रात्ररात्रभराची ही जागरणं

Gajanan Mule's picture
Gajanan Mule in जे न देखे रवी...
24 Feb 2012 - 10:46 pm

रात्ररात्रभराची ही जागरणं

नि प्रत्येक घटकेला येणारी तुझी सय

अस्वस्थ मनाचं उनाड वागणं ...

स्वतःलाच पुन्हा पुन्हा काहीतरी मागणं...

चालता चालता एकटं नसल्याची जाणीव ...

आणि आजूबाजूला भेडसावणारी तुझी उणीव ...

चांदण्यांनी माझ्या नकळत हिरावून घेतलेली माझी झोप ...

आणि माझ्या अंगणातलं तुझ्या कवितेचंरोप ...

घेऊन जा ...

खूप वाढलंय

आणि दिवसेंदिवस अधिकाधिक

वाढतंच चाललय हे ...

रात्ररात्रभराची ही जागरणं ..

नि प्रत्येक घटकेला येणारी तुझी सय .

- गजानन मुळे

शृंगारकविता

प्रतिक्रिया

पक पक पक's picture

24 Feb 2012 - 10:55 pm | पक पक पक

मस्त........ :)

पैसा's picture

25 Feb 2012 - 4:51 pm | पैसा

मिपावर स्वागत आणि वेळोवेळी अशाच कविता लिहा या शुभेच्छा!

>> आणि माझ्या अंगणातलं तुझ्या कवितेचंरोप ...

घेऊन जा ...

हे विशेषतः आवडलं.

प्रशांत उदय मनोहर's picture

26 Feb 2012 - 4:31 pm | प्रशांत उदय मनोहर

मस्त!

फिझा's picture

27 Feb 2012 - 9:42 am | फिझा

छान आहे कविता !! आवडली !!!