(का? का? का?)
(मुळ भांडवल आमचेच, म्हणजे हे!)
अवेळीही कुणी का लिहीत जाती
दिवसा रातीही का जागे राहती
प्रतिसाद नच का कुणी देती
वेळेवर का सारेच झोपती
का न त्यांचे कॉम्पुटर जळती
का न त्यांचे किबोर्ड तुटती
प्रतिसाद देण्या तुम्ही का थांबले
गिनीपिग उगा का प्रथम धजावले
कंपुबाज सारे का जमून येती
येथे येवूनी कट्ट्यावर का जाती
का संपादक उगाच येथे असती
"की, आम्ही येथे आहो" असे सांगती
हा मी एकटाच का कधीचा बोलतो
येथे कविताहूनही का येथेच विडंबतो
- का बे
प्रतिक्रिया
8 Mar 2012 - 5:55 am | अरुण मनोहर
व्हाय धिस कोलावेरी कोलावेरी डी?
8 Mar 2012 - 6:02 am | पाषाणभेद
का न त्यांचे कॉम्पुटर जळती
का न त्यांचे किबोर्ड तुटती
या तिसर्या कडव्यामुळे गैरसमज होण्याची शक्यता आहे. ते दुसरे कडवे आहे.
केवळ हसण्यावारी घ्यावे ही विनंती.
8 Mar 2012 - 6:12 am | अत्रुप्त आत्मा
@केवळ हसण्यावारी घ्यावे ही विनंती.>>> घेउ दे की कुणाला,घ्यायचं असेल तर,रडण्यावारी आणी चिडण्यावारी...आंम्हीपण त्याला इचारू---का.बे...? ;-)
पण अमच्या लेखी मात्र मध्यंतरी थंडावलेले पा.भे. परत चालू झाले... बाकी मला हे विडंबन म्हणजे प्रत्यक्षाहुनी प्रतिमा सुंदर..!
8 Mar 2012 - 1:14 pm | अरुण मनोहर
व्हाय धिस कोलावेरी कोलावेरी डी?
डब्बल डब्बल टंकले धागे
जरी कोणी नाहीत जागे
तरीही ओर्डून प्रतिसाद मागे
काबे काबे काब्बे?
व्हाय धिस कोलावेरी कोलावेरी डी?
8 Mar 2012 - 8:07 am | पैसा
बघत्येय हां!
8 Mar 2012 - 10:43 am | प्रचेतस
कमाल केलीत राव. :)
8 Mar 2012 - 4:48 pm | सांजसंध्या
छान आहे.
8 Mar 2012 - 4:57 pm | चौकटराजा
आम्हास दुसरा नाही सत्संग
रात्रेंदिन आम्हा ख्ररडण्याचा प्रसंग
कंपूबाजाना कंपू करूद्यात खुशाल
आम्ही लिहिण्याची खेळू तरीही चाल