विजयादशमीच्या शुभेच्छा!

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in जनातलं, मनातलं
21 Oct 2007 - 1:05 am

संस्कृतीमौजमजासद्भावनाशुभेच्छाविरंगुळा

प्रतिक्रिया

राजे's picture

21 Oct 2007 - 1:31 am | राजे (not verified)

विजयादशमीच्या शुभेच्छा!

राजे
(*हेच राज जैन आहेत)
माझे शब्द....

चित्रा's picture

21 Oct 2007 - 3:24 am | चित्रा

सर्वांना दसर्‍यानिमित्त शुभेच्छा!

चित्रा

बेसनलाडू's picture

21 Oct 2007 - 3:37 am | बेसनलाडू

म्हणतो.

प्रियाली's picture

21 Oct 2007 - 4:15 pm | प्रियाली

हेच म्हणते. ;-)

अवांतरः कोण या अम्मा नेहमी फोटोत दिसतात?

-प्रियाली अम्मा!

विसोबा खेचर's picture

21 Oct 2007 - 5:26 pm | विसोबा खेचर

अवांतरः कोण या अम्मा नेहमी फोटोत दिसतात?

ही मीरा जस्मिन! तमिळ, तेलुगूमधली माझी अतिशय लाडकी नटी! :)

हा पाहा मीराचा अजून एक सुरेख फोटो!

आपला,
(दाक्षिणात्य नट्यांचा अभ्यास असलेला!) तात्या.

ईत्यादि's picture

21 Oct 2007 - 6:35 am | ईत्यादि

सर्व सभासदाना आमचे तर्फे शुभो बिजोया.

ईत्यादि

विकास's picture

21 Oct 2007 - 6:37 am | विकास

सर्वांना विजयादशमीच्या शुभेच्छा!

आज सीमोल्लंघन करायचे असते. सभ्यतेच्या मर्यादा न सोडता, विचारांना कुठल्याही सीमेचे बंधन न घालता, जे काही आपले क्षेत्र असेल त्यात नित्यनवीन क्षितीजे पादाक्रांत करूया!

कोलबेर's picture

21 Oct 2007 - 9:57 am | कोलबेर

तात्या तुम्हालापण शुभेच्छा!!
"या वर्षी ती आपट्याची पानं मिळालीच नाहीत, म्हणून मिसळपाव ग्रामपंचायत खरं सोनं लुटत आहे, तेवढं गोड मानून घ्या! :)"
हे बाकी मस्तच!!
-कोलबेर

विसोबा खेचर's picture

21 Oct 2007 - 10:01 am | विसोबा खेचर

"या वर्षी ती आपट्याची पानं मिळालीच नाहीत, म्हणून मिसळपाव ग्रामपंचायत खरं सोनं लुटत आहे, तेवढं गोड मानून घ्या! :)"

हो, हे वाक्य मला पण आवडलं. एका पुढे ढकललेल्या इमेलमधून मिळालं.. त्यामुळे लगेच माझ्या प्रतिभेला पंख वगैरे फुटले आणि मी वरील मजकुरासकट खर्‍या सोन्याचं बिस्किटच डकवून टाकलं! :)

तात्या.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 Oct 2007 - 10:27 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मिसळप्रेमींना आमच्याही हार्दिक शुभेच्छा !

अवांतर ;) तात्या, ग्रीटींग आवडले ! तुम्ही असे सुंदर छायाचित्र टाकून लक्ष विचलीत नका करत जाऊ राव ! आमच्याने मग काही लिहिणेच होत नाही ! :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विसोबा खेचर's picture

21 Oct 2007 - 10:45 am | विसोबा खेचर

अवांतर ;) तात्या, ग्रीटींग आवडले ! तुम्ही असे सुंदर छायाचित्र टाकून लक्ष विचलीत नका करत जाऊ राव ! आमच्याने मग काही लिहिणेच होत नाही ! :)

अहो चालायचंच बिरुटेशेठ!

पण बाईचं सौंदर्य किती सालस, सोज्वळ आणि सुरेख आहे बघा! आम्हाला तर बुवा अश्याच बायका जास्त आवडतात... साला हिडीसपणा काय कामाचा?

शिवाय बाईची साडी किती सुरेख आहे पाहा. आम्हाला अश्याच उंची उंची साड्या आवडतात! गजराही किती छान माळला आहे, छानपैकी खांद्यांवर विसावला आहे!

साधी केशरचना, सरळ नाक, सुंदर व बोलके डोळे! छ्या बुवा, आपण तर साला खल्लासच झालो!

आम्हाला ही बया फारच आवडली आणि त्या नादात वाहवत जाऊन आम्ही हिचं चित्र असलेलं ग्रिटींग कार्ड बनवलं! :)

आणि खरं सांगा बिरुटेशेठ, अहो वाहवत जाण्यात काय वाईट आहे?

विंदा म्हणतात (नक्की शब्द आठवत नाहीत,)

वेड्यापिश्या ढगांकडून वेडेपिसे आकार घ्यावे,
संथ वाहणार्‍या भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी!

तेव्हा तूर्तास आम्ही वेड्यापिश्या ढगांकडून वेडेपिसे आकार घेण्यात मग्न आहोत, उद्या वेळ आली की संथ वाहणार्‍या भीमेकडून तुकोबांची माळही अगदी अवश्य घेऊ!

काय, खरं की नाही? :)

आपला,
(बाईबाटलीचा रसिक!) तात्या.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 Oct 2007 - 11:12 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तात्या,

वरील प्रतिसादाशी १००% सहमत. पण हेच जर आम्ही म्हणालो असतो तर, प्रेमळ सर्कीटराव औरंगाबादला आले असते अन आम्ही प्राध्यापक आहोत की, कोणी भोंदूबाबा आहे याचा शोध घेत फिरत राहिले असते ! :)

<<आणि खरं सांगा बिरुटेशेठ, अहो वाहवत जाण्यात काय वाईट आहे?
सोज्वळ सौंदर्य दिसल्यावर आम्हीही असेच वाहवत जातो ! ( आणि मग सर, जिवापाड.... लेखाची निर्मिती होते )

<<वेड्यापिश्या ढगांकडून वेडेपिसे आकार घ्यावे,
<<संथ वाहणार्‍या भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी!

क्या बात है !

आपला
(सर्कीटरावांशी विजयादशमीच्या निमित्ताने वाद ओढवून घेण्याच्या मूड मधे असलेला .)
प्रा.डॊ..........

राजीव अनंत भिडे's picture

21 Oct 2007 - 2:40 pm | राजीव अनंत भिडे

आपला
(सर्कीटरावांशी विजयादशमीच्या निमित्ताने वाद ओढवून घेण्याच्या मूड मधे असलेला .)

प्राध्यापक महाशय, आपली आणि सर्कीटरावांची रंगलेली वादावादी वाचण्यास आम्ही उत्सुक आहोत!

राजीव अनंत भिडे,
हिंदु कॉलनी, मुंबई.

सर्किट's picture

22 Oct 2007 - 9:54 pm | सर्किट (not verified)

प्राध्यापकांशी वाद घालण्यात काहीच मजा नाही बॉ. आमचा वाद फक्त जे प्राध्यापक नसूनही उपदेशाचे गोमुत्र शिंपडत फिरतात, त्यांच्याशी !

- सर्किट

सर्किट's picture

22 Oct 2007 - 9:56 pm | सर्किट (not verified)

अहो चिरुटे साहेब,

प्रेमळ सर्कीटराव औरंगाबादला आले असते अन आम्ही प्राध्यापक आहोत की, कोणी भोंदूबाबा आहे याचा शोध घेत फिरत राहिले असते ! :)

त्यासाठी औरंगाबादला येण्याची काय गरज ? इथनंच कळतंय की !

- (प्रेमळ) सर्किट

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 Oct 2007 - 11:42 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

<<त्यासाठी औरंगाबादला येण्याची काय गरज ? इथनंच कळतंय की !

हाहाहा :))))
खोलात जाऊन चिखलात पाय बूडवून यायचे अन मग चिखलफेक करायची,
वाटलं याल इथे, अन शोधत राहाल म्हणून म्हणालो !

देवदत्त's picture

21 Oct 2007 - 12:28 pm | देवदत्त

सर्वांना दसर्‍याच्या हार्दिक शुभेच्छा....

प्रमोद देव's picture

21 Oct 2007 - 12:34 pm | प्रमोद देव

समस्त मैसळ्यांना माझ्याही विजयादशमीनिमित्त हार्दिक शुभेच्छा!

राजीव अनंत भिडे's picture

21 Oct 2007 - 2:43 pm | राजीव अनंत भिडे

माझ्याही सर्वांना दसर्‍याच्या शुभेच्छा! तात्या, तू शुभेच्छापत्रावर चिकटवलेली बाई मनमोहक आहे!

राजीव अनंत भिडे,
हिंदु कॉलनी, मुंबई.

आजानुकर्ण's picture

22 Oct 2007 - 8:28 am | आजानुकर्ण

सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

-(शुभेच्छुक) आजानुकर्ण

चित्तरंजन भट's picture

22 Oct 2007 - 12:54 pm | चित्तरंजन भट

सर्वांना विजयादशमीच्या शुभेच्छा!!
तात्या, तुझा दाक्षिणात्य नट्यांचा 'व्यासंग' अतिशय वाखाखण्याजोगा आहे.

राजे's picture

23 Oct 2007 - 12:48 am | राजे (not verified)

"तुझा दाक्षिणात्य नट्यांचा 'व्यासंग' अतिशय वाखाखण्याजोगा आहे."

सहमत.

तात्यांचे नाद [आवड] ही एक चर्चेची गोष्ट आहे कधीतरी करुच आपण सर्वजण मिळून.

राजे
(*हेच राज जैन आहेत)
माझे शब्द....