माझा देश

ajay wankhede's picture
ajay wankhede in जे न देखे रवी...
27 Feb 2012 - 7:07 pm

माझा देश (१)
मी लहान असतांना वाचलय
या देशात सोन्याचा धुर निघायचा
निर्मळ पाण्याचे झरे
दुथडी भरुन वाहनार्‍या नद्या
सुरम्य निसर्ग, हिरवेकंच किनारे
शेतात भात पिकलेला
शेतकरि आनंदाने मधुर गीत गातो
एक वितराग मुनि साधनेत मग्न संतुष्ट
दोघांच्या हि मनात
लवलेष नाही द्वेष भावाचा
माझा देश (२)
कुठे गेला माझा तो देश
मि शोधतोय त्याला
आटलेले झरे
आटलेल्या नद्यांचे भकास किनारे
शेतात भात पिकलेला
शेतकरि मनातुन धास्तावलेला
एक वितराग मुनि साधनेत मग्न अशांत
राग, द्वेष, क्रोध,मत्सर....
कुठे गेला माझा तो देश
मि शोधतोय त्याला.

करुणसमाजजीवनमान

प्रतिक्रिया

पक पक पक's picture

27 Feb 2012 - 10:51 pm | पक पक पक

जाउ द्या हो नका वाईट वाटुन घेउ... ;)

निनाव's picture

28 Feb 2012 - 12:47 am | निनाव

अजय, छान लिहिले आहेस.
निराशाजनक अशीच अवस्था झाली आहे आपल्या देशात.

मनमोकळि's picture

4 Mar 2012 - 2:13 pm | मनमोकळि

आवडलि..
छान कविता लिहिता..

सांजसंध्या's picture

4 Mar 2012 - 3:22 pm | सांजसंध्या

हम्म्म. खरंय

अन्या दातार's picture

4 Mar 2012 - 6:48 pm | अन्या दातार

हे मुक्तक 'जे न देखे रवी' मध्ये चुकुन आलंय वाटतं?