वॅलेंटाईन डे

रघु सावंत's picture
रघु सावंत in जे न देखे रवी...
19 Feb 2012 - 9:05 pm

वॅलेंटाईन डे

खरं म्हणजे तूला सांगायची गरज नाही
तुलाही माझ्या प्रमाणे ठाऊकच असणार
कारण आजचा दिवसच असा आहे
माझ्य मनात तूझ्या आठवणींचा ठसा आहे

मला आठवते आपली ती पहिली भेट
तेव्हाच माझ्या ह्र्द्याचा ठाव घेतलास थेट
या सगळ्या आठवणी आज आठवतात खास
कारण आजचा दिवसच असा आहे
माझ्या मनात तूझ्या आठवणींचा ठसा आहे

तुझी माझ्या करिता उठलेली प्रत्येक नजर
माझ्या करिता एक वेगळी अदा आहे
म्हणुन तर मी तूझ्यावर फिदा आहे
या देहाचा रोम रोम तूझी वाट बघतोय आज
कारण आजचा दिवसच असा आहे
माझ्या मनात तूझ्या आठवणींचा ठसा आहे

तुझं नेहमी स्वप्नात माझ्या येणं
येऊन मला मोहून शहारून सोडणं
मला तर ते आज पण हवं आहे
कारण आजचा दिवसच असा आहे
माझ्या मनात तूझ्या आठवणींचा ठसा आहे

शृंगारप्रेमकाव्य

प्रतिक्रिया

अन्या दातार's picture

19 Feb 2012 - 9:14 pm | अन्या दातार

म्हणुन तर मी तूझ्यावर फिदा आहे
या देहाचा रोम रोम तूझी वाट बघतोय आज

हे वाट बघणे जर व्हॅलेंटाईन डेला संपले, तर नक्कीच त्यांना बालदिन १४ नोव्हेंबरला साजरा करायची वेळ येईल ;)

बरीये रचना.

मृगनयनी's picture

20 Feb 2012 - 12:46 pm | मृगनयनी

हे वाट बघणे जर व्हॅलेंटाईन डेला संपले, तर नक्कीच त्यांना बालदिन १४ नोव्हेंबरला साजरा करायची वेळ येईल Wink

=)) =)) =)) =)) =)) =)) वाह (क्या..).अ.दा....... एकदम परफेक्ट !!!. ;)