रतिक्रिया

चौकटराजा's picture

13 Mar 2012 - 9:52 pm | चौकटराजा

प्रतिक्रिया बर्‍याच वेळा घाईत टंकित होतात . तिथे एकवेळ अशुद्धता चालेल पण लेखात विशेषतः कवितेत अशुद्ध लेखन नसावे !

गोंधळी's picture

13 Mar 2012 - 11:12 pm | गोंधळी

काय करु पहिलाच प्रयत्न आहे. :sad:
चु. भु.मा.

पक पक पक's picture

13 Mar 2012 - 10:06 pm | पक पक पक

मी त्यांना वाचत होतो
अन मि त्यांना सहन सुद्धा करत होतो
पाहता पाहता एक दिवस तस काही होईल असे वाटले नव्हते
अन मि विड्म्बन्कार झालो

:bigsmile: :bigsmile: :bigsmile:

वा वा!! वा वा !! क्या बात है....? :crazy:

प्रचेतस's picture

13 Mar 2012 - 10:11 pm | प्रचेतस

:D :D :D

पक पक पक's picture

13 Mar 2012 - 10:21 pm | पक पक पक

वल्ली बाबा अजुन एक खास तुमच्यासाठी

मि त्यांना प्रतिसाद द्यायचो
अन ते पण माझे आभार मानायचे
च्यायला शेवटी जाम वैतागलो
अन खरच मि विडंबन्कार जाहलो... ;)

प्रचेतस's picture

13 Mar 2012 - 10:26 pm | प्रचेतस

पक पक राव ही आमची रिटर्न गिफ्ट

मी त्यांना सुरमई मागायचो,
हातभर लांबीची
पण ते अर्धीच द्यायचे,
कविता ऐकवत
च्यायला हे असंच असतं,
मग मी फ्रूटपंच मागवतो. आता नेहमीच. :P :P :P

पक पक पक's picture

13 Mar 2012 - 10:35 pm | पक पक पक

ती सुरमई पण नाय अन ते फ्रुटपंच पण नाय मिळाला
म्हणुन तर हा नवकाव्याचा बाजार मांडावा लागला ;)
नवकाव्यात नाय आग ,तिथे आहे नुसता फुफाटा
अन आता विडंबने टाकुन आम्ही बसतो खात कसाटा... :tongue:

:bigsmile: :bigsmile:

प्रचेतस's picture

13 Mar 2012 - 10:42 pm | प्रचेतस

सुरमई नाही मिळाली, मिळेल,
फ्रूटपंच नाही मिळाला, तो ही मिळेल
काव्याचा बाजार मांडून
नवकविंनी ओढलेत कागदावर फराटे
जास्त विडंबने टाकू नका
नायतर मिळतील संपादकांचे धपाटे. :BIGSMILE: :BIGSMILE: :BIGSMILE:

पक पक पक's picture

13 Mar 2012 - 10:49 pm | पक पक पक

बापरे ,गण्पा भाउ येतील >>>>> पळ्तो आता..... ;) >>>>>>>

पक पक पक's picture

13 Mar 2012 - 10:08 pm | पक पक पक

मग करा आता लग्न ,मग पोर्-बाळ अन मग प्रेमाच्या आयचा घो !! ;)

अत्रुप्त आत्मा's picture

14 Mar 2012 - 12:27 am | अत्रुप्त आत्मा

जरा इकडे ही या हो... या'च प्रेमाचा गुलकंद खायला ;-) http://www.misalpav.com/node/21010

मोदक's picture

14 Mar 2012 - 1:05 am | मोदक

झैरात.. झैरात.. :-D

अत्रुप्त आत्मा's picture

14 Mar 2012 - 1:15 am | अत्रुप्त आत्मा

@झैरात.. झैरात..>>> नाही रे मोदका..हा रिवाज आहे... मी रस्त्या-वरुन-पाडलेला ;-)

गोंधळी's picture

14 Mar 2012 - 12:25 pm | गोंधळी

तुमच्या प्रोत्साहना मुळे माझ्या मधिल कविआत्म्याचाविश्वास दुणावला आहे.:glasses:

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

14 Mar 2012 - 6:04 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

अवघड आहे.