प्रेरीत

अज्ञातकुल's picture
अज्ञातकुल in जे न देखे रवी...
18 Feb 2012 - 10:35 am

आकाशीचे मन कोरे निरभ्र होते
चांदणे सुखावत होते रज कैफाने
झाडाआडुन मी होतो वेधत खेळ ऐहिकाचा
पाऊल टाकले क्षितिजावर चंद्राने

ती भोर सावळ्या चतुर्दशीची होती
डौलात ठाकली कोर; पोर सगुणा जणु होती
पाहून ऐट चुकले ठोके हृदयाचे
एव्हाना ती आरूढ काळजावरती झाली होती

आभास नव्हे; हा श्वास खास जगण्याचा
ही साद अशी की अंतर्नाद सणाचा
अचरासह चर ऐशा किमयेचा शेला
मी साक्ष एक; प्रेरीत नित्य; ह्या नव्या युगाचा

........................अज्ञात

शृंगारकविता

प्रतिक्रिया

अत्रुप्त आत्मा's picture

18 Feb 2012 - 2:33 pm | अत्रुप्त आत्मा

नेहमी प्रमाणेच आशयगर्भ... :-)

पण- कापड उच्च प्रतिचं असुन, विण मात्र जरा ढासळली...असे झाले आहे

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

20 Feb 2012 - 11:29 am | मिसळलेला काव्यप्रेमी

ती भोर सावळ्या चतुर्दशीची होती
डौलात ठाकली कोर; पोर सगुणा जणु होती
पाहून ऐट चुकले ठोके हृदयाचे
एव्हाना ती आरूढ काळजावरती झाली होती

..............!!

शुचि's picture

20 Feb 2012 - 7:02 pm | शुचि

अप्रतिम!!!