मूळ

अज्ञातकुल's picture
अज्ञातकुल in जे न देखे रवी...
25 Feb 2012 - 10:45 am

गुंता गुंता फांदी फांदी शकुनाची
ना करिते कसली अनावधानी चिंता
येती जाती ऋतु-पर्णे मोहोर अवघे
अव्यक्त तळातिल; "मूळ" गातसे गीता

निष्काम कर्म गत युगायुगांचे गीत
निश्वासांप्रति श्वासांस खेळवी प्रीत
उधळून गंध रंगात उमलवी काया
बघ निसर्ग कैसा जगण्याचे संगीत

मोहात अडकले पाश पृथक जन्मांचे
विसरले गमक रुजण्यातिल; वंश मनूचे
मिथकांचे रांजण स्वैर उधळवी माया
ओंजळी रिकाम्या स्वप्न काय कामाचे ?

सौहार्द मुके रे जगा जगू द्या सारे
शिणु नका; मिळूनी; वस्त्र विणू या न्यारे
भंगूर क्षती मग चिरंजीव होतील पुन्हा रे
ऋतुमानपरत्वे; आपले आपण; वळतिल बुजरे वारे

......................अज्ञात

शांतरसकविता