बालपण...?

पक पक पक's picture
पक पक पक in जे न देखे रवी...
12 Mar 2012 - 10:41 pm

मला सुद्धा एकदा विडंबक व्हायचे आहे
अन एकदा तरी त्या 'जिलब्यांच'फडक फाडायच आहे..

कधीही न घाबरता ट ला ट अन म ला म प्रवृत्तीना
हलकेच घेत विडंबन पाडायच आहे..

विडंबकाचा खेळ तो खेळून पाहायचा आहे
खरच एकदा विडंबक होऊन,
सतत जिलब्या टाकणार्‍या
हलवायांचा पसारा आवरायचा आहे...

परीपक्वता विचारांत नसतेच बिलकुल
बालीशपणा मात्र वाढ्तच आहे
खरच एकदा विडंबक होउन
त्यांना अभ्यास वाढ्वायला लावायच आहे

कसलेसे उमासे अन कोणते ते उसासे
कचकचीत विड्म्बन टाकुन दाबायचे आहेत
अन पिंपळावरच्या भुतांना गाण्गापुरी धाडायचे आहे
खरच मलापण विडंबक व्हायच आहे...

आर्ध्या सुरमईची शपथ,सकस काव्य निर्मिती साठी
मला हे सर्व करायचे आहे ,अन खरच मला विडंबक व्हायचेच आहे

विडंबन

प्रतिक्रिया

तर्री's picture

12 Mar 2012 - 10:44 pm | तर्री

जहबरदस्त !!!

तर्री's picture

12 Mar 2012 - 10:44 pm | तर्री

जहबरदस्त !!!

प्रचेतस's picture

12 Mar 2012 - 10:45 pm | प्रचेतस

करुनी सतत पक पक पक
झालात तुम्ही आता नवविडंबक.

अत्रुप्त आत्मा's picture

13 Mar 2012 - 2:45 pm | अत्रुप्त आत्मा

@करुनी सतत पक पक पक
झालात तुम्ही आता नवविडंबक.....>>> मेलो..मेलो...वल्ली
आई...आई...आई...आई...काही केल्या हसू थांबत नाही वारलो...वारलो...

होणार होणार होणार..पकपक तुंम्ही(ही) विडं-बक होणार
आमच्या रेसमधे इरेस पडलात,तर जोरात पुढे जाणार
त्यामुळे....असेच सह-भागी होत रहा...
आणी नव-कवींना वैकुंठाला नेत रहा...
आंम्हीही येऊ लावायला काडी...
मिपावर बांधू एक विडं-बकांची माडी
माडीवर मिळेल तयार माल
खाल्यावर कुणाचिही निघेल साल
सोलुन त्यांचं लोणचं घालू
ह्या पुढेही हे असचं र्‍हाऊदे चालू... ;-)

किचेन's picture

14 Mar 2012 - 10:49 pm | किचेन

तुझ्या अंगात काय रोसेश शिरल्लाय का? कुठेहि काहिहि जोडून काय तयार केलय हे?

पक पक पक's picture

14 Mar 2012 - 11:04 pm | पक पक पक

तुझ्या अंगात काय रोसेश शिरल्लाय का?

कोणाच्या हो ..?माझ्या की आत्म्याच्या..?

पैसा's picture

12 Mar 2012 - 10:55 pm | पैसा

=)) =))

अव राहिलेली ती अर्धी सुरमई आमच्यापण पोटात जाणार आहेच की..

[:)]

मला आता असे म्हणावे वाटते आहे की, कविंना त्यांच्या विरोधकांपासुन धोका नाहिच पण विडंबनकारांपासुन त्यांनी आता सावध राहिले पाहिजे.. काहि खैर नाय.

आणि एक ..
आपल्या राज्यात कसे एखादा समाजावर पिक्चर काढायचा असल्यावर , आपल्या थोर राजकरण्यांना तो दाखवावा लागतो आधी.

तसे कविंनी आता विडंबन कारांकडुन आदेश घेवुन कविता टाकाव्यात बाबा ..
नाहितर कवि लवकरच वीक झालाच म्हणुन समजा

प्रचेतस's picture

12 Mar 2012 - 11:12 pm | प्रचेतस

पक पक पक's picture

12 Mar 2012 - 11:13 pm | पक पक पक

अव राहिलेली ती अर्धी सुरमई आमच्यापण पोटात जाणार आहेच की..

ते तुम्हि कमिट्मेंट पाळायला टाळाटाळ करु लागले अस वाट्ल हो ..म्हणुन आठ्वण करुन दिली झाल... ;)

मोदक's picture

13 Mar 2012 - 6:21 pm | मोदक

खल्लास विडंबन... :-D

अरे अर्ध्या सुरमईत असलं भारी विडंबन करणार असाल तर एक सुरमई वुइथ सौथ इंडियन मसाला अन १/२ फ्रुट पंच दोन्ही लेयरमध्ये मिळाले तर मग काय कराय कुणास ठाउक ? आता इथल्या कविंनी एक वेगळं संस्थळ उघडु नये म्हणजे मिळवलं.

चौकटराजा's picture

13 Mar 2012 - 6:31 pm | चौकटराजा

हो ना मग ! चांगली कविता कशाला लिहिली.? विडंबनच लिहायचं डायरेक्ट ! विटंबन मात्र नको नाहीतर कवि लोकं सरपंचाकडे मालकाकडे, संपादकांकडे तक्राआआआआआआआआआआआआआअर करतील . ( ते एस एस एस सारखं कसं लिहायचं या एडीटर मधे ? )

पुढच्या वेळी " तरूणपण" असा विषय घे अन बी एस ई चे ए ग्रूपचे भाव कॉपी कर ! मस्त विडंबन !

बॅटमॅन's picture

14 Mar 2012 - 2:24 pm | बॅटमॅन

बाआआआआआआआआआआआआआआआआआआप रे!!!!!!!
मानलं तुम्हाला.....जिलब्या पाडणार्यांचा तुम्ही फडशा पाडाल हे नक्की.

>> पक पक विडंबक....

हे लै भारी होतं.