ही कविता राज्यव्यापी शिक्षक साहित्य संमेलनासाठी , श्री बबलू वडार (शिक्षक -कोल्हापूर) यांनी लिहिली होती. कविता पठण स्पर्धेत त्यांना पहिला नंबर मिळाला…
Out dated झालंय आयुष्य
स्वप्नही download होत नाही
संवेदनांना 'virus' लागलाय
दु:खं send करता येत नाही
जुने पावसाळे उडून गेलेत
delete झालेल्या file सारखे
अन घर आता शांत असतं
range नसलेया mobile सारखे
hang झालेय PC सारखी
मातीची स्थिती वाईट
जाती माती जोडणारी
कुठेच नाही website
एकविसाव्या शतकातली
पीढी भलतीच 'cute'
contact list वाढत गेली
संवाद झाले mute
computer च्या chip सारखा
माणूस मनानं खुजा झालाय
अन 'mother' नावाचा board,
त्याच्या आयुष्यातून वजा झालाय
floppy Disk Drive मध्ये
आता संस्कारांनाच जागा नाही
अन फाटली मनं सांधणारा
internet वर धागा नाही
विज्ञानाच्या गुलामगिरीत
केवढी मोठी चूक
रक्ताच्या नात्यांनाही
आता लागते face book.....!!
प्रतिक्रिया
29 Feb 2012 - 11:07 am | प्रचेतस
ह्या कवितेला पहिला नंबर..:-O :-O :-O
कठीण आहे हो.
परिक्षक कोण होते?
29 Feb 2012 - 11:20 am | अत्रुप्त आत्मा
3 Mar 2012 - 4:29 pm | सांजसंध्या
भाव पोहोचला
11 Mar 2012 - 9:52 am | ajay wankhede
आवडली कविता......
..........................................................................................................................................................
सुनो नन्द''जिधर कभी कोई रास्ता बनाकर ना चला,
उस तरफ हि रास्ता बनाकर चलना''
11 Mar 2012 - 9:52 am | तर्री
श्री बबलू वडार (शिक्षक -कोल्हापूर) यांनी चुकुन "फुलबाग" / "ऊमलत्या कळ्या (?)" छाप काव्यस्पर्धेत भाग घेतला होता कि काय ?ढकलपत्र म्हणून ठिक आहे.ह्या कवितेला पहिला नंबर मिळाला असेल तर क्र.२ आणि ३ / ४ / ५ च्या कविता ही द्याव्या.
जरा करमणूक.