मन-झोपाळा

अज्ञातकुल's picture
अज्ञातकुल in जे न देखे रवी...
7 Mar 2012 - 8:25 pm

ओघळ पिकल्या पानांचे; सुकले देठ जरी
अंकूर अजूनहि ओले; खोडात चिमुकले; गाभारी
वारा,.. झाडून नेतसे हिरमुसलेले; गत वय माघारी
झुळुकेत चिन्मयी कल्प उमलवे; नवजीवन दरबारी

अंकीत कळ्या विलसती कोवळ्या वर्मावर अवतारी
गंधाने भारी नवपर्णांकित शुभ्र परांची वारी
किलबिल अवघी चौफेर; पिले पक्षिणी परतली माहेरी
किमया ही ऋतु-तारुण्यबहर-रत प्रणयआभेची सारी

यातना वेदना गळलेल्या; नत पायतळाशी; गोळा
पाहून रम्य मय वसंत-शोभा; तृप्त ऋणांकित डोळा
मजला ही भेटे अशी मनोरम रत्नजडित मधुशाळा
अवकाशाचा अन झुले अंबरी मदनमस्त मन-झोपाळा

................................अज्ञात

शृंगारकविता

प्रतिक्रिया

सांजसंध्या's picture

7 Mar 2012 - 10:19 pm | सांजसंध्या

अज्ञातजी
नेहमीप्रमाणेच चित्रमय, उपमांची रेलचेल आणि शब्दकळांनी युक्त काव्य.

अज्ञातकुल's picture

8 Mar 2012 - 10:01 am | अज्ञातकुल

मनःपूर्वक आभार सांजसंध्याजी :)

तर्री's picture

8 Mar 2012 - 10:09 am | तर्री

पुढच्या ओळी आवडल्या :

किलबिल अवघी चौफेर; पिले पक्षिणी परतली माहेरी
किमया ही ऋतु-तारुण्यबहर-रत प्रणयआभेची सारी

अभिजीत राजवाडे's picture

9 Mar 2012 - 3:25 am | अभिजीत राजवाडे

तुमची कविता वाचताना, कोरिव काम केलेल्या शिसवी खुर्चीवर हात फिरवल्याचा भास होतो.

पुढच्या कवितेच्या प्रतिक्षेत.