निर्णय

सोनल कर्णिक वायकुळ's picture
सोनल कर्णिक वायकुळ in जे न देखे रवी...
22 Feb 2012 - 7:45 pm

घट्ट मिटलेल्या डोळ्यापुढे अस्वस्थ अंधारात
रंगीढंगी चित्र-विचित्र विक्षेप करत नाचत राहिल्या आकृत्या
लहानाच्या मोठ्या आणि मोठ्याच्या लहान होत
ठेंगा दाखवत दात विचकत हसत राहिल्या आकृत्या

कान मुद्दाम बंद केले होते हात बांधून कानाशी
एका दगडात पाडून टाकले चिवचिवणारे दोन पक्षी
तरी राहिले आदळत आवाज भित्र्या भिंतींना भेदून
शिरत राहिली नको ती कुजबुज पडदे सगळे छेदून

पापण्यांच्या फटीतून तेव्हाच शिरली असह्य तिरीप
अंधार पिऊन फाकणारी
आणि कानावर पडली चाहूल जरा वेगळी
जरबेने पाउल टाकणारी

मीच बंद केलेल दार उघडलं कोणी की
एक दार बंद केल्यावर आपोआप उघडलीत दुसरी?

डोळे उघडून एकदा तरी पाहायलाच हव…

अद्भुतरसमुक्तक

प्रतिक्रिया

गवि's picture

22 Feb 2012 - 8:11 pm | गवि

भारीच गो सोनल...

धनंजय's picture

22 Feb 2012 - 9:12 pm | धनंजय

कविता आवडली.

अशा परिस्थितीत डोळे उघडून बघायला धीर लागतो.

इन्दुसुता's picture

23 Feb 2012 - 7:10 am | इन्दुसुता

आवडली..

अशा परिस्थितीत डोळे उघडून बघायला धीर लागतो.

खरे आहे, आणि अनेक वेळा प्रयत्न देखिल करावा लागतो....
अनेक वेळा ती चाहुल आपल्याला नकोच असते किंवा ती चाहुल आहे हे सुद्धा आपले मन नाकारते...

पियुशा's picture

23 Feb 2012 - 10:56 am | पियुशा

छान आहे कविता :)

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

23 Feb 2012 - 11:18 am | मिसळलेला काव्यप्रेमी

मीच बंद केलेल दार उघडलं कोणी की
एक दार बंद केल्यावर आपोआप उघडलीत दुसरी?

क्या बात है!! What a thought!!

कवितानागेश's picture

23 Feb 2012 - 11:25 am | कवितानागेश

मस्तच

फिझा's picture

24 Feb 2012 - 9:53 am | फिझा

आवडलि कविता !!!

पापण्यांच्या फटीतून तेव्हाच शिरली असह्य तिरीप
अंधार पिऊन फाकणारी
आणि कानावर पडली चाहूल जरा वेगळी
जरबेने पाउल टाकणारी

वा! मस्त !! खुप आवड्ले....लगे रहो.

कवितानागेश's picture

25 Feb 2012 - 12:36 am | कवितानागेश

सुंदर रचना...
पुन्हा एकदा वाचली! :)

पैसा's picture

25 Feb 2012 - 5:01 pm | पैसा

सगळी कविताच आवडली. अंधारात हरवून जायला सोपं आहे, पण दुसरं दार उघडणं, त्यासाठी आधी डोळे उघडणं हेच फार कठीण!

रेशा's picture

26 Feb 2012 - 12:05 pm | रेशा

आवडली :) मस्त मस्त

सोनल कर्णिक वायकुळ's picture

28 Feb 2012 - 11:11 am | सोनल कर्णिक वायकुळ

मनापासुन भरभरुन प्रतिसाद दिल्याबद्दल आभारी आहे.
जे काही इथे उतरलय ते प्रत्येक वेळी कठिन प्रसन्गातुन जाताना खोल खोल जाणवलय. तुम्हालाही नक्किच हा अनुभव कधी न कधी आलाच असेल. ..