रेशमी सलवार कुडता जाळीचा

नरेंद्र गोळे's picture
नरेंद्र गोळे in जे न देखे रवी...
13 Mar 2012 - 8:31 pm

मुलगा:
रेशमी सलवार कुडता जाळीचा |
रूप सह्य न, नखराही कमालीचा ||

मुलगी:
जा रे पिच्छा सोड मज मतवालीचा |
का रे रस्ता शोधतोसी चौकीचा || धृ ||

मुलगा:
पाहे जेव्हा तुला मी |
फुलझड्या अंतरी झडती ||
मी करेन पिच्छा, पडल्या |
जरी हातकड्याही हाती |
पाड काय चौकीचा || १ ||

मुलगी:
आहे घरंदाज मी नारी |
मला समज न असली तसली ||
बड्याबड्यांची केली |
मी आहे ऐशी तैशी |
तू कुण्या गणतीचा || २ ||

ही कविता माझी नाही. मात्र, हा आविष्कार माझाच आहे.

चाल ओळखीची वाटू शकते. उमगली तर अवश्य सांगा.

मूळ कवितेतला मुलगा गातो ते मात्र 'आशा भोसले' ह्यांच्या आवाजात!

शृंगारकवितामौजमजा

प्रतिक्रिया

हा हा.
रेशमी सलवार कुर्ता जालीका|
रूप सहा नाही जाये नखरेवालीका||

मतवाली ऐवजी आणखी कोणता शब्द वापरता येईल?

नरेंद्र गोळे's picture

14 Mar 2012 - 11:20 am | नरेंद्र गोळे

मतवाली ऐवजी आणखी कोणता शब्द वापरता येईल?>>>
मतलाई = झुळूक
हा शब्द वापरता येईल. मात्र तो किती जणांना माहीत असेल हे सांगता यायचे नाही!

रेशमी सलवार कुडता जाळीचा
रूप सह्य न, नखराही कमालीचा
जा रे पिच्छा सोड मज मतलाईचा
का रे रस्ता शोधतोसी चौकीचा

http://www.youtube.com/watch?v=KnyM2O3h2FU
इथे हे गाणे ऐकताही येईल. पाहण्यात जी मजा आहे, ती गाण्यात नाही, हे मात्र कबूल करावेच लागेल.

लहानपणी कव्वाली चे मुकाबले पाहिले. मेळे पाहिले. एका मुकाबला होता चक्क मराठी . त्यात पुढील प्रकार आजही आठ्वतो
तो म्हणतो - कसे करू तुझ्यावरती प्रेम
मी खेड्यातला वेडा , तू शहराची मेम
चाल_ कैसे करू प्रेमकी मै बात- लता लक्श्मी प्यारे फिल्म अनिता

ती म्हणते - असं काय बघतोस रे माकडा
माझा रे माझा घरधनी हाये फाकडा !

लहानपणी कव्वाली चे मुकाबले पाहिले. मेळे पाहिले. एका मुकाबला होता चक्क मराठी . त्यात पुढील प्रकार आजही आठ्वतो
तो म्हणतो - कसे करू तुझ्यावरती प्रेम
मी खेड्यातला वेडा , तू शहराची मेम
चाल_ कैसे करू प्रेमकी मै बात- लता लक्श्मी प्यारे फिल्म अनिता

ती म्हणते - असं काय बघतोस रे माकडा
माझा रे माझा घरधनी हाये फाकडा !

प्रचेतस's picture

13 Mar 2012 - 10:04 pm | प्रचेतस

झकास.
आविष्कार आवडला.

पैसा's picture

13 Mar 2012 - 10:14 pm | पैसा

तुम्ही पूर्वीही हिंदी गाण्यांचा मराठी आविष्कार केलेला आठवतोय!

नरेंद्र गोळे's picture

14 Mar 2012 - 11:22 am | नरेंद्र गोळे

रेवती, चौकट राजा, वल्ली आणि पैसा, प्रतिसादांखातर सगळ्यांना मनःपूर्वक धन्यवाद!

सांजसंध्या's picture

14 Mar 2012 - 3:31 pm | सांजसंध्या

छानच आहे भावानुवाद