निःशब्द

सोनल कर्णिक वायकुळ's picture
सोनल कर्णिक वायकुळ in जे न देखे रवी...
28 Feb 2012 - 11:14 am

तुझे म्हणावे तुझेच केवळ
असे काही एक माझे निव्वळ

कुणी म्हणाले तिथेच बनती
जुळती तुटती रेशीमगाठी
मी न पाहिले हात तयाचे
तुझ्या किनारी सापडले घर

आयुष्याच्या अंक पटावर
दिले घेतले हिशेब झाले
समर्पणाच्या वाटेवरचे
आज पडावे पहिले पाउल

उलगडताना ह्रदयाची धून
सूर कापरा कातर कातर
शब्दांची वीण उसवीत जाती
शब्दांवाचून डोळ्यांचे तळ

तुझे म्हणावे तुझेच केवळ
असे काही एक माझे निव्वळ

शृंगारकविता

प्रतिक्रिया

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

28 Feb 2012 - 11:16 am | मिसळलेला काव्यप्रेमी

उलगडताना ह्रदयाची धून
सूर कापरा कातर कातर
शब्दांची वीण उसवीत जाती
शब्दांवाचून डोळ्यांचे तळ

अत्यंत हुच्च!!

पियुशा's picture

28 Feb 2012 - 4:36 pm | पियुशा

मस्त झालिये कविता :)

ajay wankhede's picture

28 Feb 2012 - 11:38 pm | ajay wankhede

छान

............................................................................................................................

इन्दुसुता's picture

29 Feb 2012 - 7:16 am | इन्दुसुता

आयुष्याच्या अंक पटावर
दिले घेतले हिशेब झाले
समर्पणाच्या वाटेवरचे
आज पडावे पहिले पाउल

उलगडताना ह्रदयाची धून
सूर कापरा कातर कातर
शब्दांची वीण उसवीत जाती
शब्दांवाचून डोळ्यांचे तळ>

कविता आवडली. करड्या अक्षरातील विशेष आवडले.

सांजसंध्या's picture

3 Mar 2012 - 4:35 pm | सांजसंध्या

छान आहे.

प्राजु's picture

4 Mar 2012 - 10:09 am | प्राजु

सुपर्ब!!