भिववया येते मज

सांजसंध्या's picture
सांजसंध्या in जे न देखे रवी...
11 Mar 2012 - 5:13 pm

भयानकशांतरसकविता

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

11 Mar 2012 - 5:59 pm | प्रचेतस

छान लिहिलंस सांजसंध्ये.

पक पक पक's picture

11 Mar 2012 - 6:09 pm | पक पक पक

हे फार भारी आहे..मस्त....

किसन शिंदे's picture

11 Mar 2012 - 6:29 pm | किसन शिंदे

कविता छानच पण टंकायचा भयंकर कंटाळा आहे वाटतं तुम्हाला;)

सांजसंध्या's picture

11 Mar 2012 - 6:37 pm | सांजसंध्या

@ सगळेच ..थँक्स अ लॉ..:)

@ किसन शिंदे :D
टंकल्याशिवाय का चित्रावर कविता आली ? :)

पक पक पक's picture

11 Mar 2012 - 6:41 pm | पक पक पक

सगळेच ..थँक्स अ लॉ.. :)

अजुन एक येउ द्या....

'गांधारी काळरात' म्हणजे काय?

गांधार देशातील म्हणजे आजच्या अफगाणिस्तानातील रात्रीचे हे वर्णन असावे कदाचित. त्यामुळेच गांधारी काळरात्र असे म्हटले गेले असावे.

'गांधारी काळरात' म्हणजे काय? हा प्रश्न आम्हालाही पडला गेला होता. पण आम्ही त्याचा "डोळ्यावर पट्टी बांधल्यामुळे आपण्च आपल्या आयुष्यात अंधार निर्माण करुन घेणे" असा लावला होता.

कवितेत येणार्‍या हमले, हल्ले या शब्दांवरुन वल्लीचा अर्थ जास्त योग्य वाटतोय. कवयित्री त्या शब्दाचा योग्य अर्थ काय ते कदाचित सांगेलच.

बादवे, मिपावर रतीब कवी/कवयित्री अशी एक नवी जमात उदयाला येत आहे काय? ;)

अन्नू's picture

11 Mar 2012 - 7:07 pm | अन्नू

कविता छान जमलेय. :)
अवांतरः- यावेळी अत्रुप्त आत्म्याच्या राज्यात गेला होतात का? Smiley

चौकटराजा's picture

11 Mar 2012 - 8:26 pm | चौकटराजा

गांधारी ने डोळे बांधले होते तशी ही रात्र देखील आंधळेपण ल्यालेली दिसतेय ! म्हणून कवयित्रीने "गांधारी" शब्द वापरला असावा.
व्हर्च्यूअल जगात ही आय डी खरोखरच मुलगी ( स्त्री) आहे असे समजून " कवयित्री "शब्द वापरला आहे .
मला एक पडलेले कोडे-
१) एकदा सरावल्या नंतर परत भ्यायचे कशाला ?
२) भिववया की भिववाया
हळू हळू दिनमणि हा उदयाचली आला
फुलवाया जणू माझ्या भाग्य पंकजाला
ही लहानपणची कविता आठवते ...

गांधारी ने डोळे बांधले होते तशी ही रात्र देखील आंधळेपण ल्यालेली दिसतेय

एक्दम सहमत आहे......

दादा कोंडके's picture

12 Mar 2012 - 9:26 pm | दादा कोंडके

व्हर्च्यूअल जगात ही आय डी खरोखरच मुलगी ( स्त्री) आहे असे समजून

प्रतिसादाच्या (आणि प्रतिसाद देणार्‍या आयडींवरून) संख्येवरूनच ओळखता येतय की हा स्त्री आयडी आहे म्हणून. ;)

प्रतिसादाच्या (आणि प्रतिसाद देणार्‍या आयडींवरून) संख्येवरूनच ओळखता येतय की हा स्त्री आयडी आहे म्हणून.

जरा कुठे स्त्री आंजावर व्यक्त व्हायला लागली तर लागलं का तुमच्या पोटात दुखायला?

दादा कोंडके's picture

14 Mar 2012 - 1:14 am | दादा कोंडके

आज पासून सगळ्या लेडीज बायकांना प्रतिसाद देणार. :)

सांजसंध्या's picture

11 Mar 2012 - 9:26 pm | सांजसंध्या

नमस्कार चौराकाका

काका म्हणण्याचं कारण वर्च्युअल जगात तुम्हीच सांगितलेलं वय साठ म्हणून आदर :) तुमचा प्रतिसाद रागातून आलेला दिसतोय. :D साठीचा मनुष्य कसे प्रतिसाद देईल हे इमॅजिन करून प्रतिसाद देत चला. ;)

"साठीचा मनुष्य कसे प्रतिसाद देईल हे इमॅजिन करून प्रतिसाद देत चला"

Smiley संध्याचा टमकी टोला!

चौकटराजा's picture

12 Mar 2012 - 1:27 pm | चौकटराजा

मला ज्याअर्थी "संध्या छाया भिवविती ह्र्दया " ही ओळ माहिती आहे . त्या अर्थी मी साठीला आलेलो असेल असे व्हर्चुअली तर सिद्ध होते की नाही.
तसा मी संध्या छाया याना घाबरतच असतो म्हणा. आता मिपा वर "सरावून" जाईन म्हणतो !

रघु सावंत's picture

11 Mar 2012 - 9:26 pm | रघु सावंत

सांजसंध्या म्याडम छान होर्रर कविता लिहीलीत.

सांजसंध्या's picture

11 Mar 2012 - 9:29 pm | सांजसंध्या

थँक्स रघुजी

ही कविता मनाच्या निराशाजनक स्थितीचं प्रतिकात्मक वर्णन आहे. अंधार हे निराशेचं प्रतिम म्हणून वापरलंय. गांधारी काळरात या शब्दकळा आहेत. अशा मनाच्या स्थितीत भ्याड म्हणजेच षडरिपू हल्ले करायला टपलेलेच असतात. थोडासा निग्रह केला तर मात्र अंधाराला पळवून लावणारी पहाट ( आशेचे किरण) दूर नाहीत असा कवितेचा आशय आहे.

इन्दुसुता's picture

11 Mar 2012 - 10:39 pm | इन्दुसुता

कवितेचा आशय आवडला..

अत्रुप्त आत्मा's picture

11 Mar 2012 - 11:02 pm | अत्रुप्त आत्मा

व्वा व्वा..! आज मात्र असं मनापासुन म्हणावसं वाटतं की... आयडी नेम...जितक काव्यमय आणी परस्परानुरुप आहे,तितकच आजचं हे गाणं देखिल..! त्या मागील चित्र हे खरच गाण्यामागचे चित्र वाटते...वरती प्रतिभा,,मागे प्रतिमा...काव्यातली जितकी,,,तितकिच खरिखुरी...!

त्यामुळे आज येकदम जोरात उडलय...असा शेरा मारणेत येत आहे...

अवांतर- त्या मागच्या शीन मुळे,,,मी गीत वाचायला एकदम सुरवात केली-तीच एका हाँटेड चालीत... सालं,मला अजुन ते रेकॉर्ड करुन इथे लावण्याचं तंत्र अवगत नाही :-( नायतर लगेच लावलं असतं... :-)

सांजसंध्या's picture

12 Mar 2012 - 10:19 am | सांजसंध्या

सर्वांचे मनापासून आभार

अतृप्त आत्मा - खरंच आवडलं असतं ऐकायला

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

12 Mar 2012 - 11:37 am | मिसळलेला काव्यप्रेमी

सुरेख रचना.
आवडली.

स्पा's picture

12 Mar 2012 - 1:37 pm | स्पा

मागचं चित्र आवडल

अन्नू's picture

12 Mar 2012 - 1:42 pm | अन्नू

मागचं चित्र आवडल

तुंम्हाला कवितेच्या पाठीमागचे चित्र असं म्हणायच आहे का?

तुंम्हाला कवितेच्या पाठीमागचे चित्र असं म्हणायच आहे का?

अर्थातच , तुम्ही कुठल्या चित्राबद्दल बोलत हात?

चित्रच दिसले नसल्याने शब्द च दिसले नाहि...

प्रचेतस's picture

12 Mar 2012 - 9:14 pm | प्रचेतस

गणेशा, आता तरी अ‍ॅन्ड्रोईडवाला मोबाईल घे रे.

छान.

चौकटराजांच्या सूचना अमलात आणल्या तर ही मुलगी नक्कीच नाव काढणार. ;-)

सांजसंध्या's picture

13 Mar 2012 - 6:54 am | सांजसंध्या

धन्यवाद सर्वांचे

दादा कोंडके - कविता कुणी लिहीली हे महत्वाचं नसावं. हे सर्व जेंडरलेस असायला हवं, नाही का ? :)